Current Affairs : 15 February 2021
जगातील सर्वात प्राचीन बिअर फॅक्टरी; 5 हजार वर्षापूर्वीचं रहस्य उघड
एका संशोधनात इजिप्तमध्ये एका पुरातन बिअर फॅक्टरीच्या अवशेषांचा शोध लागला आहे. ही बिअर फॅक्टरी 5 हजार वर्ष जुनी असल्याचा अंदाज पुरातत्व विभागातील संशोधकांनी व्यक्त केला आहे.
एबिडोस इथल्या दफनभूमीत इजिप्त आणि अमेरिकेच्या पुरातत्वशास्त्रज्ञांनी उत्खननाचं काम हाती घेतलं आहे. या दफनभूमीत उत्खनन करत असताना काही पुरातन अवशेष हाती लागले असल्याची माहिती इजिप्तच्या पर्यटन विभागाकडून देण्यात आली आहे.
उत्खननात सापडलेल्या बिअर फॅक्टरीचा फोटो इजिप्त सरकारनं शेअर करत ही माहिती दिली आहे.
एबिडोस इथल्या उत्खननादरम्यान ४0 मोठी मातीची भांडी सापडली आहेत. दोन रांगांमध्ये ही मातीची भांडी रचून ठेवल्याचं आढळून आलं. इजिप्त आणि अमेरिकेतील पुरातत्व शास्त्रज्ञांचं पथक एबिडोसच्या दफनभूमीत उत्खनन करत असताना मातीच्या भांड्यांचे अवशेष त्यांच्या हाती लागले.
संयुक्त राष्ट्र सरचिटणीसपदासाठी आकांक्षा अरोरा यांची उमेदवारी
संयुक्त राष्ट्रातील भारतीय वंशाच्या कर्मचारी आकांक्षा अरोरा (वय ३४) यांनी सरचिटणीसपदासाठी उमेदवारी जाहीर केली असून सध्याचे सरचिटणीस अँतोनियो गट्रेस हेही पुन्हा पाच वर्षांसाठी या पदाची निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.
जानेवारी २०२२ पासून संयुक्त राष्ट्र संघटनेच्या नवीन प्रमुखांचा कार्यकाल सुरू होणार आहे.
अरोरा या संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम विभागातील लेखा समन्वयक आहेत. त्यांनी ‘अरोरा फॉर एसजी’ या हॅशटॅगने प्रचार मोहीम सुरू केली आहे.
गेल्या ७५ वर्षांत संयुक्त राष्ट्रांनी कुठलीच आश्वासने पूर्ण केली नाहीत. निर्वासितांचे संरक्षण केले नाही.
गेल्या महिन्यात अँतोनियो गट्रेस (वय ७१) यांनी उमेदवारी जाहीर केली असून ते पुढील पाच वर्षे या पदासाठी इच्छुक आहेत.
गट्रेस यांची मुदत या वर्षी ३१ डिसेंबरला संपत असून नवीन सरचिटणीस १ जानेवारी २०२२ रोजी पदभार स्वीकारतील. गट्रेस हे २०१७ पासून सरचिटणीस पदावर आहेत.
खगोल शास्त्रज्ञांनी शोधून काढले नवीन ग्रहमालेतील तीन ‘ग्रह’
आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रज्ञांच्या पथकाने आपल्या पृथ्वीच्या वातावरणापेक्षा मोठ्या आकाराचे आणि आपल्या सूर्यापेक्षा कमी वयाचे सूर्याभोवती फिरणाऱ्या तीन ग्रह शोधून काधले आहेत. आपल्या आकाशगंगेने पृथ्वीच्या अवकाशातील एकतृतीयांश अवकाश व्यापले आहे. त्या आकाशगंगेच्या 3 टक्क्यांपेक्षाही कमी तारे असलेली मीन-एरिडॅनस स्ट्रीम नावाची आकाशगंगा अलिकडेच शोधून काढली गेली आहे.
याच आकाशगंगेमध्ये हे तीन सूर्य आहेत. या नव्याने शोधून काढलेल्या सूर्यमालेबद्दलची माहिती “ऍस्ट्रोनॉमिकल जर्नल’मध्ये सविस्तरपणे देण्यात आली आहे. या आकाशगंगेबद्दल अधिक सखोल संशोधन होणे बाकी आहे. त्यातील ग्रहांबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी संशोधक प्रयत्नशील आहेत.
नासाच्या “ट्रान्सिटिंग एक्सप्लोप्नेट सर्व्हे सॅटेलाईट अर्थात ‘टिस’ ने ऑक्टोबर ते डिसेंबर 2018 च्या दरम्यान या सूर्यमालेतील ग्रहांची छायाचित्रे घेतली होती.
या सूर्यमालेतील सूर्याला “टीओआय 451′ असे नाव देण्यात आले आहे. हा सूर्य आणि त्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांबाबत 2019 आणि 2020 च्या दरम्यान नासाच्या स्पित्झर स्पेस टेलिस्कोपच्या माध्यमातून निरीक्षण केले गेले होते. ही खगोलशास्त्रीय दुर्बिण आता संशोधन कार्यातून निवृत्त झाली आहे. या दुर्बिणीव्यतिरिक्त अन्य साधनांद्वारेही या ग्रहांचे निरीक्षण केले गेले होते.
या ग्रहांवर अतिथंड वातावरण, धूळ आणि खडकाळ पृष्ठभाग असल्याचे “नासा’च्या “नीअर अर्थ ऑब्जेक्ट वाईड फिल्ड इन्फ्रारेड सर्व्हे एक्सप्लोनर’ अर्थात “निओवाईज’ या उपग्रहाने केलेल्या निरीक्षणात आढळले आहे. याशिवाय “टीओआय-451′ या ताऱ्याभोवती फिरत असलेले दोन लहान तारेही असल्याचेही अन्य निरीक्षणात आढळले आहे. या ग्रहमालेबद्दल अद्याप बरीच माहिती मिळवावी लागेल, असे अमेरिकेच्या न्यू हॅम्पशायरच्या हॅनोव्हरमधील डार्टमाउथ कॉलेजमधील सहाय्यक प्राध्यापक मुख्य संशोधक एलिझाबेथ न्यूटन यांनी सांगितले.