⁠
Uncategorized

चालू घडामोडी : २० जून २०२०

Current Affairs 20 June 2020

केंद्रीय वित्तसंस्थेच्या चेअरमनपदी पटेल

रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या खांद्यावर नवी जबाबदारी
  • रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या खांद्यावर नवी जबाबदारी देण्यात आली आहे. नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ पब्लिक फायनॅन्स अँड पॉलिसीच्या (एनआयपीएफपी) अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • यापूर्वी या पदाची जबाबदारी विजय केळकर यांच्या खांद्यावर होती. केळकर हे २०१४ पासून या पदावर कार्यरत होते. दरम्यान, उर्जित पटेल हे २२ जून रोजी एनआयपीएफपीच्या अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेणार आहेत.
  • एनआयपीएफपीनं यासंदर्भातील माहिती दिली. “रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल हे २२ जून २०२० पासून चार वर्षांसच्या कालावधीसाठी आमच्यासोबत जोडले जात असल्यानं आम्हाला आनंद होत आहे,” अशी प्रतिक्रिया एनआयपीएफपीकडून देण्यात आली.
  • एनआयपीएफपीचे मुख्य उद्दिष्ट सार्वजनिक अर्थशास्त्राशी संबंधित क्षेत्रात धोरण बनवण्यास योगदान देणं हे आहे. या संस्थेला अर्थ मंत्रालय, केंद्र सरकारसोबतच विविध राज्य सरकारांकडून वार्षिक अनुदानही मिळते.

बॅडमिंटनपटू श्रीकांतची ‘खेलरत्न’साठी शिफारस

भारताचा बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतने दिलगिरी व्यक्त केल्यानंतर त्याची खेलरत्न क्रीडा पुरस्कारासाठी भारतीय बॅडमिंटन संघटनेकडून (बीएआय) शिफारस करण्यात आली आहे.
याउलट अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस न झाल्याने जाहीर नाराजी व्यक्त करणाऱ्या प्रणॉयला संघटनेकडून कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे.
मनिला येथे फेब्रुवारीमध्ये झालेल्या आशिया सांघिक बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत न खेळता श्रीकांत आणि एच. एस. प्रणॉय हे दोघेही बार्सिलोना येथे अन्य स्पर्धा खेळण्यासाठी निघून गेले.
मात्र प्रणॉय सातत्याने शिस्तभंग करत आहे. आतापर्यंत प्रणॉयच्या वागण्याकडे संघटनेकडून दुर्लक्ष करण्यात आले
मात्र या वेळेस त्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे,’’ असे ‘बीएआय’चे सरचिटणीस अजय सिंघानिया यांनी सांगितले.

Related Articles

Check Also
Close
Back to top button