⁠  ⁠

चालू घडामोडी : १४ डिसेंबर २०२०

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

Current Affairs : 14 December 2020

पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचं निधन

Shripati Khanchnale

महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातलं मोठं नाव आणि पहिला मानाचा हिंदकेसरी किताब पटकावणारे श्रीपती खंचनाळे यांचं निधन झालं आहे. ते ८६ वर्षांचे होते.
खंचनाळे हे मुळचे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील एकसंबा या भागातले…१९५९ साली पंजाब केसरी बनाता सिंगला धोबीपछाड देत श्रीपती खंचनाळे यांनी हिंदकेसरची गदा पटकावत कोल्हापूरचं नाव उज्वल केलं.
याच वर्षात खंचनाळे यांनी कराड येथे झालेल्या महाराष्ट्र केसरीचंही विजेतेपद पटकावलं होतं. १९५८, १९६२ आणि १९६५ साली झालेल्या ऑल इंडिया चॅम्पिअनशीप स्पर्धेची विजेतेपदही खंचनाळे यांनी पटकावली होती.
श्रीपती खंचनाळे यांच्यावर उपचार सुरु असताना कोल्हापूरचे आमदार ऋतुराज पाटील यांनी क्रीडामंत्री सुनिल केदार यांच्याकडे पाठपुरावा करत त्यांच्या उपचारासाठी सरकारकडून ५ लाखांची मदत मिळवून दिली होती.

दुबई आयटीएफ टेनिस स्पर्धा : अंकिताला दुहेरीचे विजेतेपद

spt03

भारताची अव्वल टेनिसपटू अंकिता रैनाने दुबई येथील अल हबतूर चॅलेंज या ‘आयटीएफ’ प्रकारातील दुहेरीचे विजेतेपद पटकावले.
अंकिताने चालू वर्षांत पटकावलेले हे दुहेरीतील तिसरे विजेतेपद ठरले.
अंकिताने जॉर्जियाच्या इकॅटरिन जॉजरेझेच्या साथीने खेळताना स्पेनची अ‍ॅलिओना झॅडोइनोव आणि स्लोव्हाकियाची काजा जुवान या जोडीचा ६-४, ३-६, १०-६ असा पराभव केला. अंकिताची या हंगामात दुहेरीची अंतिम फेरी गाठण्याची ही चौथी वेळ ठरली. मात्र तिचे हे या हंगामातील सर्वोच्च विजेतेपद हे दुबईमधील ठरले.
अंकिताने याआधी फेब्रुवारीमध्ये थायलंड येथील नोनथाबुरी येथे सलग दोन विजेतेपदे दुहेरी प्रकारात पटकावली होती. त्यापाठोपाठ जोधपूर येथेही अंकिताने स्नेहल मानेसोबत ‘आयटीएफ’ स्पर्धेत उपविजेतेपद मिळवले होते.

इस्रो अध्यक्ष डॉ. के. सिवन यांना “सूर्यभूषण आंतरराष्ट्रीय पुरस्कार’

भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष डॉ. के. सिवन यांना सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने ‘सूर्यभूषण आंतरराष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

mpsc telegram channel

Share This Article