जगातील सर्वात चांगले शहराची क्रमवारी जाहीर
न्यूझीलंडचे ऑकलंड वास्तव्यासाठी जगातील सर्वात चांगले शहर आहे. गेल्या वेळी अव्वल राहिलेले ऑस्ट्रियातील व्हिएन्ना १२ व्या क्रमांकावर घसरले.
सर्वात वाईट १० शहरांमध्ये सिरियाची राजधानी दमिश्क, बांगलादेशातील ढाका व पाकिस्तानातील कराची आहे. ही माहिती इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटच्या २०२१ च्या क्रमवारीत देण्यात आली आहे.
ज्या देशांनी महामारी नियंत्रणात ठेवली तेथे सुधारणा दिसली आहे. यामुळेच सर्वात घसरण झालेल्या १० पैकी ८ शहरे युरोपातील आहेत.
या यादीत शहरांतील स्थिरता, आरोग्य सुविधा, संस्कृती आणि पर्यावरण, शिक्षण पायाभूत सुविधेच्या आधारे मानांकन दिले जाते.
वास्तव्यासाठी जगातील टॉप- १० शहरे
रँक शहर देश गुण
1 ऑकलंड न्यूझीलंड 96.0
2 ओसाका जपान 94.2
3 अॅडिलेड ऑस्ट्रेलिया 94.0
4 वेलिंग्टन न्यूझीलंड 93.7
5 टोकियो जपान 93.7
6 पर्थ ऑस्ट्रेलिया 93.3
7 झुरिच स्वित्झर्लंड 92.8
8 जिनेव्हा स्वित्झर्लंड 92.5
9 मेलबर्न ऑस्ट्रेलिया 92.5
10 ब्रिस्बेन ऑस्ट्रेलिया 92.5
१० पैकी ७ शहरांना आरोग्य सेवेत १०० पैकी १०० गुण
शहरांच्या क्रमवारीत सर्वाधिक परिणाम महामारीत राबवलेल्या धोरणांचाही झाला आहे. यामुळेच वास्तव्यासाठी सर्वात चांगल्या १० शहरांपैकी ७ ना १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत. यात जपानचे ओसाका, टोकियो व ऑस्ट्रेलियाचे पर्थ, अॅडिलेड, मेलबर्न आहे. इतर दोन जिनिव्हा, ज्युरिख आहेत.
गुप्ता बंधू : द. आफ्रिका व यूएईमध्ये करार
दक्षिण आफ्रिका आणि यूएई यांच्यात प्रत्यार्पण करार झाला आहे. यामुळे भारतीय वंशाचे व्यावसायिक गुप्ता बंधूंना दुबईतून आफ्रिकेत परत आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
यामुळे शासकीय संस्थांमधील कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपात खटला चालवता येईल.
दक्षिण आफ्रिकेचे माजी न्यायमंत्री मायकल मसुथा यांनी सांगितले, यूएईने मंगळवारी करारावर स्वाक्षरी केली. प्रत्यार्पणाच्या माध्यमातून फरार झालेल्यांच्या गुन्ह्यांची चौकशी करण्यात करार महत्त्वाचा ठरेल.
दक्षिण सागर हा जगातील पाचवा महासागर
पृथ्वीच्या दक्षिणेकडील सागराला जगातील पाचवा महासागर म्हणून नॅशनल जिओग्राफीक या आंतरराष्ट्रीय संघटनेकडून मान्यता देण्यात आली आहे.
जागतिक सागर दिनाच्या औचित्याने ही घोषणा करण्यात आली आहे. दक्षिण महासागर हे समुद्री पर्यावरणातील एक महत्त्वाचे स्थान आणि दक्षिण गोलार्धातील प्रमुख केंद्रबिंदू आहे.
अंटार्टिकाला याच महासागराने वेढलेले आहे. अंटाटूर्ओकाच्या किनारपट्टीपासून याला सुरूवात होते. दक्षिणाकडे 60 अंश अक्षांशांपासून ते ड्रेक पॅसेज आणि स्कॉशिया समुद्र वगळून पृथ्वीवर अस्तित्त्वात असलेल्या इतर चार महासागरापैकी ऍटलांटिक, हिंदी महासागर आणि प्रशांत महासागर या तीन महासागरांच्या सीमांना हा महासागर स्पर्श करतो. अन्य महासागरांपेक्षा याचे वागळेपण म्हणजे त्याभोवती असलेल्या भूभागाऐवजी पाण्यामध्ये सध्या असलेले प्रवाह हे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या प्रांताच्या उत्तरेकडील भागांपेक्षा या भागातील प्रवाह थंड आणि कमी खारट पाण्याचे आहेत.
अंदाजे 34 दशलक्ष वर्षांहून अधिक जुन्या या प्रवाहामुळे दक्षिण महासागराचे पर्यावरणशास्त्रीय महत्व अधिक वेगळे आहे, या महासागरामध्या हजारो प्रजातींसाठी एक अनन्य अधिवास उपलब्ध करून दिला गेला आहे, असे नॅशनल जिओग्राफिकने आपल्या मासिकात म्हटले आहे.
ट्रान्सजेंडर मॉडेल नाझ जोशी ठरली ‘इप्रेस अर्थ’
देशातील पहिली ट्रान्सजेंडर ‘इंटरनॅशनल ब्युटी क्वीन’ नाझ जोशी हिने ‘इप्रेस अर्थ 2021-22’ स्पर्धा जिंकली आहे.
नुकतीच ही स्पर्धा ‘व्हर्च्युअली’ पार पडली. दुबई येथे 1 जून 2021 रोजी ‘इप्रेस अर्थ’ स्पर्धा पार पडणार होती. मात्र कोरोना महामारीमुळे स्पर्धेचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले. त्यात 15 देशांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. त्यात नाझ अंतिम विजेती ठरली.
‘इप्रेस अर्थ’ स्पर्धेची विजेती होण्याआधी नाझने मिस युनिव्हर्स डायव्हर्सिटी 2020, मिस वर्ल्ड डायव्हर्सिटी 2020, मिस रिपब्लिक इंटरनॅशनल ब्युटी ऍम्बेसेडर, मिस युनायटेड नेशन्स ऍम्बेसेडेर हे किताब जिंकलेले आहेत.