⁠  ⁠

चालू घडामोडी : १९ एप्रिल २०२०

Chetan Patil
By Chetan Patil 3 Min Read
3 Min Read

Current Affairs 19 April 2020

शेजारील देशांच्या थेट परकीय गुंतवणुकीच्या धोरणात बदल

Untitled 3 12

करोना व्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकानं आपल्या थेट परकीय गुंतवणुकीच्या धोरणात बदल केला आहे. भारताच्या शेजारील देशांना आता भारतात गुंतवणूक करण्यापूर्वी केंद्र सरकारची परवानगी घेणं बंधनकारक करण्यात आलं आहे. भारताला ज्या देशांच्या सीमा लागून आहेत अशा देशातील कोणतीही कंपनी किंवा व्यक्ती भारतातील कोणत्याही क्षेत्रात आता सरकारची मंजुरी मिळाल्यानंतरच गुंतवणूक करू शकेल असं ‘उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन मंडळा’कडून (डीपीआयआयटी) सांगण्यात आलं आहे. पाकिस्तान, चीन, नेपाळ, भूटान, बांगलादेश आणि म्यानमार या देशांच्या सीमा भारताला लागून आहेत.
भारताला ज्या देशांच्या सीमा लागल्या आहेत अशा देशांना आता सरकारच्या मंजुरीनंतरच भारतात गुंतवणूक करता येणार असल्याचं डीपीआयआयटीनं स्पष्ट केलं आहे.
“भारत आणि चीन आर्थिक आणि सांस्कृतिक परिषदेच्या माहितीनुसार चीनच्या गुंतवणुकदारांनी भारतीय स्टार्टअपमध्ये चार अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक इतकी अधिक आहे की ३० पैकी १८ स्टार्टअपमध्ये त्यांची गुंतवणूक आहे,” असं नांगिया अँडरसन एलएलपीचे संचालक संदीप झुनझुनवाला यांनी सांगितलं. डिसेंबर २००० पासून एप्रिल २०१९ पर्यंत भारतात चीननं २.३४ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.

माजी बॉक्सिंगपटू जयवंत मोरे यांचं निधन

जवळपास चार दशकांपासून कीर्ती महाविद्यालयाचे बॉक्सिंग गुरू आणि राज्याचे पहिले शिवछत्रपती पुरस्कार विजेते बॉक्सर जयवंत मोरे यांचे शुक्रवारी दुपारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते.
दिवंगत रूसी इंजिनीयर यांनी घडविलेल्या जयवंत मोरे हे बडी डिसूझा आणि सॅमी खटाव यांच्या तालमीत घडले. १९६२ ते १९८४ पर्यंतचा काळ जयवंत मोरे यांनी गाजवला.
बेडर, चपळता आणि अप्रतिम पदलालित्य तसेच तंत्रशुद्ध बॉक्सिंगसाठी ओळखल्या जाणाऱ्या जयवंत मोरे यांनी तब्बल ११ वर्षे अखिल भारतीय रेल्वे अजिंक्यपद स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला. तसेच सर्वोत्तम तंत्रशुद्ध बॉक्सरचा किताब त्यांनी १६ वेळा मिळवला होता.
६०च्या दशकात सिद्धार्थ महाविद्यालयाकडून मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मोरे यांनी अखिल भारतीय विद्यापीठाच्या स्पर्धा गाजवल्या होत्या.

चिनी अर्थव्यवस्थेलापहिल्या तिमाहीत झटका

Is the Chinese Economy Really in Trouble?, by Eamonn Fingleton ...

करोना विषाणूचा उद्रेक आणि मागणी घटल्याने चीनच्या अर्थव्यवस्थेला पहिल्या तिमाहीत जोरदार झटका लागला आहे. मार्चमध्ये संपलेल्या पहिल्या तिमाहीत चीनच्या आर्थिक विकासदरात ६.८ टक्क्यांची घसरण नोंदविण्यात आली आहे. १९७०नंतर चीनच्या विकासदरात सर्वाधिक घट नोंदविण्यात आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १९९०च्या सुरुवातीपासून चीनने दर तिमाहीत विकासदराचे आकडे मोजण्यास सुरुवात केली. तेव्हापासून नोंदविण्यात आलेला हा पहिलाच नकारात्मक विकासदर आहे. चीनच्या आर्थिक विकासाचा हा दर गेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीच्या सहा टक्के विकासदराच्या आकडेवारीपेक्षा फारच कमी आहे.
एएफपीच्या एका अहवालानुसार वर्षभरासाठी चीनच्या विकासदराचा अंदाज घटून १.७ टक्क्यांवर आला आहे; जो १९७६नंतर चीनच्या अर्थव्यवस्थेतील सर्वांत खराब कामगिरी असण्याची शक्यता आहे.

Share This Article