चालू घडामोडी – २२ ऑगस्ट २०१६
देश-विदेश
‘जीएसटी’साठी २९ ऑगस्टला विधिमंडळाचे विशेष अधिवेशन
# संसदेच्या दोन्ही सभागृहांनी बहुमताने मंजूर केलेल्या वस्तू व सेवा कर घटनादुरुस्ती विधेयकाला (जीएसटी) मंजुरी देण्यासाठी येत्या २९ ऑगस्टला राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. राज्य मंत्रिमंडळाने सोमवारी हे अधिवेशन २९ ऑगस्टला घेण्याचे निश्चित केले. या अधिवेशनामध्ये वस्तू व सेवा कर घटनादुरुस्ती विधेयकाला दोन्ही सभागृहांची मंजुरी घेण्यात येईल.
स्वतंत्र रेल्वे विद्यापीठासाठी तांत्रिक बाबींची पूर्तता करणार
# स्वतंत्र रेल्वे विद्यापीठ निर्मितीची पंतप्रधान नरेन्द्र मोदींची इच्छा आहे. त्याची कार्यवाही सुरू आहे. लवकरच तांत्रिक आणि कायदेशीर बाबींची पूर्तता केली जाईल, असे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी जाहीर केले. मुंबई विद्यापीठांतर्गत मंजूर झालेल्या रेल्वे संशोधन केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, चांगल्या शैक्षणिक संस्थांशी करार करून रेल्वे मंत्रालयाने कौशल्य विकसित करण्याचा प्रयत्न केला आहे. मुंबई विद्यापीठाशी झालेल्या करारानुसार आज रत्नागिरीत रेल्वे संशोधन केन्द्र सुरू करण्यात आले आहे. त्याप्रमाणेच रेल्वेचे स्वत:चे विद्यापीठ असावे, ही पंतप्रधान मोदींची इच्छा आहे.
[edsanimate_start entry_animation_type= “fadeIn” entry_delay= “0” entry_duration= “1” entry_timing= “linear” exit_animation_type= “” exit_delay= “” exit_duration= “” exit_timing= “” animation_repeat= “infinite” keep= “yes” animate_on= “load” scroll_offset= “” custom_css_class= “”]स्पर्धा परीक्षांचे अपडेट आपल्या मोबाईलवर मोफत मिळवा! अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.[edsanimate_end]
‘फेटा’ दहशतवादी संघटनेची भारतामध्ये घुसखोरी
# तुर्कीमधील अंकारामध्ये झालेल्या अयशस्वी लष्करी उठावामध्ये फेतुल्लाह दहशतवादी संघटना जबाबदार असल्याचे तुर्की परराष्ट्र मंत्री मौलूदा काउसोगलू यांनी स्पष्ट केले. जगभरात विखुरलेल्या या संघटनेने भारतामध्ये घुसखोरी केल्याची माहिती काउसोगलू यांनी दिली. काउसोगलू यांनी रविवारी भारतीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी भारतामध्ये शिरकाव करणाऱ्या फेतुल्लाह दहशतवादी संघटनेवर (फेटा) योग्य कारवाई करण्याचे आवाहन केले. दहशतवादाचा सामना करण्यासाठी एकत्र लढा देण्याची गरज असल्याचेही काउसोगलू यांनी यावेळी म्हटले.
नरेंद्र मोदींचा सूट गिनेस बुकमध्ये
# अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्यासोबत गेल्या वर्षी नवी दिल्लीत झालेल्या भेटीच्या वेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घातलेल्या आणि (महागडा असल्याने) वादग्रस्त ठरलेल्या मोनोग्राम अंकित सुटाने ‘लिलावात विकला गेलेला सगळ्यात महाग सूट’ म्हणून गिनेस बुकात स्थान मिळवले आहे. या सुटाचा गेल्या वर्षी फेब्रुवारीत लिलाव करण्यात आला असता सुरतमधील हिऱ्यांचे व्यापारी आणि धर्मानंद डायमंड कंपनीचे मालक लालजी पटेल यांनी तो ४ कोटी ३१ लाख रुपयांना विकत घेतला होता. या सुटाचा जागतिक विक्रम नोंदवणाऱ्या गिनेस बुकात समावेश करण्यात आला ही आनंदाची व अभिमानाची बाब आहे. कंपनीच्या एचआर चमूच्या सूचनेवरील सुमारे पाच महिन्यांपूर्वी आम्ही या विक्रमी नोंदीसाठी अर्ज केला होता. त्यानंतर दोन महिन्यांतच, हा लिलावात विकला गेलेला जगातील सर्वात सूट असल्याचे मान्य करणारे प्रमाणपत्र आम्हाला मिळाले, असे लालजीभाईंचे पुत्र हितेश पटेल यांनी शनिवारी सांगितले.
क्रीडा
सिंधू, साक्षी, दीपाला ‘खेलरत्न’ पुरस्कार
# नवी दिल्ली : रिओ ऑलिंपिकमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या पी. व्ही. सिंधू, साक्षी मलिक, दीपा कर्माकर यांच्यासह जितू राय यांना आज (सोमवार) प्रतिष्ठेचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला. धावपटू ललिता बाबर, क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे, हॉकीपटू व्ही. आर. रघुनाथ, कुस्तीपटू विनेश फोगट यांच्यासह 15 खेळाडूंना ‘अर्जुन‘ पुरस्कार जाहीर झाला आहे.
मो फराहचे विक्रमी जेतेपद!
# मायकेल फेल्प्स, उसेन बोल्ट यांच्या अविस्मरणीय ऑलिम्पिक निवृत्तीनंतर सर्वाचे लक्ष लागून राहिलेल्या मो फराहने लांब पल्ल्याच्या शर्यतीत स्वत:चा दबदबा पुन्हा सिद्ध केला. ग्रेट ब्रिटनच्या फराहने रविवारी ५००० मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटकावून ऑलिम्पिक स्पध्रेत इतिहासाची नोंद केली. आठवडय़ापूर्वी त्याने १० हजार मीटर शर्यतीचे सुवर्णपदक जिंकले होते. १९७६ सालानंतर सलग दोन ऑलिम्पिक स्पर्धामध्ये ५००० व १०००० मीटर शर्यतीचे जेतेपद पटकावणाऱ्या पहिल्या धावपटूचा मान त्याने मिळवला.
[edsanimate_start entry_animation_type= “fadeIn” entry_delay= “0” entry_duration= “1” entry_timing= “linear” exit_animation_type= “” exit_delay= “” exit_duration= “” exit_timing= “” animation_repeat= “infinite” keep= “yes” animate_on= “load” scroll_offset= “” custom_css_class= “”]स्पर्धा परीक्षांचे अपडेट आपल्या मोबाईलवर मोफत मिळवा! अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.[edsanimate_end]