⁠  ⁠

चालू घडामोडी : १३ एप्रिल २०२०

Chetan Patil
By Chetan Patil 4 Min Read
4 Min Read

Current Affairs 13 April 2020

भारताचा आर्थिक विकास दर करोनामुळे घटणार

gdpnew

करोनाचा प्रसार रोखण्यासाठी लागू केलेल्या टाळेबंदीमुळे भारताची आर्थिक विकास कामगिरी खूप वाईट होणार आहे, असे जागतिक बँकेने म्हटले आहे.
भारताची अर्थव्यवस्था आता २०२०-२१ मध्ये १.५ टक्के ते २.८ टक्के विकास दर राखू शकेल.
जागतिक बँकेच्या दक्षिण आशियाविषयक आर्थिक अहवालात म्हटले आहे की, २०१९-२० मध्ये भारताचा आर्थिक विकास दर हा ३१ मार्चअखेर ४.८ ते ५ टक्के राहील पण नंतर करोना प्रसार रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे तो कमी होणार आहे. आर्थिक क्षेत्रातील कमकुवत कामगिरीने आधीच आर्थिक विकास दर खालावलेला असताना आता भारताला करोनाचा फटका बसला आहे.
आर्थिक वर्ष २१ मध्ये देशांतर्गत पुरवठा व मागणी या दोन्हीवर परिणाम झाला असून त्यामुळे आर्थिक विकासाला फटका बसणार आहे. जागतिक पातळीवर करोनाचा प्रसार असल्याने देशांतर्गत गुंतवणूकही कमी होणार आहे. २०२१-२२ मध्ये विकास दर पुन्हा पाच टक्के होऊ शकतो पण त्यातही आर्थिक शिस्त व पत धोरणात बदल करावे लागणार आहेत.

होणार काय?
आशियायी विकास बँकेने भारताचा आर्थिक विकास दर चालू आर्थिक वर्षांत ४ टक्के राहील असे म्हटले आहे, तर जी अँड पी रेटिंगने तो ५.२ टक्क्य़ांवरून ३.५ टक्क्य़ांपर्यंत खाली येईल असे म्हटले आहे. मुडीजने भारताचा आर्थिक विकास दर ५.३ टक्क्य़ांवरून २.५ टक्के होईल असे म्हटले आहे. दक्षिण आशियातील आठ देशांचा विकास दर सहा महिन्यांपूर्वी ६.३ टक्के वर्तवण्यात आला होता, पण आता तो १.८ ते २.८ टक्के राहील असे जागतिक बँकेने म्हटले आहे.

राजधानी दिल्लीत भूकंपाचे धक्के

earthquake-logo - Bhatkallys.com

करोनाचं संकट घोंगावत असताना राजधानी दिल्लीला रविवारी भूकंपाचे हादरे बसले. ३.५ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेनं हे धक्के जाणवले.
भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीप्रमाणे पूर्व दिल्लीत भूकंपाचा केंद्रबिदू होता. या भूकंपाची तीव्रता ३.५ रिश्टर स्केल इतकी होती. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्याचबरोबर मालमत्तेचं कुठल्याही प्रकारची नुकसान झालं नसल्यांच ‘एएनआय’नं दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. ‘रविवारी सायंकाळी ५.४५ वाजता हे भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता ३.५ रिश्टर स्केल इतकी होती,’ असं त्यांनी म्हटलं आहे.

करोनाचा फायदा घेत चीनने विकत घेतले HDFCचे १.७५ कोटी शेअर्स

आशियातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या चीनमधील पिपल्स बँक ऑफ चायनाने गृहकर्ज देणाऱ्या HDFC बँकेतील १.७५ कोटी शेअर्सची खरेदी केली आहे. शेअर बाजारातून मिळालेल्या आकडेवारीनुसार चीनच्या केंद्रीय बँकेने HDFC लिमिटेडमधील १, ७४,९२,९०९ शेअर विकत घेतले आहेत. हे शेअर्स कंपनीतील एकूण शेअरच्या एक टक्के इतके आहेत.
चीनच्या केंद्रीय बँकेने HDFC मधील शेअरसची विक्री तेव्हा केली, जेव्हा बँकेच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यानंतर आतापर्यंत बँकेच्या शेअर्समध्ये ४१ टक्क्यांची घसरण झाली आहे.
करोना व्हायरसमुळे जगभरातील शेअर बाजार कोसळत आहेत. अशावेळी चीनने मोठ्या देशातील कंपन्यांचे शेअर्स विकत घेण्यास सुरुवात केली आहे. गेल्या वर्षभरात चीनने पाकिस्तान आणि बांगलादेशसह आशियातील अन्य देशात मोठी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे.

BCCIच्या उपाध्यक्षांचा राजीनामा

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे उपाध्यक्ष महिम वर्मा यांनी राजीनामा दिला आहे. महिम हे क्रिकेट असोसिएशन ऑफ उत्तराखंडचे सचिव आहेत. महिम यांच्या राजीनाम्यावर लॉकडाऊन झाल्यानंतर निर्णय घेतला जाणार आहे.
२०१९ हे वर्ष उत्तराखंड क्रिकेटसाठी मोठे यश देणारे ठरले होते. ऑगस्ट २०१९ मध्ये क्रिकेट असोसिएशन ऑफ उत्तराखंडला बीसीसीआयकडून मान्यता मिळाली होती. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये असोसिएसनचे सचिव महिम हे बीसीसीआय बिनविरोध उपाध्यक्ष झाले.
महिम यांची बीसीसीआयच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सीएयूचे सचिवपद रिक्त झाले. सर्वसहमतीने हे पद भरण्याचा विचार होता. पण गटबाजीमुळे शक्य झाले नाही. त्यानंतर सचिवपदासाठी पुन्हा निवडणुका झाल्या आणि त्यात महिम विजयी झाली. महिम यांना बीसीसीआयमधील उपाध्यक्षपद किंवा सीएयूमधील सचिवपद यापैकी एकाची निवड करायची होती. महिम यांनी उपाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे ठरवले.

Share This Article