⁠
Uncategorized

चालू घडामोडी – २ ऑक्टोबर २०१६

देश-विदेश

वेलिंगकरांची नवी इनिंग, ‘गोवा सुरक्षा मंच’च्या माध्यमातुन भाजपला देणार टक्कर
# राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गोवा विभाग संघचालकावरुन पायउतार झालेल्या सुभाष वेलंगिकरांनी गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी नव्या पक्षाची घोषणा केली. गोव्यामध्ये भाजपला शह देण्यासाठी वेलिंगकर ‘गोवा सुरक्षा मंच'(जीएसएम) या पक्षाच्या माध्यमातुन निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. गोव्यातील आगामी निवडणूकीत पक्ष ४० पैकी ३५ जागा लढविणार असल्याचे देखील वेलिंगकर यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. भाषा संवर्धनाच्या मुख्य मुद्द्यावरुन स्थापन झालेल्या गोवा सुरक्षा मंचाचे नेतृत्व भारतीय भाषा सुरक्षा मंचचे वरिष्ठ नेते आनंद शिरोडकर करणार आहेत. पक्षाच्या स्थापनेनंतर जाहीर करण्यात आलेल्या सदस्यांच्या यादीमध्ये वेलिंगकरांचे नावाचा उल्लेक करण्यात आलेला नाही. दरम्या भाषा संवर्धन हा आगामी निवडणुकीतील पक्षाचा मुख्य अजंडा असला, तरी ‘गोवा सुरक्षा मंच’ नागरिकांच्या पाणी आणि वीज या समस्याकडे देखील गांभिर्याने लक्ष देणार असल्याचेर राजकीय सल्लागार भंबेरे यांनी सांगितले.

[edsanimate_start entry_animation_type= “fadeIn” entry_delay= “0” entry_duration= “1” entry_timing= “linear” exit_animation_type= “” exit_delay= “” exit_duration= “” exit_timing= “” animation_repeat= “infinite” keep= “yes” animate_on= “load” scroll_offset= “” custom_css_class= “”]स्पर्धा परीक्षांचे अपडेट आपल्या मोबाईलवर मोफत मिळवा! अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.[edsanimate_end]

रुग्णाची माहिती गोपनीय ठेवण्याचा लवकरच कायदा
# रुग्णाबाबतची वैद्यकीय माहिती गोपनीय ठेवण्याबाबतचा कायदा लवकरच केला जाणार असून अशा प्रकारच्या कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी आणि ती माहिती गोपनीय ठेवण्याची हमी देणारा कायदा करण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी, बंगळुरूशी संपर्क साधला आहे. सदर कायद्याला हेल्थकेअर डेटा प्रायव्हसी अ‍ॅण्ट सिक्युरिटी अ‍ॅक्ट असे तात्पुरते नाव देण्यात येणार आहे. एखाद्या व्यक्तीच्या आरोग्यविषयक माहितीचे संरक्षण त्याद्वारे केले जाणार आहे. या कायद्याचे उल्लंघन केल्यास त्यावर कोणत्या स्वरूपाची म्हणजेच दिवाणी अथवा फौजदारी स्वरूपाची कारवाई केली जाईल त्याबाबत सविस्तर उपाययोजना सुचविणार आहे. सदर माहिती फुटल्यास रुग्णाला त्याची नुकसानभरपाई देण्याची आणि माहिती फोडणाऱ्या व्यक्ती अथवा संस्था यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची कायद्यात तरतूद राहणार आहे. रुग्णाच्या मान्यतेनेच आरोग्यविषयक माहिती गोळा केली जाणार आहे.

श्रीनगरमधील संचारबंदी उठविली
# सुरक्षारक्षक आणि निदर्शक यांच्यात गेल्या महिन्यांत झालेल्या चकमकीत जखमी झालेला एक युवक शनिवारी रुग्णालयात मरण पावल्याने काश्मीर खोऱ्यातील धुमश्चक्रीत मरण पावलेल्यांची संख्या आता ८३ झाली आहे. दरम्यान, श्रीनगर शहरातील स्थितीत सुधारणा झाल्याने तेथील संचारबंदी उठविण्यात आली आहे. मात्र फुटीर गटांनी दिलेल्या बंदच्या हाकेमुळे सलग ८५ व्या दिवशी खोऱ्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. बडगाम जिल्ह्य़ातील चेक-ए-कवूसा येथे निदर्शक आणि सुरक्षारक्षक यांच्यात झालेल्या चकमकीत पॅलेट लागून जखमी झालेल्या मुझफ्फर अहमद पंडित हा युवक शनिवारी रुग्णालयात मरण पावला. काही दिवसांपूर्वी त्याला रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले होते. मात्र त्याला गंभीर स्वरूपाची लागण झाल्याने पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

ब्रह्मपुत्रेच्या उपनदीचे पाणी चीनने अडवले
# उरी हल्ल्यानंतर सिंधू पाणी कराराच्या फेरविचाराचे सूतोवाच भारताने केलेले असतानाच चीनने ब्रह्मपुत्रेच्या उपनदीचे पाणी अडवण्याचा प्रयत्न चालवला आहे. या उपनदीवर चीन अवाढव्य जलविद्युत प्रकल्पाची उभारणी करत असून २०१४ पासून त्याचे बांधकाम सुरू आहे. या प्रकल्पामुळे नदीचा प्रवाह अडणार असून परिणामी भारतात वाहणारी ब्रह्मपुत्रा आक्रसणार आहे. चीनकडे भारताने यासंदर्भात वेळोवेळी चिंता व्यक्त केली आहे.

भारत-पाकिस्तान यांच्यात मध्यस्थीची संयुक्त राष्ट्र संघटनेची तयारी
# भारत व पाकिस्तान यांनी काश्मीरसह सर्व प्रश्न सामोपचाराने मिटवावेत. त्यात शांततामय, राजनैतिक व संवादाच्या मार्गाचा अवलंब करावा. वेळ पडली तर दोन्ही देशांमध्ये हस्तक्षेपाची आपली तयारी आहे असे संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की मून यांनी सांगितले. बान की मून यांच्या प्रवक्त्याने काल जारी केलेल्या निवेदनानुसार संयुक्त राष्ट्र प्रमुखांनी भारत व पाकिस्तान यांच्यातील तणावावर अलीकडच्या पाश्र्वभूमीवर तीव्र चिंता व्यक्त केली असून प्रत्यक्ष ताबा रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघनही झाले आहे. उरी येथे भारतीय लष्कराच्या तळावर १८ सप्टेंबरला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात किमान १९ जवान मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे अशा तणावाच्या परिस्थितीत दोन्ही देशांनी संयम पाळताना तणाव वाढणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

महाराष्ट्र

स्वच्छ सिंधुदुर्गचा दिल्लीत सन्मान
# स्वच्छतेमध्ये देशात प्रथम क्रमांकावर असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाचा बहुमान (गौरव) आज सकाळी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात केंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेला देशातील सर्वात स्वच्छ जिल्हा पुरस्कार बहाल करण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी हा पुरस्कार स्विकारला.

क्रीडा

सानिया-बार्बोराला उपविजेतेपद
# भारताची सानिया मिर्झा आणि तिची चेक प्रजासत्ताकची जोडीदार बाबरेरा स्ट्रायकोव्हा यांना डब्लूटीए वुहान खुल्या टेनिस स्पध्रेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. बेथानी मॅटेक-सँड्स आणि ल्युसी साफारोव्हा या अमेरिकन व चेक प्रजासत्ताक जोडीने अंतिम फेरीत सानिया-बाबरेराचा ६-१, ६-४ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. पहिल्या सेटमध्ये सानिया-बाबरेरा पिछाडीवर पडले. त्यांना सामन्यात पुनरागमन करण्याची संधी होती, परंतु त्यांनी चौथ्या गेममध्ये तीन ब्रेक पॉइंट गमावले. त्यानंतर सँड्स व साफारोव्हा यांनी सलग दोन गुणांची कमाई करून ६-१ असा सेट जिंकला. दुसऱ्या सेटच्या दुसऱ्या गेममध्ये सानिया-बाबरेरा जोडीने सव्‍‌र्हिस गमावली, मात्र त्यानंतर पुढील गेम जिंकून आव्हान जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. सँड्स व साफारोव्हाने त्यांची पुन्हा सव्‍‌र्हिस मोडून चौथ्या गेममध्ये आघाडी घेतली.

लोढा समितीच्या प्रमुख शिफारशी बीसीसीआयला अमान्य
# लोढा समितीच्या शिफारशींवरून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि सर्वोच्च न्यायालय यांच्यातील संघर्ष आता तीव्र होणार आहे. लोढा समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणीसंदर्भात आयोजित बीसीसीआयची विशेष सर्वसाधारण बैठक तब्बल सहा तास चालली. मात्र बैठकीअखेर लोढा समितीच्या प्रमुख शिफारशींची अंमलबजावणी करणे शक्य नसल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले.

अर्थव्यवस्था

‘एसबीआय’च्या अध्यक्षपदाची धुरा अरुंधती भट्टाचार्य यांच्याकडे कायम!
# स्टेट बँक ऑफ इंडियाच्या(एसबीआय) अध्यक्षा अरूंधती भट्टाचार्य यांचा कार्यकाल एक वर्षाने वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ‘एसबीआय’च्या अध्यक्षपदाची मुदत संपल्यानंतर कार्यकाळ वाढविण्यात आलेल्या अरुंधती भट्टाचार्य या पहिल्या अध्यक्षा आहेत. यापूर्वी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोणत्याही अध्यक्षांना मुदतीनंतर कार्यकाळ वाढवून मिळालेला नाही. ६ ऑक्टोबर २०१६ रोजी अरुंधती भट्टाचार्य यांचा कार्यकाळ संपणार होता. मात्र कार्यकाळ वाढविण्यात आल्यामुळे आता त्या ६ ऑक्टोबर २०१७ पर्यंत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रमुख पदाची जबाबदारी सांभाळतील.

देशातील ६५ हजार कोटींचा काळा पैसा उघड
# काळा पैसा घोषित करण्याच्या योजनेच्या (आयडीएस) पहिल्या तिमाहीत देशातील ६२,२७५ व्यक्तींनी आपले उत्त्पन्न जाहीर केले असून या माध्यमातून ६५, २५० कोटींचा काळा पैसा उघड झाल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी दिली. ते शनिवारी दिल्लीतील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी आयडीएस योजनेच्या माध्यमातून उघड झालेल्या काळा पैशासंदर्भातील तपशील जाहीर केला. मूल्यमापन झाल्यानंतर आगामी काळात हा आकडा वाढणार असून उत्त्पन्न जाहीर करणाऱ्या व्यक्तींची ओळख गुप्त राखली जाणार असल्याचेही जेटलींनी स्पष्ट केले. ३० सप्टेंबर ही काळा पैसा घोषित करण्याच्या योजनेची अंतिम मुदत होती. त्यानंतर आज सरकारकडून पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भातील माहिती देण्यात आली.

[edsanimate_start entry_animation_type= “fadeIn” entry_delay= “0” entry_duration= “1” entry_timing= “linear” exit_animation_type= “” exit_delay= “” exit_duration= “” exit_timing= “” animation_repeat= “infinite” keep= “yes” animate_on= “load” scroll_offset= “” custom_css_class= “”]स्पर्धा परीक्षांचे अपडेट आपल्या मोबाईलवर मोफत मिळवा! अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.[edsanimate_end]

Related Articles

Back to top button