Current Affairs : 19 December 2020
फिफा : लेवानडोस्की सर्वाेत्कृष्ट खेळाडू

बायर्न म्युनिचचा स्ट्रायकर रॉबर्ट लेवानडोस्की २०१९-२० चा सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूच्या पुरस्कारावर नाव कोरले.
फिफा ऑनलाइन पुरस्कारात पोलंडच्या लेवानडोस्कीला ५२ मते मिळाली. त्याने गेल्या हंगामातील विजेता लियोनेल मेसी व क्रिस्टियानो रोनाल्डोला हरवले.
महिलांमध्ये इंग्लंडच्या लुसी ब्राँझने सर्वोत्तम फुटबॉलपटूच्या पुरस्कारावर मोहोर उमटवली.
झुरिच येथे झालेल्या या आभासी सोहळ्यादरम्यान विजेत्यांची नावे घोषित करण्यात आली. परंतु ‘फिफा’चे अध्यक्ष जिआनी इन्फॅन्टिनो यांनी म्युनिक येथे जाऊन लेवांडोस्कीला पुरस्कार प्रदान केल्याची चित्रफीत या सोहळ्यादरम्यान दाखवण्यात आली.
नेहमीप्रमाणे जगभरातील निवडक राष्ट्रीय फुटबॉल संघांचे कर्णधार, प्रशिक्षक, क्रीडा पत्रकार आणि चाहत्यांच्या मतांचा आढावा घेऊन विजेत्यांची निवड करण्यात आली.
३२ वर्षीय लेवांडोस्कीने यंदा बायर्न म्युनिकला चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. त्याने हंगामात सर्वाधिक ५५ गोल करतानाच बायर्नला बुंडेसलिगाचे जेतेपदही जिंकून दिले.
विश्वकरंडक कुस्ती स्पर्धा : भारताच्या अंशुला रजतपदक

भारताच्या अंशु मलिकने वैयक्तिक विश्वकरंडक कुस्ती स्पर्धेत महिलांच्या 57 किलो वजनी गटात रजतपदक पटकावले.
सर्बियात बेलग्रेड येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत तिला अंतिम लढतीत मालदिवच्या निचिताने गुणांवर 5-1 असे पराभूत केले.
चंद्रावरील नमुने 40 वर्षांनंतर पृथ्वीवर

चीनने चंद्रावरील नमुने आणण्यासाठी अंतराळात सोडलेले “चॅंग-5′ हे अवकाश यान मध्यरात्रीच्या सुमारास पृथ्वीवर सुरक्षितपणे परतले आणि आपल्याबरोबर चंद्रावरील नमुनेही या यानाने आणले आहेत.
चंद्रावरील नमुने 40 वर्षांनंतर पृथ्वीवर आणले गेले आहेत.
हे अंतराळयान उत्तर चीनच्या अंतर्गत मंगोलिया स्वायत्त प्रदेशातील सिझिवांग बानरवर उतरले. त्यामुळे चीनची “चॅंग-5′ मोहिम पूर्णपणे यशस्वी झाली आहे.
अंतराळात प्रवेश करणे, चंद्रावर उतरणे आणि नमुने घेऊन परत पृथ्वीवर परतणे या तीन महत्वाच्या टप्प्यांचा समावेश असलेली ही मोहिम 2004 साली सुरू झाली होती.
40 वर्षांपूर्वी अमेरिकेने अंतराळवीरांसह चंद्रावर अवकाश यान पाठवले होते. तर रशियाकडून पाठवण्यात आलेल्या मानवविरहीत अवकाशयानाने चंद्रावरून उड्डाण केले होते आणि ते थेट पृथ्वीवर आले होते.
फोर्ब्सच्या यादीत पुन्हा “अक्षय कुमार”च

अभिनेता अक्षय कुमार याने फोर्ब्स-2020च्या 100 डिजिटल स्टार्सच्या यादीत स्थान मिळवले आहे.
फोर्ब्सनं आशिया खंडातील 100 डिजिटल स्टार्स अर्थात कलाकारांची यादी जाहीर केली आहे.
बॉलीवूडमधील खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमार याने या पूर्वीही फोर्ब्स-2020च्या टॉप-10 यादीत स्थान मिळवले होते.
सध्याच्या घडीला सोशल मीडियावर अक्षयचे तब्बल 131 मिलियन फॉलोअर्स आहेत.