Current Affairs : 12 February 2021
तेलंगणाच्या मानसा वाराणसी मिस इंडिया

तेलंगणाच्या मानसा वाराणसीला मिस इंडिया 2020 चा खिताब मिळाला.
टॉप 3 मध्ये यावर्षी मिस इंडिया 2020 चा खिताब मानसा वाराणसीला मिळाला.
तर मिस इंडिया वर्ल्ड 2020 मान सिंहला देण्यात आला. तर, फेमिना मिस इंडिया 2020 रनर-अप मनिका शोकंद बनली.
हे मिस इंडिया 2020 चं 57 व आयोजन होतं
बिट्टू लघुपट ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीत

निर्माती एकता कपूरच्या ‘बिट्टू’ हा लघुपट २०२१ मधील ऑस्करच्या शर्यतीत आहे.
‘लाइव्ह ॲक्शन लघुपटा’च्या श्रेणीत हा लघुपट भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. सर्वोत्कृष्ट दहा लघुपटांमध्ये याचे नामांकन झाले आहे.
प्रचंड लोकप्रियता मिळवूनही मल्याळी चित्रपट ‘जल्लीकट्टू’ला ऑस्करच्या सर्वोत्कृष्ट चित्रपट श्रेणीत नामांकन मिळू शकले नाही आणि तो मानाच्या ९३ व्या ॲकॅडमी पुरस्कारांच्या स्पर्धेतून बाहेर पडला.
भारताव्यतिरिक्त अमेरिका आणि युरोपमध्ये इंग्रजी भाषांतर करुन ही फिल्म प्रदर्शित झाली होती.
युएईचे ‘होप’ यान पोहचले मंगळाच्या कक्षेत; कामगिरी करणारा पहिलाच अरब देश

संयुक्त अरब अमिरात अर्थात युएईनं मंगळाच्या कक्षेत पोहोचणारा जगातला पहिला अरब देश होण्याचा मान मिळवला आहे.
होप प्रोब (hope probe) असे या देशाच्या मंगळ मोहिमेचे नाव आहे.
तब्बल सहा वर्षांच्या अथक मेहनतीनंतर 200 मिलियन डॉलर्स खर्चून उभी केलेली ही मोहिम यशस्वी झाली.
युएईचे हे यान 1,20,000 किलोमीटर प्रती तास या वेगाने कार्यरत आहे.
मंगळाच्या गुरुत्वाकर्षण बलाशी समन्वय साधता यावा यासाठी युएईच्या वैज्ञानिकांनी अवकाश यानाचं इंजिन जवळपास 27 मिनिट सुरू ठेवले.
युएईचे होप यान पुढचे काही महिने मंगळ ग्रहाच्या वातावरणाचा अभ्यास करेल.
युएईच्या या मोहिमेचा अजून एक हेतू म्हणजे मंगळ ग्रहाचा पहिला ग्लोबल मॅप तयार करणे.
अफगाणिस्तानात लालंदर शतूत धरणासाठी भारताबरोबर सामंजस्य करार

अफगाणिस्तानात लालंदर शतूत धरणाच्या बांधकामासाठी भारताबरोबर सामंजस्य करार करण्यात आला.
करारावर परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. जयशंकर आणि अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री हनीफ आत्मर यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
हा प्रकल्प भारत आणि अफगाणिस्तानमधील नवीन विकास भागीदारीचा एक भाग आहे.
लालंदर शतूत धरण, काबूल शहराच्या पेयजलाची गरज भागवेल आणि जवळपासच्या भागात सिंचनासाठी पाणी उपलब्ध करुन देईल.
विद्यमान सिंचन व सांडपाणी जोडणीची पुनर्मांडणीही या धरणामुळे होईल. त्या भागातील पूर संरक्षण आणि व्यवस्थापनाबरोबरच त्या प्रदेशाला वीज पुरवेल.
अफगाणिस्तानात भारताकडून बांधले जाणारे हे दुसरे मोठे धरण आहे.
या धरणाचे उद्घाटन जून 2016 मध्ये केले होते.
अफगाणिस्तानच्या 34 प्रांतांमध्ये भारताने 400 हून अधिक प्रकल्प पूर्ण केले आहेत.