⁠  ⁠

चालू घडामोडी : १५ सप्टेंबर २०२०

Chetan Patil
By Chetan Patil 3 Min Read
3 Min Read

Current Affairs : 15 September 2020

भारताचा ‘इसीओएसओसी’मध्ये समावेश

भारताने चीनवर मात करत आर्थिक आणि सामाजिक परिषदची संस्था ‘युनायटेड नेशन कमिशन ऑफ ऑन स्टेटस ऑफ वुमन’ या संस्थेचा सदस्य म्हणून भारताची निवड करण्यात आली.
संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टीएस तिरूमूर्ती यांनी ही माहिती दिली. भारत, अफगाणिस्तान आणि चीन या तीन देशांनी कमिशन ऑन स्टेटस ऑफ वुमनसाठी निवडणूक लढवली होती.
प्रतिष्ठीत’युनायटेड नेशन कमिशन ऑफ ऑन स्टेटस ऑफ वुमन’ या संस्थेचा सदस्यत्व भारताने मिळवले आहे.
भारताची कमिशन ऑन स्टेटस ऑफ वुमनच्या (सीएसडब्ल्यू) सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.
भारत, अफगाणिस्तान आणि चीन या तीन देशांनी कमिशन ऑन स्टेटस ऑफ वुमनसाठी निवडणूक लढवली होती. यामध्ये भारत आणि अफगाणिस्तानने 54 सदस्यांच्या मताद्वारे विजय मिळवला.
यामध्ये चीनला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. चीनला या प्रक्रियेत अर्धीदेखील मते मिळाली नाहीत.

थिएम यूएस ओपनचा चॅम्पियन; ट्राॅफी जिंकणारा पहिला ऑस्ट्रियाचा टेनिसपटू

अाॅस्ट्रियाचा टेनिसपटू डाेमिनिक थिएम यंंदाच्या अमेरिकन अाेपनमध्ये चॅम्पियन ठरला. त्याने पुरुष एकेरीच्या किताबावर नाव काेरले.
या २७ वर्षीय टेनिसपटूने फायनलमध्ये जर्मनीच्या अलेक्झांडर ज्वेरेवला पराभूत केले. यासाठी त्याला चार तास दाेन मिनिटे पाच सेटपर्यंत शर्थीची झंुज द्यावी लागली. मात्र, त्याने सरस खेळी करताना २-६, ४-६, ६-४, ६-३, ७-६ ने राेमहर्षक विजयाची नाेंद केली.
त्याला करिअरमध्ये पहिल्यांदाच ग्रँडस्लॅम चॅम्पियन हाेण्याचा पराक्रम गाजवता अाला. त्याने यापूर्वी तीन वेळा ग्रँडस्लॅमसाठी फायनल गाठली. मात्र, त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
थिएमच्या रूपाने अाॅस्ट्रियाला पहिला ग्रँडस्लॅम किताब विजेता टेनिसपटू मिळाला अाहे. ग्रँडस्लॅम चॅम्पियन हाेणारा थिएम हा १५० वा टेनिसपटू ठरला.
सहा वर्षांत ग्रँडस्लॅम किताब जिंकणारा ताे पहिला टेनिसपटू ठरला.यापूर्वी २०१४ मध्ये क्राेएशियाच्या मरीन सिलिचने हा पराक्रम गाजवला हाेता.

आग्र्यातील मुघल संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2020 Know His Great Thoughts - Shivaji  Maharaj Jayanti 2020: जानिए छत्रपति शिवाजी महाराज के वो सात प्रेरणास्रोत  वचन - Amar Ujala Hindi News Live

अलाहाबादचं नामांतर प्रयागराज, फैजाबाद बनलं अयोध्या, मुघलसरायचं नाव बदलून दीनदयाल उपाध्याय नगर आणि आता आग्र्याच्या मुघल म्युझियमचं नाव छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम केलं जाणार आहे.
योगी आदित्यनाथ सरकारने आग्र्यात बनत असलेल्या मुघल म्युझियमचं नाव बदललं आहे. आता हे म्युझियम छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम नावाने ओळखलं जाईल.

जीडीपी नऊ टक्क्यांनी घटणार

gdp

लॉकडाऊन व कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे अनिश्चिततेचे सावट दीर्घकालिन राहणार आहे. भारतात गुंतवणुकीवर व क्रयशक्तीवर दीर्घकाळापर्यंत विपरीत परिणाम राहणार आहे.
परिणामी आर्थिक वर्ष २०२० ते २१ मध्ये देशाची अर्थव्यवस्था तब्बल नऊ टक्क्यांनी आकुंचन पावणार असल्याचा अंदाज एस अँड पी ग्लोबल रेटिंग्ज या पतनिर्धारण संस्थेने व्यक्त केला आहे.
मार्च ते जून २०२० या कालावधीत गेल्या वर्षीच्या याच काळाच्या तुलनेत भारताची अर्थव्यवस्था तब्बल २३.९ टक्क्यांनी घसरली.
कोरोनाची जागतिक महामारी, तिला आळा घालण्यासाठी केलेला लॉकडाऊन यामुळे खासगी क्षेत्रातील एकूण खरेदीक्षमता तब्बल २६.७ टक्क्यांनी घटली, तर स्थिर गुंतवणूक ४७.१ टक्क्यांनी घसरली. मात्र समाधानकारक पावसामुळे कृषि क्षेत्रामध्ये वाढ झाल्यामुळे अर्थव्यवस्थेच्या घसरणीला थोडाफार चाप बसल्याचेही या कालावधीत दिसून आले आहे.

Share This Article