राफेल नदालला इटालियन ओपनचे विजेतेपद
- “क्ले कोर्टचा’ बादशाह राफेल नदालने इटालियन ओपन टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद आपल्याकडे राखले. अंतिम लढतीत नदालने सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचचा संघर्षपूर्ण पराभव करत 34वे मास्टर्सचे विजेतेपद पटकावले आहे.
- जागतिक क्रमवारीत 31 वर्षीय जोकोविच अव्वल, तर 32 वर्षीय नदाल दुसऱ्या स्थानावर आहे. यावेळी सामन्याच्या सुरूवातीपासुनच नदालने जोकोविचवर वर्चस्व गाजवलेले दिसले.
- जोकोविचला पहिल्य सेट मध्ये एकही गेम आपल्या नावे करता आला नाही. त्यामुळे नदालने पहिला सेट 6-0 अशा फरकाने एकतर्फी आपल्या नावे केल्याने सामन्यात त्याने 1-0 अशी आघाडी घेतली.
‘अॅटलांटिक निनो’चा भारतीय मोसमी पावसावर परिणाम
- अॅटलांटिक सागरातील पृष्ठीय तापमानातील असंगतता व भारतातील उन्हाळी मोसमी पाऊस यांचा संबंध आहे, असे नवीन संशोधनात दिसून आले आहे. त्यामुळे भारतातील मोसमी पावसाचा अचूक अंदाज करण्यात मदत होणार आहे असे एका अभ्यासात म्हटले आहे.
- अबुधाबी येथील भारतीय हवामान वैज्ञानिक अजय रवींद्रन यांनी म्हटले आहे की, भारतातील उन्हाळी मोसमी पाऊस व अॅटलांटिक निनो म्हणजेच एझेडएम यांचा दुरान्वयाने संबंध आहे. सेंटर फॉर प्रोटोटाइप मॉडेलिंग ऑफ न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी अबुधाबी (एनवाययुएडी) या संस्थेच्या या अभ्यासानुसार पूर्व उष्णकटीबंधीय अॅटलांटिक महासागरात जागतिक तापमानवाढीमुळे पृष्ठीय तापमानात नेहमी चढउतार होत असतात व काही वेळा सागराचे पृष्ठीय तापमान जास्त असते त्यावेळी एझेडएम म्हणजे अॅटलांटिक निनोशी संबंधित हवामान परिणाम दिसतात. त्यात पृथ्वीच्या विषुवृत्तीय वातावरणानजिक केल्विन तरंग तयार होतात. त्याचा परिणाम हिंदी महासागरात होत असतो. याचा अर्थ एझेडएम म्हणजे अॅटलांटिक निनोमुळे भारतीय मोसमी पावसावरही परिणाम होत असतो.
- अॅटलांटिक निनो हा सागरी जलाच्या पृष्ठीय तापमानाशी संबंधित परिणाम आहे. त्यात अॅटलांटिक महासागरातील पाणी कधी गरम, कधी थंड होते. या तापमानातील चढउतारांमुळे आफ्रिकेतील वातावरणावर परिणाम होतो असे आतापर्यंत स्पष्ट झालेले असले तरी भारतातील मोसमी पावसावरही त्याचा परिणाम होत असल्याचे नव्याने दिसून आले आहे.
मराठा आरक्षण: शैक्षणिक प्रवेशाच्या अध्यादेशावर राज्यपालांची सही
- पीजी मेडिकल प्रवेशाबाबत कॅबिनेट निर्णयानंतर एसईबीसी आरक्षणाच्या राज्य सरकारच्या अध्यादेशावर राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी सही केली आहे.
- त्यामुळे आता पीजी प्रवेशाला आणि एमबीबीएस प्रवेशाला मराठा आरक्षण लागू होणार. असं असलं तरीही खुल्या प्रवर्गाने या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
- राज्य सरकारने आणलेल्या या अध्यादेशामुळे २०१९-२० या वर्षासाठी शिक्षण संस्थांमध्ये मराठा आरक्षण लागू होणार आहे.
आशिया कप फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद चीनकडे
- दक्षिण कोरियाने 2023 च्या आशिया कप फुटबॉल स्पर्धेच्या यजमानपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्यामुळे ही स्पर्धा आयोजित करण्याचा चीनचा मार्ग मोकळा झाला आहे.
- 2023 मध्ये दक्षिण व उत्तर कोरिया मिळून संयुक्तपणे महिला फुटबॉल विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार आहेत. त्यामुळे त्या स्पर्धेवर लक्ष केंद्रित करायचे असल्याने आशिया कपच्या यजमानपदाच्या शर्यतीतून माघार घेत असल्याचे कोरिया फुटबॉल संघटनेने (केएफए) म्हटले आहे.
इटालियन ओपन स्पर्धेत कॅरोलिनाला महिला गटाचे जेतेपद
- चेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना प्लिस्कोवाने जोरदार कामगिरी करत इटालियन ओपन स्पर्धेतील महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात जोहाना कोंताला नमवित जेतेपद मिळवले. तिने अंतिम सामन्यामध्ये सरळ सेटमध्ये जोहानाला 6-3, 6-4 असे पराभूत करत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
- त्यापूर्वी महिलांच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात चेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना प्लिस्कोवाने ग्रीसच्या मारिया साकारीला 6-4, 6-4 असे नमविले. तर, ब्रिटनच्या योहानाने माद्रिद ओपन विजेता किकी बर्टन्सला 5-7, 7-5, 6-2 असे पराभूत करत अंतिम फेरीत आगेकूच केली होती.
देशातील पहिल्या मतदाराचे मतदान
- डोळ्यांनी नीट दिसत नाही, गुडघेदुखीने बेजार अशी अवस्था असूनही देशातील पहिले मतदार असलेल्या १०२ वर्षांच्या श्याम सरण नेगी यांनी रविवारी मतदानाचा हक्क बजावला.
- किन्नूर जिल्ह्यात त्यांनी मतदान केले. मंडी लोकसभा मतदारसंघातील कल्पा येथील केंद्रावर नेगी यांचे मतदान होते. नेगी मतदानासाठी आल्यानंतर तेथील मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.
- ‘किन्नूर हा आदिवासीबहुल जिल्हा आहे. श्याम सरण नेगी हे देशातील पहिले मतदार आहेत. राज्याच्या निवडणूक विभागासाठी ही गौरवास्पद बाब आहे,’ अशी माहिती किन्नूरचे जिल्हा निवडणूक अधिकारी गोपालचंद यांनी दिली. नेगी निवृत्त शिक्षक असून, त्यांचा जन्म १ जुलै १९१७ रोजी झाला, असे कागदोपत्री नोंदीतून स्पष्ट होते. आपण देशाचे पहिले मतदार कसे झालो, हे अजूनही त्यांना स्मरते.
- ‘सन १९५२मध्ये देशात प्रथम मतदान झाले. मात्र, हिमाचल प्रदेशातील आदिवासी आणि दुर्गम भागात त्या आधीच पाच महिने म्हणजे २३ ऑक्टोबर १९५१ रोजी मतदान झाले होते.