⁠  ⁠

चालू घडामोडी – १८ ऑगस्ट २०१६

Tushar Bhambare
By Tushar Bhambare 6 Min Read
6 Min Read

देश-विदेश

मंगळावरील यंत्रमानव तंत्रज्ञानासाठी ‘नासा’कडून स्पर्धा जाहीर
# नासाने मंगळावर ह्य़ुमनॉईड म्हणजे यंत्रमानवाच्या रूपातील अवकाशवीर पाठवण्याचे ठरवले असून यंत्रमानव विकसित करण्यासाठी १० लाख डॉलर्स पारितोषिक असलेली स्पर्धा जाहीर केली आहे. स्पेस रोबोटिक्स चॅलेंज स्पर्धेत यंत्रामानव विकसनातील कौशल्यास वाव मिळणार आहे असे नासाने म्हटले आहे. या आव्हानात्मक स्पर्धेतून जे तंत्रज्ञान पुढे येईल त्याचा वापर सुरुवातीच्या मोहिमांत यंत्रमानव पाठवण्यासाठी केला जाईल. मंगळावर मानवी वस्ती होण्याच्या आधी काही मोहिमा केल्या जाणार आहेत, त्यात यंत्रमानव काही विशिष्ट ठिकाणी उतरवून वसाहतीसाठी योग्य प्रणाली, संदेशवहन व्यवस्था, सौर उपकरणे तेथे पाठवण्यासाठी चाचपणी केली जाणार आहे. या स्पर्धेतील सहभागी संघांनी नासाच्या रोबोनॉट ५ म्हणजे आर ५ या यंत्रमानवाच्या धर्तीवर संकल्पना तयार करायची आहे, त्यात पृथ्वी व मंगळ यांच्यातील संदेशवहनातील विलंबाचा कालावधीही विचारात घेणे गरजेचे ठरणार आहे. पृथ्वीवर यंत्रमानव विकसनात बरीच प्रगती झाली असली तरी ते यंत्रमानव अवकाशात वापरता येणार नाहीत कारण मंगळ व इतर ग्रहांवर त्यांचा वापर करण्यासाठी गोठणबिंदूच्या खाली टिकण्याची क्षमता त्यांच्यात असावी लागणार आहे.

गुगल सायन्स फेअरच्या अंतिम फेरीत २ भारतीय विद्यार्थी
# गुगल सायन्स फेअरच्या अंतिम फेरीतील स्पर्धकात दोन भारतीय व भारतीय वंशाच्या चार मुलांचा मुलांचा समावेश आहे. यापैकी कुणाला विजेतेपद मिळाले तर ५० हजार डॉलर्सच्या शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे. हैदराबादच्या साधू वासवानी इंटरनॅशनल स्कूलची फातिमा (वय १५) हिने जल व्यवस्थापनासाठी स्वयंचलित प्रणाली तयार केली आहे. धरणाच्या दरवाजांचे नियंत्रण त्यात करता येते. श्रीनक (वय १५) या बंगळुरूतील इंदिरानगरच्या विद्यार्थ्यांने परिधेय यंत्रांमध्ये कीपटॅब तयार केले असून ते क्लाऊड तंत्रज्ञानावर आधारित आहे. मानवी स्मृतीच्या मदतीने सखोल अध्ययनाच्या प्रक्रियेत ते उपयोगी आहे. फर्स्ट लिगो लीग वर्ल्ड चॅम्पियनशिप २०१२ मध्ये श्रीनक अंतिम फेरीत पोहोचला होता. भारतीय वंशाचे चारजण गुगल सायन्स फेअरमध्ये अंतिम फेरीत असून त्यात अनिका चिराला (वय १४), अनुष्का नाईकनवरे (वय १३) व निखील गोपाळ (वय १५), निशिती बेलूर (वय १३) यांचा समावेाश आहे. गोपाळ हा न्यूजर्सीचा असून त्याने मलेरियाविरोधात स्मार्टफोन चाचणी मायक्रोफ्लुईडिक एलिसा तयार केली आहे.

[edsanimate_start entry_animation_type= “fadeIn” entry_delay= “0” entry_duration= “1” entry_timing= “linear” exit_animation_type= “” exit_delay= “” exit_duration= “” exit_timing= “” animation_repeat= “infinite” keep= “yes” animate_on= “load” scroll_offset= “” custom_css_class= “”]स्पर्धा परीक्षांचे अपडेट आपल्या मोबाईलवर मोफत मिळवा! अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.[edsanimate_end]

क्रीडा

कसोटी क्रमवारीत भारत अव्वल
# श्रीलंकेने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत निभ्रेळ यश मिळवल्यामुळे ऑस्ट्रेलियाची आयसीसी कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थानावरील दावेदारी संपुष्टात आली असून, हे स्थान भारताने काबीज केले आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ अग्रस्थानासह (११८ गुण) श्रीलंकेसाठी कसोटी मालिकेसाठी दाखल झाला होता. मात्र पलेकेल येथे पहिल्या कसोटीत १०६ धावांनी, गॉल येथे दुसऱ्या कसोटीत २२९ धावांनी आणि कोलंबोत तिसऱ्या कसोटीत १६३ धावांनी ऑस्ट्रेलियाने सपाटून मार खाल्ला. त्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड प्रत्येकी १०८ गुणांसह अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत.

दीपा, जितूची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस
# ऑलिम्पिक स्पर्धेत जिम्नॅस्टिक प्रकारात अंतिम फेरीत धडक मारत इतिहास घडवणारी दीपा कर्माकर आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता जितू राय यांची देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार अर्थात राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. क्रीडा मंत्रालयातर्फे नियुक्त निवड समितीने या दोघांची शिफारस करण्याचा निर्णय घेतला. त्रिपुराच्या दीपाने जागतिक स्तरावरील अव्वल जिम्नॅस्टपटूंना टक्कर देत ‘प्रोडय़ुनोव्हा’ हा कठीण प्रकार सादर केला. तिचे पदक अवघ्या काही गुणांनी हुकले. दीपाच्या या ऐतिहासिक कामगिरीची नोंद १२ सदस्यीय निवड समितीने घेतली आहे. खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारशी पाठवण्याची निर्धारित तारीख उलटून गेली आहे. मात्र विशेष बाब म्हणून निवड समितीने दीपाच्या नावाची शिफारस केली आहे. २०१४ राष्ट्रकुल स्पर्धेत दीपाने कांस्यपदकाची कमाई केली होती.

रशियाच्या महिला रिले संघाचे पदक काढून घेतले
# बीजिंग ऑलिम्पिक स्पध्रेत महिलांच्या ४ बाय १०० मीटर रिले शर्यतीत पटकावलेले सुवर्णपदक बुधवारी रशियाकडून काढून घेण्यात आले. २००८च्या ऑलिम्पिकमधील विजयी संघातील खेळाडू युलीया चेर्मोशँस्काया उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. रशियन महासंघाच्या महिलांची ४ बाय १०० रिले शर्यतीत संघ अपात्र ठरला आहे,अशी माहिती आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने आपल्या निवेदनात म्हटली आहे. २००८च्या नमुन्याची नव्याने चाचणी केली असता चेर्मोशँस्कायाच्या नमुन्यात दोन उत्तेजक द्रव्याचे अंश आढळल्याचे निष्पन्न झाले. ४ बाय १०० मीटर शर्यतीत बेल्जियमने रौप्यपदक जिंकले होते. त्यापाठोपाठ नायजेरियाने तिसरे, तर ब्राझीलने चौथे स्थान पटकावले होते. उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने बीजिंग व लंडन ऑलिम्पिकमधील उत्तेजक सेवनात दोषी आढळलेल्या खेळाडूंच्या नमुन्यांची पुनर्चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

साक्षी मलिकची कांस्य पदकाची कमाई
# रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने ५८ किलो वजनी गटात भारताला पहिले कांस्य पदक मिळवून दिले. ८-५ अश्या गुणांसह साक्षीने किर्गिजस्तानच्या आयसुलू तायनाबेकोव्हरला पराभूत केले. बचाव आणि आक्रमण याची सांगड घालत उत्तम साक्षीने खेळ केला. साक्षी आणि आयसुलू यांच्यातील ही लढत अतीतटीची होती. त्यामुळे सामना क्षणाक्षणाला रंग बदलत होता. पहिल्या तीन मिनिटांत आयसुलूने आक्रमक खेळ करत ०-५ अशी बढत मिळवली, परंतू त्यानंतरच्या पुढच्या तीन मिनिटांत साक्षीने आक्रमक पवित्रा घेत सामना ५-५ अशा बरोबरीत आणला. अंतिम क्षणी जोरदार धक्का देउन साक्षीने आयसूलूला रिंगणाच्या बाहेर ढकलले आणि ३ गुणांची कमाई करत सामना आपल्या खिशात टाकला. रशियाच्या महिला कुस्तीपटूने अंतिम फेरी गाठल्यामुळे साक्षीला कांस्यपदकाची लढत देण्याची संधी मिळाली आणि साक्षीनेसुद्धा मिळालेल्या संधीचे सोने करत भारताला कांस्य पदक मिळवून दिले.

[edsanimate_start entry_animation_type= “fadeIn” entry_delay= “0” entry_duration= “1” entry_timing= “linear” exit_animation_type= “” exit_delay= “” exit_duration= “” exit_timing= “” animation_repeat= “infinite” keep= “yes” animate_on= “load” scroll_offset= “” custom_css_class= “”]स्पर्धा परीक्षांचे अपडेट आपल्या मोबाईलवर मोफत मिळवा! अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.[edsanimate_end]

TAGGED:
Share This Article