चालू घडामोडी – १४ ऑगस्ट २०१६
देश-विदेश
सम्राट रिटायर होतोय..
# जपानमध्ये लोकशाही मार्गाने सत्तेवर आलेले सरकार कार्यरत असले तरी देशाचा कारभार सम्राटांच्या नावाने चालवला जातो. सध्याचे सम्राट अकिहितो यांचे वय ८२ वर्षे असून त्यांना आता प्रकृती अस्वास्थ्यामुळे राज्यकारभारात प्रत्यक्ष लक्ष घालणे अवघड वाटू लागले आहे. त्यांच्यावर २००३ साली प्रोस्टेट ग्रंथीच्या कर्करोगासाठी उपचार करण्यात आले होते, तर २०१२ साली त्यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया झाली. गेल्या सोमवारी त्यांनी टीव्हीवरून भाषण करून निवृत्तीची इच्छा प्रकट केली.
वांग यी-सुषमा स्वराज चर्चेत ‘एनएसजी’ सदस्यत्वाचा मुद्दा
# चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्याचप्रमाणे यी यांनी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याशी चर्चा केली. त्या वेळी भारताचे अण्वस्त्र पुरवठादार देशांच्या गटाचे (एनएसजी) सदस्यत्व मिळविण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न आणि प्रादेशिक आणि एकमेकांशी निगडित असलेले प्रश्न उपस्थित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. वार्षिक ब्रिक्स शिखर परिषद यंदा ऑक्टोबरमध्ये भारताच्या वतीने गोव्यात आयोजित केली जाणार असून त्याबाबतही वांग आणि स्वराज यांनी चर्चा केली. दोन्ही देशांच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असलेल्या विषयांवर स्वराज यांनी वांग यांच्याशी चर्चा केली, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी सांगितले.
[edsanimate_start entry_animation_type= “fadeIn” entry_delay= “0” entry_duration= “1” entry_timing= “linear” exit_animation_type= “” exit_delay= “” exit_duration= “” exit_timing= “” animation_repeat= “infinite” keep= “yes” animate_on= “load” scroll_offset= “” custom_css_class= “”]स्पर्धा परीक्षांचे अपडेट आपल्या मोबाईलवर मोफत मिळवा! अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.[edsanimate_end]
अतुलनीय देशसेवेसाठी ८२ जणांना शौर्य पुरस्कार
# स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी अतुलनीय देशसेवेसाठी ८२ जणांना शौर्य पुरस्कार जाहीर केले आहेत. भारताच्या ७० व्या स्वांतत्र्यदिनाच्या औचित्यावर सशस्त्र सेना कर्मचारी आणि निमलष्करी दलांच्या सदस्यांना शौर्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्कारांमध्ये एक अशोक चक्र, १४ शौर्य चक्र, ६३ सेना पदकं, दोन नौसेना पदकं आणि दोन वायुसेना पदकांचा समावेश आहेत. हवालदार हंगपन दादा यांना मरणोत्तर अशोक चक्राने सन्मानित करण्यात येणार आहे.
दिल्ली आकाशवाणीवरील मराठी बातमीपत्रे रद्द
# पुण्यासह अन्य सहा शहरांमधील आकाशवाणीचे प्रादेशिक वृत्त विभाग बंद करण्याचा ‘धोरणात्मक निर्णय’ जनमताच्या रेटय़ाने स्थगित करण्याचा निर्णय घेण्याची वेळ केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयावर आली असतानाच आता दिल्ली आकाशवाणीवरून प्रसारित होणारी मराठीतील राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय बातमीपत्रे रद्द करण्याचा निर्णय ‘प्रसारभारती’ने घेतला आहे. या फेररचनेच्या निर्णयानुसार, दिल्ली केंद्रातील मराठीचा राष्ट्रीय वृत्त विभाग आता मुंबईत हलविण्यात येणार आहे.
क्रीडा
अमेरिकेने ऑलिंपिकमध्ये जिंकली 1000 सुवर्ण
# रिओ – ऑलिंपिक स्पर्धांमध्ये पदक तालिकेत कायमच आपले वर्चस्व कायम असलेल्या अमेरिकेने आतापर्यंत तब्बल एक हजार सुवर्णपदके जिंकण्याची कामगिरी केली आहे. रिओ ऑलिंपिक स्पर्धेमध्ये जलतरणात अमेरिकेने महिलांच्या 4 बाय 100 मीटर मिडले रिले प्रकारात सुवर्णपदक जिंकत ऑलिंपिक स्पर्धांमधील हजारावे सुवर्णपदक मिळविले. अमेरिकेसाठी पहिले सुवर्णपदक 1896 च्या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये तिहेरी उडी प्रकारात जेम्स कोन्नोलीने मिळविले होते. त्यानंतर अमेरिकेचा सुवर्णपदके मिळविण्याचा धडाका सुरूच आहे. यंदाच्या ऑलिंपिकमध्ये आतापर्यंत अमेरिकेने 24 सुवर्णांसह 61 पदके मिळविलेली आहेत. जलतरणात अमेरिकेने 16 सुवर्णपदाकांसह 33 पदके मिळविली आहेत. लंडन ऑलिंपिकमध्येही जलतरणात अमेरिकेने एवढीच पदके मिळविली होती.
[edsanimate_start entry_animation_type= “fadeIn” entry_delay= “0” entry_duration= “1” entry_timing= “linear” exit_animation_type= “” exit_delay= “” exit_duration= “” exit_timing= “” animation_repeat= “infinite” keep= “yes” animate_on= “load” scroll_offset= “” custom_css_class= “”]स्पर्धा परीक्षांचे अपडेट आपल्या मोबाईलवर मोफत मिळवा! अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.[edsanimate_end]
Sir mi fybsc ya class madhe ahe mala mpsc cha study karayacha ahe mi ata konti book vachu