Current Affairs : 15 December 2020
प्राेजेक्ट-१७एची पहिली युद्धनौका हिमगिरी लाँच
देशात प्रोजेक्ट-१७ एअंतर्गत निर्मित आयएनएस हिमगिरी या युद्धनौकेचे सोमवारी जलावतरण करण्यात आले.
कोलकातामधील या कार्यक्रमाला सीडीएस जनरल बिपिन रावत उपस्थित होते. आता तिच्या पुढील चाचण्या होतील. शत्रूच्या रडारच्या कक्षेत न येणाऱ्या अशा ३ युद्धनौका आता तयार केल्या जात आहेत.
बिहार सरकार पदवीधर मुलींना देणार प्रत्येकी ५० हजार रुपये!
बिहारमध्ये पुन्हा सत्तेत आल्यास पदवीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींना प्रत्येकी ५० हजार रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केली होती.
मुख्यमंत्री पदवीधर विद्यार्थिनी प्रोत्साहन योजनेअंतर्गत राज्यातील लाभार्थी मुलींच्या बँक खात्यात प्रत्येकी ५० हजार रुपये जमा करण्यासाठीचा प्रस्ताव बिहारच्या शिक्षण विभागाने तयार केल्याचं समजतं.
१.५० लाख पदवीधर विद्यार्थिनींना होणार लाभ
उच्च शिक्षण संचालनालयातील एका अधिकाऱ्यांने दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री पदवीधर विद्यार्थिनी पदवीधर योजनेतील यंदाच्या वाढीव मदतीमुळे याचा राज्यातील जवळपास १.५० लाख विद्यार्थिंनींना फायदा होणार आहे.
याआधी पदवीधर विद्यार्थिंनीना २५ हजार रुपयांपर्यंतच्या मदतीची तरतूद होती.
बहुराष्ट्रीय कंपन्यात जीनपींग यांचे 20 लाख हस्तक
चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचे सुमारे 20 लाख सदस्यांनी जगातील सर्वात मोठ्या कंपन्या, बॅंका, माध्यम समूह, विद्यापीठे आणि सरकारी यंत्रणात शिरकाव केल्याची स्फोटक माहिती उघड झाली आहे.
“दि ऑस्ट्रेलियन’ या दैनिकाच्या हाती ही माहिती लागली असून त्यात या 20 लाख लोकांची नावे त्यांचे पक्षातील स्थान, जन्मतारीख, त्यांचा राष्ट्रीयत्व क्रमांक आणि वंश यांची माहिती असल्याचा गौप्यस्फोट करण्यात आला.
बोईंग, वोक्सवॅगन यांसारख्या मोठ्या कंपन्या, पीफायझर आणि ऑस्ट्राझेन्का सारख्या औषध कंपन्या आणि एएनझेड आणि एचएसबीसी सारख्या मोठ्या बॅंकामध्ये हे हस्तक पेरले आहेत. एचएसबीसी आणि स्टॅंडर्ड चार्टर बॅंकेत तब्बल 600 कर्मचारी चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य आहेत.