⁠  ⁠

चालू घडामोडी : ११ जुलै २०२०

Chetan Patil
By Chetan Patil 5 Min Read
5 Min Read

Current Affairs 11 July 2020

बोईंगकडून भारताला अपाचे, चिनूकचा संपूर्ण ताफा सुपूर्द

Untitled 12 6
  • भारतीय हवाई दलाने मागणी नोंदवलेल्या सर्व नव्या एएच-६४ ई अपाचे आणि सीएच-४७ एफ (आय) चिनूक लष्करी हेलिकॉप्टरचा पुरवठा बोईंग कंपनीकडून करण्यात आला आहे.
  • २२ अपाचे लढाऊ हेलिकॉप्टरपैकी अखेरच्या टप्प्यातील पाच हेलिकॉप्टर भारतीय हवाई दलाला हिंडान हवाई तळावर सुपूर्द करण्यात आली.
  • याआधी मार्चमध्ये बोईंगने एकूण १५ सीएच-४७ एफ (आय) चिनूक भारीवहन हेलिकॉप्टरपैकी शेवटची पाच भारतीय हवाई दलाच्या ताब्यात दिली होती.
  • संरक्षण ताफ्यात अत्याधुनिक ‘अपाचे’ समाविष्ट केलेल्या जगातील १७ देशांपैकी भारत एक आहे. ‘अपाचे’चे सर्वात आधुनिक रूप असलेली एएच-६४ ई हेलिकॉप्टर भारताला मिळाली आहेत.
  • अमेरिकेसह अन्य काही देशांच्या ताफ्यात ही हेलिकॉप्टर आहेत. यात अत्याधुनिक संपर्क, वहन, संवेदक आणि शस्त्रास्त्र प्रणाली बसविण्यात आली आहे. यातील सुधारित अत्याधुनिक लक्ष्यनिर्धारण यंत्रणेद्वारे दिवसा आणि रात्री तसेच सर्व प्रकारच्या हवामानात लक्ष्य निश्चित करता येते. यात नाईट व्हिजन नेव्हिगेशनची सुविधाही आहे.
  • जगातील २० देशांच्या संरक्षण दलांनी आपल्या ताफ्यात चिनूकचा समावेश केला आहे, किंवा त्याच्या खरेदीचे करार केले आहेत. गेल्या ५० वर्षांपासून भारी वहन श्रेणीतील हे एक अत्यंत विश्वसनीय हेलिकॉप्टर मानले जाते.
  • उष्ण हवामान, अतिउंची आणि प्रतिकूल वारे अशा स्थितीत जेथे अन्य हेलिकॉप्टर उड्डाण करू शकत नाहीत, तेथे चिनूक कामगिरी बजावते. सीएच-४७ एफ (आय) चिनूकमध्ये अत्याधुनिक यंत्रसामुग्री, सीएएएस कॉकपिट आणि डिजिटल अ‍ॅटोमॅटिक फ्लाईट कंट्रोल सिस्टीम या वैशिष्टय़ांचा मेळ साधला गेला आहे.

हॉकी अध्यक्षांचा राजीनामा

Untitled 15 7
  • राष्ट्रीय क्रीडा धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याप्रकरणी क्रीडा मंत्रालयाने राजीनामा देण्यास सांगितल्यानंतर मोहम्मद मुश्ताक अहमद हे हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदावरून वैयक्तिक बांधिलकीचे कारण देत पायउतार झाले आहेत.
  • हॉकी इंडियाचे कार्यकारी सदस्य तसेच महासंघाचे उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी पाहणारे मणिपूरचे ज्ञानेंद्रो निगोमबाम यांची अहमद यांच्या जागी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
  • ‘‘मोहम्मद मुश्ताक अहमद यांनी वैयक्तिक तसेच कौटुंबिक जबाबदाऱ्यांचे कारण देत ७ जुलै रोजी हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा सुपूर्द केला होता. त्यानंतर हॉकी इंडियाच्या कार्यकारी समितीची तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. त्यात अहमद यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला असून मणिपूरच्या ज्ञानेंद्रो निगोमबाम यांची हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली,’’ असे हॉकी इंडियाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
  • २०१८ मध्ये हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी हाती घेताना अहमद यांनी अनेक पदे भूषविल्याच्या नियमांचे उल्लंघन केले होते.
  • २०१०-१४ दरम्यान ते खजिनदारपदी तर २०१४ ते २०१८ या कालावधीत सरचिटणीसपदी कार्यरत होते. त्यातच २०१८-२२ या कालावधीत त्यांची अध्यक्षपदी निवड झाली होती.
  • नियमानुसार, कोणताही पदाधिकारी प्रत्येकी चार वर्षांचा कार्यकाळ सलग दोन वेळा भूषवू शकतो. त्यामुळे त्यांचा चार वर्षांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ हा तिसऱ्यांदा होणे शक्य होते. यावरून बऱ्याच महिन्यांपासून राष्ट्रीय क्रीडा संघटना आणि क्रीडा मंत्रालय यांच्यात वाद सुरू होता.

आशियातील मोठा ७५० मेगावॅटचा सौर प्रकल्प सुरू

pm modi inaugurate solar project in rewa madhya pradesh

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी मध्य प्रदेशातील रीवा स्थित आशियातील सर्वात मोठ्या सौरऊर्जा प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
  • सौर उर्जा हे केवळ आज नव्हे तर २१ व्या शतकातील ऊर्जेची गरज भागविणारा प्रमुख स्रोत ठरणार आहे. कारण सौर ऊर्जा कायमस्वरूपी, शुद्ध आणि सुरक्षित ऊर्जास्रोत आहे.
  • मध्य प्रदेशातील रीवा येथे ७५०मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.
  • सौरऊर्जा निर्मितीत भारत जगात पाचव्या स्थानावर
  • सौर ऊर्जेच्या बाबतीत आपण जगातील पहिल्या पाच देशांमध्ये पोहोचलो आहोत. यात भारत स्वयंपूर्ण होत आहे. जेव्हा आपण स्वयंपूर्णतेबद्दल बोलतो तेव्हा अर्थव्यवस्था हा त्यातील सर्वात महत्वाचा भाग असतो.
  • प्रकल्पाची क्षमता ७५० मेगावॅट इतकी आहे
  • रिवा येथील सौरउर्जा प्रकल्पाची क्षमता ७५० मेगावॅट इतकी आहे आणि १५९० हेक्टर क्षेत्रात हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. हा प्रकल्प जगातील सर्वात मोठ्या एकल सौर प्रकल्पांपैकी एक आहे. या सौर उर्जा प्रकल्पात एकूण तीन युनिट आहेत. प्रत्येक युनिट २५० मेगा वॅट्स वीज निर्मिती करीत आहे. या प्रकल्पातून निर्माण होणारी ७६ टक्के वीज राज्यातील वीज व्यवस्थापन कंपनीला आणि २४% टक्के वीज दिल्ली मेट्रो प्रकल्पाला दिली जात आहे.
  • पर्यारणाच्या दृष्टीने महत्व
  • या प्रकल्पाचे महत्व म्हणजे खरेदी दर २ रुपये ९७पैसे इतका आहे, जो आतापर्यंतचा सर्वात कमी दर आहे. पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून सौर प्रकल्प पाहता, रीवा सौर प्रकल्पातून दरवर्षी १५.७ लाख टन कार्बनडाय ऑक्साईडचे उत्सर्जन रोखले जात आहे जे २ करोड ६०लाख झाडे लावण्याइतके आहे.

Share This Article