तब्बल साडेचार अब्ज वर्षांपूर्वीचा दगड सापडला
दक्षिण आफ्रिकेतील सर्वात मोठ्या सहारा वाळवंटात शास्त्रज्ञांना तब्बल साडेचार अब्ज वर्षांपूर्वीचा दगड सापडला आहे.
या दगड एका उल्कापिंडाचा हिस्सा असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
या दगडाला शास्त्रज्ञांनी इसी ००२ असे नाव दिले असून आतापर्यंत सापडलेला हा सर्वात पुरातन दगड आहे.
एखाद्या ग्रहाचा हा हिस्सा असावा असेही मानले जात आहे.
अंतराळात फिरत असताना पृथ्वीच्या गुरत्वकर्षणामुळे तो पृथीववर आदळला असावा या दगडाचे वय पृथ्वीच्या वयापेक्षा जास्त आहे. म्हणजेच पृथ्वीच्या निर्मितीपूर्वी हा दगड अंतराळात फिरत होता पण तो पृथ्वीवर कधी पडला याचे उत्तर शास्त्रज्ञांना मिळत नाही ते शोधण्याचा प्रयत्न सुरु आहेत.
सध्याच्या सौरमंडळाची निर्मिती कशी झाली याचा अजून शोध घेण्यासाठी हा दगड महत्वाचा ठरणार आहे. मॅग्नेशियम आणि ऍल्युमिनिअम तपासणीच्या माध्यमातून या दगडाचे वय साडेचार अब्ज ठरवण्यात आले आहे.
मोदी सत्तेत आल्यापासून भारतामधील स्वातंत्र्य कमी झाले; ‘ग्लोबल फ्रीडम’चा अहवाल
अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये असणाऱ्या फ्रीडम हाऊसने स्वातंत्र्यासंदर्भात भारताच्या मानांकनामध्ये कपात केलीय.
भारतामधील स्वातंत्र्याचा स्तर आता पूर्णपणे स्वतंत्र वरुन अंशत: स्वतंत्रवर आणण्यात आला आहे.
नागरिकांना देण्यात आलेले हक्क आणि नागरिक स्वातंत्र्य हे २०१४ साली नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून नष्ट होत असल्याचं फ्रीडम हाऊसने म्हटलं आहे.
खास करुन मुस्लिमांवर होणारे हल्ले, देशद्रोहाच्या कायद्याचा होणारा वापर, सरकारने करोना परिस्थिती हाताळताना केलेला लॉकडाऊन या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर भारतातील स्वातंत्र्यावर गदा आल्याचं फ्रीडम हाऊसने नमूद केलं आहे.
स्वातंत्र्याच्या बाबतीत भारताला देण्यात आलेले गुण हे ७१ वरुन कमी करुन ६७ करण्यात आले आहेत. जगातील २११ देशांमध्ये भारताचा क्रमांक ८८ वा आहे. यापूर्वी भारत या यादीमध्ये ८३ व्या स्थानावर होता. म्हणजेच स्वातंत्र्याच्या बाबतीत भारताची पाच स्थानांनी घसरण झाली आहे.
फ्रीडम हाऊसने प्रकाशित केलेल्या वार्षिक अहवालामध्ये, “मोदींच्या हिंदू राष्ट्रवादी सरकारने मानवी हक्कासांठी लढणाऱ्या संस्थावर दबाव टाकला. वेगवगेळ्या विषयांचे जणकार आणि पत्रकारांना धमकावण्याचे प्रकार घडले. कट्टरतावाद्यांकडून होणाऱ्या हल्ल्यांचे प्रमाण वाढले. यामध्ये झुंडबळी आणि मुस्लिमांवर होणाऱ्या हल्ल्याचाही समावेश आहे. स्वतंत्र देशांच्या यादीमध्ये २०१९ साली मोदी पुन्हा निवडून आल्यानंतर भारताची आणखीन घसरण झाली. त्यानंतर २०२० साली ज्या पद्धतीने भारत सरकारने करोनाची परिस्थिती हाताळली त्यादरम्यान मूलभूत हक्कांचे उल्लंघन झालं,” असं नमूद करण्यात आलं आहे.
२७ वर्षीय भवानी ऑलिम्पिक पात्र ठरणारी भारताची पहिली तलवारबाजपटू
भारतीय तलवारबाजपटू भवानी देवी टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली. ती ऑलिम्पिक खेळणारी भारताची पहिली तलवारबाजपटू बनेल.
तिने क्रमवारीच्या आधारे ऑलिम्पिक कोटा मिळवला. हंगेरीत ११ ते १४ मार्चदरम्यान आयोजित जीकेके जागतिक कप स्पर्धेतनंतर तिची जागतिक क्रमवारी ४२ झाली.
ती वैयक्तिक सेबर प्रकारात देशाचे प्रतिनिधित्व करेल. कोटा ५ एप्रिलच्या क्रमवारीनंतर घोषित केला जाईल.