⁠  ⁠

चालू घडामोडी : १९ जानेवारी २०२०

Chetan Patil
By Chetan Patil 4 Min Read
4 Min Read

Current Affairs 19 January 2020

इंडोनेशियाच्या 20 हजाराच्या नोटेवर गणपतीचा फोटो

Note

इंडोनेशियामधील 20 हजार रुपयाच्या नोटेवर पुढच्या बाजूला गणपती बाप्पाचा फोटो आहे. तर मागच्या बाजूला क्लासरुमचा फोटो आहे. यासोबतच नोटेवर इंडोनेशियाचे पहिले शिक्षण मंत्री हजर देवांत्रा यांचाही फोटो आहे. काही वर्षांपूर्वी इंडोनेशियाची अर्थव्यवस्था ढासळली. त्यानंतर प्रचंड विचार करुन 20 हजाराची नोट चलनात आणण्याचा निर्णय झाला. हा निर्णय झाल्यानंतर या नोटांवर गणपतीचा फोटो छापण्याचाही निर्णय झाला. यावर लोकांचं असं म्हणणं आहे की जेव्हापासून नोटेवर गणपतीचा फोटो छापण्यात आला तेव्हापासून देशाची अर्थव्यवस्था मजबूत झाली.
इंडोनेशिया हा जगातला असा देश आहे की त्या देशातल्या एकूण लोकसंख्येच्या 87 टक्के लोक हे मुस्लीम आहेत. तर या देशात हिंदूंचे प्रमाण अवघे 3 टक्के आहे. या देशातल्या 20 हजाराच्या चलनी नोटांवर गणपती बाप्पाचा फोटो आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे गणपतीला या देशात कला, विज्ञान, शिक्षण याची देवता मानलं जातं. जेव्हापासून 20 हजाराच्या चलनी नोटांवर गणपतीचा फोटो छापण्यात आला तेव्हापासून या देशाची अर्थव्यवस्था ढासळली नाही अशी इथल्या लोकांची श्रद्धा आहे.

ज्येष्ठ पत्रकार अश्विनी चोप्रा यांचे निधन

ज्येष्ठ पत्रकार आणि भाजपचे माजी खासदार अश्विनी चोप्रा यांचे निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. चोप्रा हे कर्करोगाने आजारी होते. त्यातच त्यांचे शनिवारी रुग्णालयात निधन झाले. चोप्रा हे २०१४ मध्ये हरियाणाच्या कर्नालमधून लोकसभेवर निवडून गेले होते. ‘पंजाब केसरी’ दैनिकाचे ते दिल्लीत संपादक होते. त्यांच्या मागे पत्नी व तीन मुले आहेत.

‘हाफ मॅरेथॉन’मध्ये उत्तर प्रदेशची पारुल चौधरी प्रथम

आशियातील सर्वात सर्वात मोठी व मानाचा ‘गोल्ड लेबल’ दर्जा मिळालेल्या मुंबई मॅरेथॉनला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. यंदाच्या मुंबई मॅरेथॉनमध्ये गतवर्षीच्या तुलनेत नऊ हजारांनी वाढलेली धावपटूंची संख्या नागरिकांमध्ये ‘फिटनेस’चे वाढलेले महत्त्व अधोरेखित करताना दिसत आहे.
देश-विदेशातील नामांकित धावपटू विजेतेपद पटकावण्यासाठी सज्ज झाले असून यंदाही केनिया, इथियोपियाचे धावपटू यासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. मुंबई मॅरेथॉन टीमने ‘बी बेटर’ या थीमसह, घनकचरा व्यवस्थापनासाठी उचललेले विशेष पाऊल पाहता यंदाची ‘टीएमएम २०२०’ पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशची पारुल चौधरी प्रथम, तर मुंबई कस्टमची आरती पाटील दुसरी आणि नाशिकच्या मोनिका अथरेचा तिसरा क्रमांक

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा : जलतरणात तीन सुवर्णपदके

spt02 5

महाराष्ट्राने ‘खेलो इंडिया’ युवा क्रीडा स्पर्धेतून सोनेरी कामगिरी सलग आठव्या दिवशी सुरू ठेवली. जलतरणात राज्याच्या तीन खेळाडूंनी सुवर्णपदक पटकवले. त्याशिवाय वेटलिफ्टिंगमध्ये एक सुवर्णपदक मिळाले. अपेक्षेप्रमाणे खो-खोमध्ये महाराष्ट्राच्या मुलामुलींच्या चारही संघांनी उपांत्य फेरी गाठली आहे.
महाराष्ट्राला जलतरणातून तीन सुवर्णपदकांची कमाई एका दिवशी करता आली. महाराष्ट्राचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू मिहीर आम्ब्रेने ५० मीटर बटरफ्लाय आणि एरॉन फर्नाडिसने २०० मीटर फ्रीस्टाईल शर्यतीत सुवर्णपदके पटकवली. मुलींमध्ये करिना शांताने १०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोकमध्ये राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक पटकावले. १०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात रौप्य आणि कांस्यदेखील महाराष्ट्राच्या मुलींनाच मिळाली. अपेक्षा फर्नाडिसने रौप्य आणि झारा जब्बरने कांस्यपदक मिळवले. कियारा बंगेराने (१७ वर्षांखालील) २०० मीटर फ्रीस्टाइल शर्यतीत रौप्यपदक मिळवले. ५० मीटर बटरफ्लायमध्ये महाराष्ट्राला आणखी एक रौप्यपदक केनिशा गुप्ताने (१७ वर्षांखालील) मिळवून दिले.

Hobart International : सानिया मिर्झान पहिल्याच प्रयत्नात पटकावलं विजेतेपद

बाळतंपण आणि त्यानंतर आपल्या मुलाकडे लक्ष देण्यासाठी टेनिसपासून दुरावलेल्या सानिया मिर्झाने दणक्यात पुनरागमन केलं आहे. WTA Hobart International Tennis स्पर्धेत सानियाने आपली युक्रेनची साथीदार नादीया किचनॉकच्या साथीने दुहेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. अंतिम फेरीत सानिया-नादीया जोडीने चीनच्या शुई पेंग आणि शुई झँग जोडीचा ६-४, ६-४ ने पराभव केला.
तब्बल दोन वर्षांनी सानिया मिर्झाने आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत पुनरागमन केलं आहे. सानियाचं हे दुहेरीमधलं ४२ वं विजेतेपद ठरलं. याव्यतिरीक्त सानियाच्या नावावर २०१६ सालचं ऑस्ट्रेलियन ओपनचं महिला दुहेरी आणि २००९ साली मिश्र-दुहेरी स्पर्धेचं जेतेपदही जमा आहे.

Share This Article