Current Affairs : 18 November 2020
गायींच्या संरक्षणासाठी मध्य प्रदेशात ‘गौ-कॅबिनेट’ची स्थापना
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी राज्यातील गायींच्या सुरक्षिततेसाठी गौ-कॅबिनेटची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे.
२०१४ साली केंद्रात नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यानंतर गोवंश हत्या बंदीचा कायदा लागू करण्यात आला.
गायींचं संरक्षण आणि गोवंश संवर्धन ही दोन महत्वाची काम गौ-कॅबिनेटच्या माध्यमातून केली जाणार आहेत.
इतकच नव्हे तर पशुपालन, वन, पंचायत व ग्रामीण विकास, राजस्व, गृह आणि किसान कल्याण विभाग ही सर्व खाती मध्य प्रदेशात गौ-कॅबिनेटच्या अंतर्गत घेतली जाणार आहेत.
काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशात पार पडलेल्या पोट निवडुकांमध्ये जनतेने पुन्हा एकदा भाजपाच्या पारड्यात मत टाकलं. यानंतर मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचं स्थान अधिक बळकट झालंय. दरम्यान २२ नोव्हेंबरला गोपाळष्टमीच्या मुहुर्तावर मालवा येथे गौ-कॅबिनेटची पहिली बैठक पार पडली जाणार असल्याचं शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं.
लक्ष्मी विलास बँकवर आरबीआयने घातले निर्बंध
लक्ष्मी विलास बँक आर्थिक संकटात सापडल्याने आरबीआयने या बँकेवर निर्बंध लादले आहेत.
१६ डिसेंबरपर्यंत म्हणजेच पुढील ३० दिवस हे निर्बंध लादण्यात आले आहेत.
या कारवाईमुळे लक्ष्मी विलास बँकेच्या खातेदरांना महिनाभरासाठी फक्त २५ हजारांची रोख रक्कम काढता येणार आहे.
मागील तीन वर्षे लक्ष्मी विलास बँकेला मोठ्या प्रमाणावर तोटा झाला आहे. अवाजवी कर्जवाटप, अनियमितता या सगळ्यामुळे लक्ष्मी विलास बँकेवर आर्थिक संकट आले आहे. त्यामुळेच आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने लक्ष्मी विलास बँकेवर निर्बंध लादले आहेत.
निवडणूक आयोगाने सोनू सूद यांची पंजाबचे आॅयकॉनपदी केली नियुक्ती
निवडणूक आयोगाने अभिनेता सोनू सूद यांची पंजाब स्टेट आयकॉन म्हणून नियुक्ती केली आहे.
पंजाबचे मुख्य निवडणूक अधिकारी एस करुणा राजू म्हणाले की, त्यांच्या कार्यालयाने या संदर्भातील प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठवला होता.
सूद हा पंजाबच्या मोगा जिल्ह्यातील आहे. लॉकडाऊन दरम्यान मजुरांना घरी पाठवण्याबद्दल सूद चर्चेत राहिले होते.
राज्यात सौरऊर्जेवरील पहिली सूतगिरणी परभणीत
परभणी तालुक्यात जय भवानी महिला सहकारी सूतगिरणीच्या उभारणीला लवकरच आरंभ होत असूून सौरऊर्जेवर चालणारी ही राज्यातील पहिली सूतगिरणी ठरणार आहे.
त्याचप्रमाणे सहकार तत्त्वावरील मराठवाडय़ातील पहिली महिला सूतगिरणी म्हणूनही या गिरणीची नोंद होणार आहे.
परभणी जिल्ह्यत दरवषी कापूस लाखो क्विंटल कापूसाचे उत्पादन होते. ज्या भागात कापूस पिकत नाही अशा सांगोला, इचलकरंजी, कोल्हापूर या भागात सहकारी तसेच खासगी सूतगिरण्या संपूर्ण क्षमतेने चालतात मात्र परभणी जिल्ह्यत सूतगिरणी का चालत नाही, असा प्रश्न उपस्थित केला जातो.
त्याची कारणे राजकीय नेतृत्वाचा नाकर्तेपणा आणि जिल्ह्यतील सहकाराच्या अधोगतीत आहेत, मात्र या प्रश्नावर उत्तर शोधण्याचा सकारात्मक प्रयत्न आमदार राहुल पाटील यांनी केला आहे.
तेच या सूतगिरणीचे प्रवर्तक आहेत. एरंडेश्वर, नांदगाव शिवारात ही सूतगिरणी साकारत आहे. ही सूतगिरणी २५००० चकत्यांची असून हा प्रकल्प शंभर कोटी रुपयांचा आहे. त्यासाठी यंत्रसामग्री आयात केली जात आहे.