भारतातील ब्रिटीश उच्चायुक्तपदाची सूत्रे फिलीप बार्टन यांनी हाती घेतली. फेब्रुवारी महिन्यात त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पदभार स्विकारण्यास त्यांना विलंब झाला.
एका आभासी (व्हर्च्युअल) कार्यक्रमात बार्टन यांनी आवश्यक कागदपत्रे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे सुपूर्द करीत सूत्रे हाती घेतली.
आपल्या आजवरच्या कारकीर्दीतील हा महत्त्वाचा टप्पा असल्याचे बार्टन यांनी या वेळी सांगितले. दोन देशांतील हितसंबंध जोपासण्यासोबतच व्यापार आणि आर्थिक बाजू वृद्धींगत करण्यासाठी प्रयत्न केले जातील.
त्यांच्या आईचा जन्म हिमाचल प्रदेशातील शिमला येथे झाला होता. यापूर्वीही त्यांनी दिल्लीत काम केले आहे. त्यांनी वॉशिंग्टनमध्ये उप राजदूत म्हणून काम केले आहे. २०१४ ते २०१६ या काळात ते पाकिस्तानचे ब्रिटीश उच्चायुक्तही राहिले आहेत.
नेपाळमध्ये भारतीय न्यूज चॅनल्सचं प्रसारण बंद
नेपाळमध्ये भारतीय न्यूज चॅनल्स बंद करण्यात आली आहेत. नेपाळ सरकारने ही बंदी घातल्याचं बोललं जातं आहे. मात्र ही चॅनल्स नेपाळमधल्या केबल प्रोव्हायडर्सनी बंद केली आहेत. यासाठी नेपाळ सरकारने काही अधिकृत अधिसूचना जारी केलेली नाही.
सध्याच्या घडीला दूरदर्शन सोडून एकही भारतीय न्यूज चॅनल नेपाळमध्ये दिसत नाही. आम्ही या चॅनल्सचं प्रसारण बंद केल्याचं नेपाळच्या केबल प्रोव्हायडर्सनी म्हटलं आहे.
अाशियाच्या भव्य साैर प्रकल्पाचे अाज लाेकार्पण
पंतप्रधान नरेंद्र माेदी शुक्रवारी व्हिडिअाे काॅन्फरन्सद्वारे रिवा येथील अतिभव्य साैरऊर्जा प्रकल्पाचे लाेकार्पण करतील. अाशियातील सर्वात माेठ्या १,५९० हेक्टरवर बनलेल्या या प्रकल्पात तीन विभाग अाहेत. प्रत्येकातून २५० मेगावॅट वीजनिर्मिती हाेते. यातील २४ % वीज दिल्ली मेट्राेला दिली जातेे.
बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरींचा राजीनामा
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांचा राजीनामा स्वीकारला आहे. जोहरी यांनी काही महिन्यांपूर्वी बीसीसीआय सचिव जय शाह यांच्याकडे आपला राजीनामा दिला होता.
जोहरी यांचा कार्यकाळ एप्रिलमध्ये संपणार होता. तथापि, मंडळाने त्याला अंतरिम मुदतवाढ देण्याचा निर्णयही घेतला होता.
जोहरी यांची २०१६ मध्ये बीसीसीआयच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली होती.
परंतु आता त्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्यात आलं आहे,” अशी माहिती बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना दिली.
मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची सूत्रं स्वीकारल्यानंतर जोहरी अनेक आघाड्यांवर काम केलं होतं.
त्यामध्ये त्यांनी आयपीएलचे प्रसारण हक्क स्टार इंडियाला १६ हजार ३४८ कोटी रुपयांना विकण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. शशांक मनोहर हे बीसीसीआय अध्यक्ष होते आणि अनुराग ठाकूर हे मंडळाचे सचिव होते तेव्हा त्यांची जोहरी यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली होती.