भूपेन हजारिकांच्या कुटुंबियांचा ‘भारतरत्न’ पुरस्कारावर बहिष्कार !
- आसाममध्ये नागरिकत्व विधेयकाचा वाद दिवसेंदिवस चिघळत आहे. आता नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात दिवंगत ज्येष्ठ संगीतकार भूपेन हजारिका यांच्या कुटुंबियांनी ‘भारतरत्न’ पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला आहे. हा पुरस्कार स्वीकारणार नसल्याचं त्यांचा मुलगा तेज हजारिका यांनी म्हटलं आहे.
- केंद्र सरकारने भूपेन हजारिका यांना प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच २५ जानेवारी रोजी भारतरत्न जाहीर केला होता.
- दुसरीकडे, भूपेन हजारिका यांचे मोठे बंधू समर हजारिका यांनी, ‘भारतरत्न’ पुरस्कार न स्वीकारण्याच्या निर्णयाशी आपण सहमत नसल्याचे म्हटले आहे. ‘भारतरत्न पुरस्कार न स्वीकारण्याचा निर्णय त्यांचा मुलगा तेजचा आहे. मात्र, या निर्णयाशी मी सहमत नाही. भूपेन यांना भारतरत्न मिळण्यास आधीच बराच उशीर झाला आहे’, असं ते म्हणाले.
अबुधाबीत हिंदीला कोर्टाच्या तिसऱ्या अधिकृत भाषेचा दर्जा
- संयुक्त अरब अमिरातीची (युएई) राजधानी अबुधाबीने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. अरबी आणि इंग्रजी भाषेनंतर अबुधाबीने हिंदी भाषेचा कोर्टाची तिसरी अधिकृत भाषा म्हणून समावेश केला आहे.
लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कारण अबुधाबीमध्ये हिंदी भाषिकांची संख्या खूप मोठी आहे. - अबुधाबीच्या न्याय विभागाने (एडीजेडी) म्हटले की, नोकरीच्या प्रकरणांमध्ये अरबी आणि इंग्रजीसोबतच हिंदी भाषेचा समावेश करीत कोर्टासमोर येणाऱ्या याचिकांवर सुनावणी होण्यासाठी भाषेच्या माध्यमाचा विस्तार केला आहे. हिंदी भाषिक लोकांना खटल्याची प्रक्रिया, त्यांचे अधिकार आणि कर्तव्यांबाबत माहिती मिळण्यास मदद व्हावी हा या मागचा हेतू आहे.
- अधिकृत आकडेवारीनुसार, संयुक्त अरब अमिरातीच्या लोकसंख्येत सुमारे दोन तृतीयांश लोकसंख्या ही परदेशी प्रवाशी लोकांची संख्या आहे.
- इथे भारतीयांची लोकसंख्या 26 लाख आहे. ही लोकसंख्या देशाच्या एकूण लोकसंख्येच्या 30 टक्के आहे. अबुधाबीतील हा सर्वांत मोठा प्रवासी समाज आहे.
- अबुधाबीच्या न्यायिक विभागाचे अंडर सेक्रेटरी युसूफ सईद अल आबरी म्हणाले, आम्ही न्याय प्रक्रियेला अधिक पारदर्शी बनवू पाहत आहोत. त्यासाठी 2021 साठी नवी योजना आम्ही आखली आहे.
ATP Rankings : प्रज्ञेशची अव्वल १००मध्ये झेप
- प्रज्ञेशने नुकत्याच जाहीर झालेल्या एटीपी टेनिस क्रमवारीत कारकीर्दीत पहिल्यांदाच अव्वल १०० जणांमध्ये मुसंडी मारली आहे. त्याने ९७व्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
- जगातील अव्वल १०० टेनिसपटूंमध्ये स्थान मिळवणारा प्रज्ञेश हा सोमदेव देववर्मन आणि युकी भांब्रीनंतरचा तिसरा भारतीय टेनिसपटू ठरला आहे. २०१८च्या मोसमात दमदार कामगिरी करत प्रज्ञेशने गेल्या आठवडय़ात एटीपी चेन्नई चॅलेंजर स्पर्धेत उपांत्य फेरीत धडक मारली होती.
- प्रज्ञेशने अव्वल १०० जणांमध्ये आपले स्थान टिकवून ठेवल्यास, त्याला ग्रँडस्लॅम स्पर्धाच्या मुख्य फेरीत थेट खेळण्याची संधी मिळेल.
- भारताच्या रामकुमार रामनाथनने पाच क्रमांकाच्या सुधारणेसह १२८वे स्थान पटकावले आहे. साकेत मायनेनी २५५व्या तर शशीकुमार मुकुंद २७१व्या क्रमांकावर आहे.
- पुरुष दुहेरीत रोहन बोपण्णा ३७व्या क्रमांकावर कायम असून दिविज शरण ३९व्या तर लिएंडर पेस ७५व्या स्थानी आहे. जीवन नेदुनचेझियान ७७व्या तर पुरव राजा १००व्या क्रमांकावर आहे. महिलांमध्ये अंकिता रैनाने तीन क्रमांकांनी झेप घेत एकेरीत १६५वे स्थान प्राप्त केले आहे. कामराम कौर थंडी २११व्या क्रमांकावर पोहोचली आहे.
देशातील सर्वात वेगवाग रेल्वे ‘ट्रेन-18’
- देशातील सर्वात वेगवान ट्रेनमधून प्रवास करण्यासाठी तुम्हाला खिसा देखील खाली करावा लागणार आहे. भारतीय रेल्वेची पहिली इंजिनविरहित आणि संपूर्ण स्वदेशी बनावटीची असलेली ट्रेन अर्थात ‘ट्रेन-18’ किंवा ‘वंदे भारत एक्सप्रेस’ला 15 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्ली ते वाराणसी प्रवासासाठी हिरवा झेंडा दाखवणार आहेत. त्यापूर्वी या ट्रेनचे तिकीट दर जाहीर करण्यात आले आहेत.
- प्रवाशांना थेट ड्रायव्हरची केबिनही दिसू शकेल अशी रचना या ट्रेनची आहे. 16 डब्ब्यांच्या या ट्रेनमधील 14 डबे ‘नॉन एक्झिक्युटिव्ह’ तर दोन डबे ‘एक्झिक्युटिव्ह’ असतील. ही ट्रेन येत्या काळात ‘शताब्दी एक्सप्रेस’ची जागा घेईल.
‘यूपीएल’कडून ‘आर्यस्टा’चे अधिग्रहण
- कृषी रसायन क्षेत्रातील आघाडीच्या ‘यूपीएल’ने ‘आर्यस्टा लाईफसायन्स’चे यशस्वी अधिग्रहण केले. ४.२ अब्ज डॉलरच्या व्यवहाराने कंपनी क्षेत्रातील जगातील पाचवी मोठी कंपनी बनली आहे.
- या व्यवहारानंतर ‘यूपीएल’मार्फत होणारी एकत्रित विक्री ५ अब्ज डॉलरच्या घरात पोहोचणार आहे. त्याचबरोबर आफ्रिका, रशिया तसेच पूर्व युरोपियन बाजारपेठेंमध्ये कंपनीला शिरकाव करण्याची संधी मिळाली आहे.
- अधिग्रहणापूर्वी जागतिक कृषी रसायन क्षेत्रात ‘यूपीएल’ व ‘आर्यस्टा’ अनुक्रमे सातवी व दहावी कंपनी होती. ‘यूपीएल’चे विविध ७६ देशात अस्तित्व असून १३० देशांमध्ये कंपनीच्या विविध उत्पादनांची विक्री होते.
- या भागात कंपनीला ऊस, कॉफीसारख्या सध्या अस्तित्व नसलेल्या उत्पादन क्षेत्रातील सुविधा पुरविणे शक्य होणार आहे.
मी पुरस्कारात यंदा महिलांची बाजी
- 2019च्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात कॅसी मुसग्रेव्ह, कार्डी बी व लेडी गागा या महिला संगीतकारांचा दबदबा राहिला. पुरुष कलाकारांचे वर्चस्व असलेल्या गटातील सर्व ग्रॅमी पुरस्कार या महिलांनी पटकावले आहेत. ग्रॅमी पुरस्कारात महिलांना फारसे महत्त्व दिले जात नाही अशी टीका गेल्या वर्षीच्या पुरस्कार कार्यक्रमात झाली होती. त्याची दखल घेत ध्वनिमुद्रण अकादमीने यावेळी महिलांना केंद्रस्थानी ठेवले. विजेते, सादरकर्ते व यजमान या सर्व पातळ्यांवर महिलांचेच वर्चस्व राहिले.
- अलिशिया कीज या यजमान होत्या. चौदा वर्षांनंतर हा मान महिलेला मिळाला, त्यांनी माजी प्रथम महिला मिशेल ओबामा, लेडी गागा, जेनीफर लोपेझ व जॅडा पिंकेट स्मिथ यांची नावे पुकारून सर्वाना धक्का दिला.