⁠  ⁠

चालू घडामोडी : २१ जुलै २०२०

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

Current Affairs 21 July 2020

मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचे निधन

वाजपेयींचे निकटवर्तीय नेते, मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचे निधन
  • मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचे निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते.
  • 1978–84 या कालावधीत ते उत्तर प्रदेश विधानपरिषदेचे सदस्य होते. तर 1996 ते 2009 दरम्यान सलग तीन वेळा ते विधानसभेवर निवडून आले. बसप-भाजप युती सरकारमध्ये मायावतींच्या नेतृत्वात त्यांनी उत्तर प्रदेश मंत्रिमंडळात नगरविकास मंत्री म्हणूनही काम पाहिले होते.
  • लालजी टंडन यांनी बिहारचे राज्यपालपदही भूषवले आहे.

संयुक्तअरब अमिरातीच्या यानाची मंगळाकडे झेप

Untitled 16 11
  • संयुक्तअरब अमिरातीचे अवकाशयान मंगळाच्या दिशेने झेपावले. ‘अल अमल’ असे या अवकाशयानाचे नाव असून ते जपानच्या प्रक्षेपण तळावरून सोडण्यात आले.
  • अरब जगतातील कुठल्याही देशाने आतापर्यंत अशी आंतरग्रहीय मोहीम राबवली नव्हती.
  • ‘अल अमल’ याचा अर्थ ‘आशा’ असा आहे. हे यान १.३ टन वजनाचे असून ते जपानमधील तानेंगिशिमा येथील अवकाशतळावरून स्थानिक वेळेनुसार पहाटे १.५८ वाजता सोडण्यात आले.
  • यानाची दूरसंचार यंत्रणा कार्यान्वित केली असून त्याच्याकडून पहिले संदेश मिळाले आहेत. त्याच्या सौरपट्टय़ा उघडण्यात आल्या असून मित्सुबिशी हेवी इंडस्ट्रीज प्रक्षेपण सेवेने यान प्रक्षेपित केले आहे.
  • सौरपपट्टय़ा विद्युत भारित झाल्याने अवकाशयान ४९ कोटी ५० लाख कि. मी. चे मंगळापर्यंतचे अंतर पार करणार आहे.
  • २०० दशलक्ष डॉलर्सचा हा प्रकल्प असून अरब जगतातील आंतरग्रहीय योजना पहिल्यांदाच यशस्वी झाली आहे. या मोहिमेसाठी अमिरातीच्या १३५ अभियंत्यांनी सहा वर्षे परिश्रम केले होते.
  • हे अवकाशयान फेब्रुवारी २०२१ मध्ये मंगळावर पोहोचणार असून त्यावेळी अमिरातीच्या स्थापनेचा पन्नासावा वर्धापन दिन आहे.

मेसीला सातव्या वेळेस पिचिची पुरस्कार

लायनेल मेसी... फुटबॉलच्या दुनियेचा ...
  • ला-लीगा फुटबॉलमधील अखेरच्या सामन्यात लिओनेल मेसीने दोन गोल करत बार्सिलोनाला विजय मिळवून दिला. मात्र सलग सातव्या मोसमात सर्वाधिक गोलची नोंद करत मेसीने विक्रमी जेतेपद पटकावले.
  • मेसीने यंदाच्या मोसमात २५ गोलची नोंद केली. रेयाल माद्रिदच्या करीम बेन्झेमापेक्षा त्याने चार गोल अधिक लगावले.
  • सात विविध मोसमांत सर्वाधिक गोल लगावणारा मेसी हा ला-लीगामधील एकमेव फुटबॉलपटू ठरला आहे.
  • मेसीने सलग चार मोसमांत सर्वाधिक गोल करत ह्य़ुगो सांचेझच्या कामगिरीशी बरोबरी साधली. ‘‘वैयक्तिक कामगिरीला माझ्यासाठी दुय्यम स्थान असते.
  • सलग तिसऱ्या मोसमात सर्वाधिक २१ वेळा त्याने गोलसाहाय्यकाची जबाबदारी निभावली.

Share This Article