⁠  ⁠

चालू घडामोडी : १० सप्टेंबर २०२०

Chetan Patil
By Chetan Patil 3 Min Read
3 Min Read

Current Affairs : 10 September 2020

डोनाल्ड ट्रम्प यांना २०२१च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन

Norwegian lawmaker nominates Trump for Nobel Peace Prize | World News,The  Indian Express

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना २०२१ च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे.
नॉर्वेच्या खासदाराने इस्रायल आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये झालेल्या ऐतिहासिक शांतता करारासाठी ट्रम्प यांचे नाव सुचवले आहे.
या करारामुळे दोन्ही देशातील जवळपास ७२ वर्षांचे वैर संपले आहे.
इस्रायल आणि संयुक्त अरब अमिराती या देशांनी १३ ऑगस्ट रोजी अमेरिकेच्या मध्यस्थीने शांतता करार करत असल्याची घोषणा केली होती.
या करारानुसार, इस्रायलला आता पश्चिम किनाऱ्यावरील काही भागांना आपल्या अधिकार क्षेत्रात घेण्याच्या योजनेला स्थगिती द्यावी लागणार आहे. इस्रायल आणि संयुक्त अरब अमिराती दरम्यान गुंतवणूक, पर्यटन, थेट विमान सेवा, सुरक्षा आदी मुद्यांवर द्विपक्षीय करार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

पन्नास वर्षांत जगभरात वन्यजीवांची संख्या ६८ टक्क्यांनी घटली

animal

पर्यावरणाच्या हानीमुळे गेल्या पन्नास वर्षांत जगातील सस्तन प्राणी, पक्षी, उभयचर, सरपटणारे प्राणी आणि मासे यांच्या एकूण संख्येत दोन तृतीयांश घट झाल्याचा निष्कर्ष विश्व वनजीव निधी (डब्ल्यूडब्ल्यूएफ) संस्थेने मांडला आहे.
‘लिव्हिंग प्लॅनेट रिपोर्ट २०२०’ या अहवालातून हे धक्कादायक वास्तव समोर येते. वन्यजीवांची संख्या कमी होण्याबरोबरच कोविड १९ सारख्या पशुजन्य रोगांचादेखील उगम होत असल्याचा निष्कर्ष डब्ल्यूडब्ल्यूएफने मांडला आहे.
दर दोन वर्षांनी जागतिक पातळीवर वन्यजीवांच्या सद्य:स्थितीचा आढावा डब्ल्यूडब्ल्यूएफमार्फत घेतला जातो. १९७० ते २०१६ या काळातील अभ्यासासाठी १२५ तज्ज्ञांचा सहभाग होता.
अहवालातील ‘लिव्हिंग प्लॅनेट निर्देशांक’नुसार पृष्ठवंशीय प्राण्यांची संख्या कमी होण्यामागे, जमिनीचा वापरबदल आणि प्राण्यांचा व प्राण्यांवर आधारित व्यापार ही दोन महत्त्वाची कारणे असल्याचे यात नमूद केले आहे. वनांच्या जमिनीचा वापरबदल होणे आणि अशाश्वत शेती ही कारणे नोंदविली आहेत.
गेल्या ५० वर्षांत सुमारे चार हजार पृष्ठवंशीय प्राण्यांचा अभ्यास यामध्ये करण्यात आला. त्यानुसार गोडय़ा पाण्याच्या अधिवासातील प्रजातींची संख्या ८४ टक्क्यांनी घटल्याचे दिसून येते. १९७० पासून दरवर्षी सुमारे चार टक्के या वेगाने ही संख्या कमी होत गेल्याचे अहवालात नमूद केले आहे.
वन्यजीवांची संख्या घटणे आणि पर्यावरणाचा आणखी ऱ्हास रोखणे यासाठी पुढील दहा वर्षांचे लक्ष्य ठेवून काम करण्याची गरज या अहवालातून मांडली आहे. या अहवालाच्या प्रकाशनादरम्यान डब्ल्यूडब्ल्यूएफच्या तज्ज्ञांनी २०३० पर्यंतच्या पाण्याच्या स्थितीवरदेखील भाष्य केले. तज्ज्ञांच्या मते २०३० पर्यंत पाण्याची मागणी ही उपलब्धतेपेक्षा दुप्पट होण्याची शक्यता आहे. तसेच २०२२ पर्यंत ६० टक्के जलचरांची स्थिती चिंताजनक होण्याची शक्यता मांडण्यात आली.

रोनाल्डो १०० गोल करणारा जगातील दुसरा

cristiano ronaldo international goals: 100 गोल दागने वाले यूरोप के पहले  फुटबॉलर बने क्रिस्टियानो रोनाल्डो, अब वर्ल्ड रेकॉर्ड निशाने पर - portugal  star cristiano ronaldo becomes ...

जगातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूंपैकी एक क्रिस्टियानो रोनाल्डोने आणखी एक विक्रम आपल्या नावे केला. रोनाल्डो १०० आंतरराष्ट्रीय गोल करणारा जगातील दुसरा व युरोपमधील पहिला खेळाडू बनला.
पोर्तुगालचा कर्णधार रोनाल्डोने नेशन्स लीगमध्ये स्वीडनविरुद्ध २ गोल केले. त्याच्या गोलच्या मदतीने पोर्तुगालने स्वीडनला २-० ने हरवत सलग दुसरा विजय मिळवला.
रोनाल्डो १०० पेक्षा अधिक गोल करणारा एकमेव सध्या खेळणारा खेळाडू आहे. ३५ वर्षीय रोनाल्डोचे १६५ आंतरराष्ट्रीय सामन्यांत १०१ गोल झाले.

Share This Article