⁠
Uncategorized

चालू घडामोडी : १८ मार्च २०२१

अविनाश साबळेला सुवर्णavinash sable

पतियाळा येथे सुरू असलेल्या फेडरेशन चषक वरिष्ठ राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत बुधवारी महाराष्ट्राच्या अविनाश साबळे आणि सर्वेश कुशारे यांनी सुवर्णपदकांची कमाई केली, तर कोमल जगदाळेने रौप्यपदक पटकावले. अविनाशने ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये राष्ट्रीय विक्रमही नोंदवला.
२६ वर्षीय अविनाशने ८ मिनिटे २०.२० सेकंद अशी वेळ नोंदवताना २०१९मधील स्वत:चाच ८ मि. २१.३७ से. वेळेचा विक्रम मोडीत काढला. राजस्थानच्या शंकर लाल स्वामीने रौप्य व हरयाणाच्या राजकुमारने कांस्यपदक मिळवले.
महिलांच्या ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये कोमलने १० मिनिटे ०५.४३ सेकंदांची वेळ नोंदवताना दुसरा क्रमांक मिळवला, पहिला क्रमांक उत्तर प्रदेशच्या परूल चौधरीने मिळवला.
उंच उडी स्पर्धेत सर्वेशने (२.१५ मीटर) सुवर्णपदक मिळवले, तमिळनाडूच्या आदर्श रामला (२.१० मीटर) रौप्यदक मिळाले. भालाफेक स्पर्धेत हरयाणाच्या नीरज चोप्राने (८७.८० मी.) सुवर्णपदकाची कमाई करताना नवा स्पर्धाविक्रम केला.

राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रजनीश शेठराज्याच्या पोलीस महासंचालकपदी रजनीश शेठ, कशी आहे कारकीर्द?

राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार रजनीश शेठ यांच्याकडे देण्यात आला आहे.
रजनीश शेठ यांचा जन्म 29 डिसेंबर 1963 रोजी झाला असून 1988 च्या बॅचचे रजनीश शेठ हे आयपीएस अधिकारी आहेत.
पोलीस दलात त्यांची भरती 25 ऑगस्ट 1988 ला झाली. रजनीश शेठ यांचे शिक्षण बी.ए.ऑनर्स (एलएलबी) झाले असून आझाद मैदान दंगलीच्या वेळी रजनीश शेठ हे मुंबईचे कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सहपोलीस आयुक्त होते.
त्यानंतर रजनीश शेठ हे फोर्स वन महाराष्ट्राचे प्रमुख राहिलेले आहेत.
गृह विभागाचे प्रधान सचिव म्हणूनही शेठ यांनी जबाबदारी सांभाळलेली आहे.
राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणूनही त्यांनी काम केलं आहे.

हेमंत नगराळे मुंबईचे नवे पोलीस आयुक्तहेमंत नगराळे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; कोण आहेत नगराळे?

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली आहे.
त्यांच्या ऐवजी हेमंत नगराळे यांना मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबईच्या पोलीस आयुक्तपद हे डीजी दर्जाचं आहे.
नगराळे यांचं इयत्ता सहावीपर्यंतचं शिक्षण चंद्रपूरच्या भद्रावती येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. त्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी नागपूरला आले. त्यांनी व्हीएनआयटीमधून बीई मेकॅनिकलची पदवी घेतली. तर मुंबतून फायनान्स मॅनेजमेंटमध्ये त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं.
हेमंत नगराळे हे 1987 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. हेमंत नगराळे यांचा 19 महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे.
हेमंत नगराळे यांनी 2016 मध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्त पदाचा कारभार स्वीकारला होता. त्यानंतर 2018 मध्ये त्यांची नागपुरात बदली झाली.
नगराळे सध्या पोलिस महासंचालक (विधी आणि तंत्रज्ञान) म्हणून कार्यरत आहेत.

Related Articles

Check Also
Close
Back to top button