⁠  ⁠

चालू घडामोडी – १७ ऑगस्ट २०१६

Tushar Bhambare
By Tushar Bhambare 5 Min Read
5 Min Read

देश-विदेश

पुरोहित आसामचे तर हेपतुल्ला मणिपूरच्या राज्यपालपदी
# केंद्र सरकारने बुधवारी पंजाब, मणिपूर, आसाम, अंदमान आणि निकोबर या चार राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे. माजी केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री नजमा हेपतुल्ला यांची मणिपूर, नागपूरचे माजी खासदार बनवारीलाल पुरोहित यांची आसाम, माजी खासदार व्ही. पी. सिंह बडनोर यांची पंजाबच्या तर दिल्लीचे माजी आमदार प्रो. जगदीश मुखी यांची अंदमान आणि निकोबारच्या नायब राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आल्याचे राष्ट्रपती भवनातून सांगण्यात आले. ७५ पेक्षा जास्त वय असलेल्या मंत्र्यांनी पदावर राहण्यापेक्षा मंत्रिमंडळाला आणि पक्षाला मार्गदर्शन करण्याची अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार ७६ वर्षीय नजमा हेपतुल्ला यांनी गत महिन्यातच केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. पूर्वीच्या काँग्रेसच्या सदस्य राहिलेल्या हेपतुल्लाह या १९८० पासून राज्यसभेच्या सदस्य आहेत. २००४ मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. १९८५-८६ तसेच १९८८ ते २००७ पर्यंत त्या राज्यसभेच्या उपाध्यक्ष होत्या. यापूर्वी मेघालयचे राज्यपाल व्ही षण्मुगनाथन यांच्याकडे मणिपूर राज्याचा अतिरिक्त पदभार होता.

[edsanimate_start entry_animation_type= “fadeIn” entry_delay= “0” entry_duration= “1” entry_timing= “linear” exit_animation_type= “” exit_delay= “” exit_duration= “” exit_timing= “” animation_repeat= “infinite” keep= “yes” animate_on= “load” scroll_offset= “” custom_css_class= “”]स्पर्धा परीक्षांचे अपडेट आपल्या मोबाईलवर मोफत मिळवा! अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.[edsanimate_end]

भारत पाकमध्ये फक्त सीमेवरील दहशतवादाच्या मुद्दयावर चर्चा !
# दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानकडून आलेले चर्चेचे निमंत्रण भारताने स्वीकारले आहे मात्र ही चर्चा काश्मीर मुद्दयावर होणार नसून ती सीमेवर होणा-या दहशतवादी हल्ल्यांवरच होईल असेही भारताकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या चर्चेसाठी भारताचे पराराष्ट्र सचिव एस जयशंकर हे इस्लामाबादला जाण्याची शक्यता आहे. भारताच्या ‘स्वातंत्र्य दिना’दिवशी काश्मीरप्रश्नी चर्चा करण्यासाठी पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिवांनी भारतीय उच्चायुक्तानां पत्राद्वारे चर्चेचे निमंत्रण पाठवले होते. या निमंत्रणाला उत्तर देत चर्चेसाठी तयार असल्याचे सांगत भारताने आपला हात पुढे केला आहे. निमंत्रण पाठवताना जम्मू काश्मीरच्या विषयावर परराष्ट्र सचिवांनी पाकिस्तानमध्ये येऊन चर्चा करावी असे म्हटले होते, यावर भारताचे परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांनी देखील इस्लामाबादमध्ये चर्चेसाठी जाण्याची तयारी दर्शवली आहे. परंतु या चर्चेदरम्यान सीमेवरून होणारा दहशतवादी हल्ला हा विषयच चर्चेच्या केंद्रस्थानी राहणार असल्याचेही भारताने स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्र

दहीहंडीवर हायकोर्टाने घातलेली बंधने सुप्रीम कोर्टाकडून कायम
# दहीहंडी फोडताना लहान मुलांचा समावेश करू नये तसेच २० फुटांपेक्षा अधिक मोठा थर लावू नये, हा मुंबई उच्च न्यायालयाने २०१४ मध्ये दिलेला निर्णय सर्वोच्च न्यायालायने बुधवारी कायम ठेवला. त्यामुळे यावेळी दहीहंडी सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांनुसारच करावी लागणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने गेल्यावर्षी अंतरिम स्थगिती दिली होती. पण बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर मुंबईतील दहीहंडी उत्सव साजरा करणाऱ्या काही आयोजकांनी नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आता कसला उत्सव साजरा करायचा, असा प्रश्न उपस्थित केला आहे. राज्य सरकारवरही त्यांनी याबद्दल टीका केली.

क्रीडा

दीपा कर्माकरची खेलरत्नसाठी शिफारस
# कलात्मक जिम्नॅस्टीक्स प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दीपा कर्माकर हिला खेलरत्न पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार खेलरत्न पुरस्कारासाठी दीपाच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. येत्या २९ ऑगस्टला राष्ट्रीय क्रीडादिनी दीपाला राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे समजते. उद्या याबाबतचा अंतिम निर्णय होणार आहे.७.५ लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे खेलरत्न पुरस्काराचे स्वरूप असते. सध्या सुरू असलेल्या रिओ ऑलिम्पिकमध्ये दीपाने जिम्नॅस्टिक व्हॉल्टच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र, केवळ ०.१५० गुणांनी दीपाचे कांस्य पदक हुकले होते. स्पर्धेची अंतिम फेरी गाठल्यानंतर देशभर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू आहे. १९६४ नंतर प्रथमच या प्रकारात एका भारतीय खेळाडूने ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. विशेष म्हणजे, वॉल्टच्या ‘प्रोड्युनोवा’ प्रकारात दीपाचा हातखंडा असल्यामुळे तिच्याबद्दल अनेकांना अप्रूप आहे. दीपाने ग्लास्गो येथील कॉमनवेल्थ स्पर्धेत जिम्नॅस्टिक्समधील ‘प्रोड्युनोवा’ प्रकाराचा अडथळा यशस्वीरित्या पार केला होता. त्यामुळे दीपाची जागतिक पातळीवर एक वेगळी ओळख निर्माण झाली.

[edsanimate_start entry_animation_type= “fadeIn” entry_delay= “0” entry_duration= “1” entry_timing= “linear” exit_animation_type= “” exit_delay= “” exit_duration= “” exit_timing= “” animation_repeat= “infinite” keep= “yes” animate_on= “load” scroll_offset= “” custom_css_class= “”]स्पर्धा परीक्षांचे अपडेट आपल्या मोबाईलवर मोफत मिळवा! अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.[edsanimate_end]

TAGGED:
Share This Article