Current Affairs : 12 August 2020
वडिलोपार्जित संपत्तीवर मुलींना समानाधिकार
- हिंदू वारसा ‘सुधारणा’ कायदा २००५ अमलात येण्याच्या आधी वडिलांचा मृत्यू झाला असेल तरी अविभक्त हिंदू कुटुंबातील वडिलोपार्जित संपत्तीवर मुलींना मुलांइतकाच समानाधिकार (समदायित्व) राहील, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
- सर्वोच्च न्यायालयाच्या पीठाने मंगळवारी सांगितले की, ९ सप्टेंबर २००५ पूर्वी जन्मलेल्या मुलींनाही वडिलोपार्जित संपत्तीवर समान हक्क आहे. कारण वडिलोपार्जित संपत्तीवर अधिकार हा जन्मापासून मिळत असतो.
- सुधारित कायद्यातील कलम ६ अन्वये मुलींना वडिलोपार्जित संपत्तीतील समान हक्कांपासून वंचित ठेवता येणार नाही. त्यांना पूर्वलक्ष्यी प्रभावाने हे हक्क लागू आहेत. त्यामुळे याबाबतची प्रलंबित प्रकरणे सहा महिन्यात निकाली काढावीत.
- हिंदू वारसा हक्क कायदा पहिल्यांदा १९५६ मध्ये अमलात आला होता. त्यात वडिलोपार्जित मालमत्तेत मुलींना समान अधिकार देणारी सुधारणा २००५ मध्ये करण्यात आली होती. ती पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू होते असे स्पष्ट करण्यात आले.
- सुधारित कायद्यातील वारसा हक्क हे जिवंत वारसा हक्क कर्त्यांच्या जिवंत असलेल्या मुलींना त्या केव्हा जन्मल्या याचा विचार न करता ९ सप्टेंबर २००५ पासून लागू होतात. पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू होत नाहीत.
उपराष्ट्रपतींच्या तीन वर्षाच्या कारकिर्दीचा आढावा घेणाऱ्या ई पुस्तकाचे प्रकाशन
- उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या तिसऱ्या वर्षाच्या कारकिर्दीचा आढावा घेणारे “कनेक्टिंग, कम्युनिकेटिंग, चेंजिंग’ या ई-पुस्तकाचे आज केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी प्रकाशन केले.
- केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते या पुस्तकाच्या कॉफी टेबल आवृत्तीचेही प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकात उपराष्ट्रपतींच्या कारकिर्दीतील विविध घटना, कामे तसेच देश-विदेशातील दौरे यांची चित्रमय माहिती संकलित करण्यात आली आहे.
- उपराष्ट्रपतींनी शेतकरी, वैज्ञानिक, डॉक्टर्स, युवक, प्रशासक, उद्योग प्रतिनिधी आणि कलाकार अशा विविध क्षेत्रातील लोकांशी साधलेल्या संवादाची माहिती आणि क्षणचित्रे देखील या पुस्तकात बघायला मिळतील. पराष्ट्रपतींचे परदेश दौरे, जागतिक नेत्यांशी केलेल्या चर्चा, भाषणे यांचीही माहिती या पुस्तकात आहे.
भारतीय वंशाच्या कमला हॅरिस अमेरिकेच्या उपाध्यक्षपदाच्या उमेदवार
- भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांच्या नावाची घोषणा अमेरिकेच्या उपाध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून करण्यात आली आहे.
- डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार जो बिडेन यांनी हॅरिस यांच्या नावाची घोषणा केली.
- याआधी अमेरिकेला कधीही कृष्णवर्णीय उपाध्यक्ष लाभलेला नाही. त्यामुळे हॅरिस निवडून आल्यास अमेरिकन निवडणुकीत इतिहास रचला जाईल.
- कॅलिफॉर्नियाच्या खासदार असलेल्या कमला हॅरिस आधी अध्यक्षपदाच्या शर्यतीत होत्या. मात्र नंतर त्यांचं नाव मागे पडलं. डेमोक्रॅटिक पक्षानं जो बिडेन यांच्या नावाला अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून पसंती दिली. यानंतर आता हॅरिस यांची निवड उपाध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून करण्यात आली आहे. हॅरिस यांनी याआधी कॅलिफॉर्नियाच्या ऍटॉर्नी जनरल म्हणून काम केलं आहे.