चालू घडामोडी – १६ ऑगस्ट २०१६
देश-विदेश
जगातील पहिला हॅकिंगमुक्त क्वांटम उपग्रह चीन पाठवणार
# चीनने जगातील पहिला पुंज संदेशवहन उपग्रह (क्वांटम कम्युनिकेशन सॅटेलाईट) पाठवण्याचे ठरवले असून त्यामुळे वायर टॅपिंग व कॉल चोरून ऐकणे असे प्रकार करता येणार नाहीत. त्याच्या मार्फत होणाऱ्या संदेशवहनातील माहिती हॅकिंगपासून सुरक्षित राहणार आहे. जर उपग्रहाने चांगले काम केले तर हॅकिंगमुक्त संदेशवहन प्रणाली उपलब्ध होईल, असे शिनहुआ या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. हा उपग्रह काही दिवसांत सोडला जाणार आहे. जुलै २०१५ मध्ये क्वांटम कॉम्प्युटिंग प्रयोगशाळा चीन विज्ञान अकादमी व शांघायची इंटरनेट कंपनी अलिबाबा यांनी तयार केली आहे. ही प्रयोगशाळा क्वांटम संगणकाचे प्रारूप तयार करीत असून त्याची गणन क्षमता ५० ते १०० क्वांटम बीट असेल. तो संगणक २०३० पर्यंत तयार होईल. गतिमान गणनातही धोका असतो कारण पारंपरिक संगणकातील सर्व माहिती त्यामुळे चोरता येते, पण पुंज यांत्रिकीमध्ये माहितीचे संरक्षण केले जाते, त्यात फोटॉन कणांमध्ये माहिती साठवलेली असते त्यामुळे ती वेगळी काढता येत नाही किंवा त्याची नक्कलही करता येत नाही. त्यामुळे वायरटॅप किंवा माहितीची चोरी हे दोन्ही प्रकार यात शक्य नसतात.
‘पाकिस्तानमध्ये जाणे नरकात जाण्यासारखेच’
# भारताचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी पाकिस्तानची तुलना नरकाशी केली आहे. पाकिस्तानमध्ये जाणे म्हणजे नरकात जाण्यासारखेच आहे अशी टीका त्यांनी केली. भारताच्या स्वातंत्र्य दिनादिवशी सिमेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जवानांनी पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते, या घटनेचा निषेध करताना ते म्हणाले की भारतीय जवानांनी पाच दहशतवाद्यांना परत पाठवले. पाकिस्तानात जाणे आणि नरकात जाणे हे एकसारखेच आहे. पाकिस्तानला मोठ्या कारवाया करण्यात यश येत नाही, त्यामुळे ते असे छोटे हल्ले करत आहेत अशी परखड टीका देखील त्यांनी केली आहे.
[edsanimate_start entry_animation_type= “fadeIn” entry_delay= “0” entry_duration= “1” entry_timing= “linear” exit_animation_type= “” exit_delay= “” exit_duration= “” exit_timing= “” animation_repeat= “infinite” keep= “yes” animate_on= “load” scroll_offset= “” custom_css_class= “”]स्पर्धा परीक्षांचे अपडेट आपल्या मोबाईलवर मोफत मिळवा! अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.[edsanimate_end]
आसामपाठोपाठ बिहारचा ‘जीएसटी’ला हिरवा कंदील
# गुवाहाटी – आसामपाठोपाठ आता बिहार विधानसभेने वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) घटनादुरुस्ती विधेयकास सार्वमताने मंजुरी दिली आहे. शुक्रवारी आसाम विधानसभेत विधेयक सार्वमताने मंजुर करण्यात आले होते. जीएसटी विधेयकावर चर्चा करण्यासाठी बिहार विधानसभेत एकदिवसीय सत्र आयोजित करण्यात आले होते. राज्यातील सत्ताधारी पक्ष जदयू, आरजेडी आणि काँग्रेसने विधेयकास पाठिंबा दिला. परंतु मार्क्सवादी-लेनिनवादी पक्षाच्या सदस्यांनी विधेयकाला तीव्र विरोध करत सभागृहातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. जीएसटी विधेयक राज्यासाठी तसेच केंद्रासाठी फायदेशीर असल्याचे मत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी यावेळी व्यक्त केले.
रेल्वे अर्थसंकल्प इतिहासजमा होणार
# देशाच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या रेल्वेचा अर्थसंकल्प आता इतिहासजमा होणार आहे. ९२ वर्षांची ही परंपरा २०१७ पासून खंडित होणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचा रेल्वे अर्थसंकल्प सामान्य अर्थसंकल्पात विलीन करण्याचा प्रस्ताव केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्वीकारल्यामुळे पुढील आर्थिक वर्षांपासून रेल्वे अर्थसंकल्प सादर करण्यात येणार नाही. ९२ वर्षांची मोठी परंपरा असणारा रेल्वे अर्थसंकल्प आता पुढील वर्षांपासून सादर करण्यात येणार नाही. सुरेश प्रभू यांनी रेल्वे अर्थसंकल्प सामान्य अर्थसंकल्पामध्ये विलीन करण्याची मागणी केली होती. त्यांची ही विनंती अर्थ मंत्रालयाने स्वीकारली आहे.
कराड-चिपळूण रेल्वे मार्गाबाबत करार
# कोकण रेल्वे आणि शापूरजी पालनजी यांच्यात कराड-चिपळूण रेल्वे मार्गाबाबत करार झाला. हा मार्ग १०४ कि.मी. लांबीचा आहे. यात दहा रेल्वे स्थानके तसेच १९ बोगदे आहेत. कुंभार्ली बोगदा सर्वाधिक लांबीचा आहे. खेरडी, मुंढे, कोयना रोड, येराड, पाटण, नाडे, मल्हार पेठ, साकुर्डी आणि कराड असे थांबे असतील. खर्चापकी कंपनीचा वाटा ७४ टक्के तर राज्य आणि केंद्राचा वाटा २६ टक्के असा आहे. यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण जोडले जाणार आहे.
क्रीडा
मरेला ऐतिहासिक दुसरे सुवर्ण
# इंग्लंडचा टेनिसपटू अँडी मरेने ऑलिम्पिकमध्ये पुरुष एकेरीत दुसरे सुवर्णपदक पटकावताना इतिहास रचला. रोमांचक झालेल्या अंतिम फेरीत मरेने अर्जेटिनाच्या ज्युआन मार्टिन डेल पोट्रोवर ७-५, ४-६, ६-२, ७-५ असा विजय मिळवत सुवर्णपदकाला गवसणी घातली. मरेने २०१२च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावले होते. तब्बल चार तास चाललेल्या या सामन्यात डेल पोट्रोने मरेला चांगली लढत दिली. पण मरेने अनुभव पणाला लावत हा अंतिम सामना जिंकला. कांस्यपदकाच्या लढतीत स्पेनच्या राफेल नदालला पराभूत करून केई निशिकोरीने जपानला टेनिसमधील शतकातले पहिले पदक मिळवून देण्याचा मान पटकावला. या सामन्यात निशिकोरीने नदालला ६-२, ६-७ (१-७), ६-३ असे पराभूत केले. यापूर्वी जपानने १९२० साली पुरुष एकेरी आणि दुहेरीमध्ये रौप्यपदक पटकावले होते.
१०० मीटर शर्यतीत सुवर्णपदकाची हॅटट्रिक
# जमैकाचा धावपटू उसेन बोल्ट याने रिओ ऑलिम्पिकमधील १०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक मिळवले आहे. या सुवर्णपदकासह बोल्टने ऑलिम्पिक सुवर्णपदकांची हॅटट्रिक साधली आहे. बोल्टने ही शर्यत ९.८१ सेकंदात पूर्ण केली. या शर्यतीत बोल्टपुढे अमेरिकेच्या जस्टीन गॅटलिन याचे तगडे आव्हान होते. मात्र, बोल्टने आपल्या लौकिकाला जागत सुवर्णपदकाचाल गवसणई घातली. शंभर मीटर शर्यतीचे सुवर्णपदक हे खेळाडूला जागतिक ओळख मिळवून देतो. त्यात विश्वविक्रम प्रस्तापित करणे म्हणजे अमरत्व मिळवणे. त्यामुळेच जगातील दिग्गज धावपटू आपले सर्वस्व पणाला लावतात.
[edsanimate_start entry_animation_type= “fadeIn” entry_delay= “0” entry_duration= “1” entry_timing= “linear” exit_animation_type= “” exit_delay= “” exit_duration= “” exit_timing= “” animation_repeat= “infinite” keep= “yes” animate_on= “load” scroll_offset= “” custom_css_class= “”]स्पर्धा परीक्षांचे अपडेट आपल्या मोबाईलवर मोफत मिळवा! अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.[edsanimate_end]