---Advertisement---

चालू घडामोडी : २२ डिसेंबर २०२०

By Chetan Patil

Published On:

Current Affairs 22 December 2020
---Advertisement---

Current Affairs : 22 December 2020

महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स संघटनेत ललिता, कविताचा समावेश

kavita raut

ऑलिम्पियन धावपटू ललिता बाबर आणि कविता राऊत यांचा महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स संघटनेच्या दोन समित्यांवर समावेश करण्यात आला आहे.
रविवारी झालेल्या निवडणुकीत माजी ऑलिम्पियन आदिल सुमारीवाला हे पुन्हा अध्यक्षपदी निवडून आले.
कविताने २०१०च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत १० हजार मीटर आणि ५ हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पदक पटकावले होते.
२०१०च्या राष्ट्रकुल स्पर्धेतही तिने कांस्यपदकाची कमाई केली होती. ललिताने २०१४च्या आशियाई स्पर्धेत स्टिपलचेस प्रकाराचे कांस्यपदक पटकावले होते. त्यामुळे ती २०१६च्या रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली होती.
सुमारीवाला, ललिता आणि कविता यांच्यासह रचिता मिस्त्री आणि आनंद मेनेझेस हे ऑलिम्पियनसुद्धा कार्यकारी समितीचा भाग असतील. रचिता यांच्याकडे महिला समितीचे तर मेनेझेस यांच्याकडे मॅरेथॉन आणि रोड रेस समितीचे अध्यक्षपद सोपवण्यात आले आहे.
त्याचबरोबर आशियाई स्पर्धेतील पदकविजेते होमियार मिस्त्री यांच्याकडे निवड समितीचे अध्यक्षपद देण्यात आले असून आंतरराष्ट्रीय धावपटू शरद सूर्यवंशी हे वरिष्ठ सहसचिव म्हणून काम पाहतील.

जगातील गरजू देशांना ‘युनिसेफ’ पुरवणार करोना लस

uicef

जगात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. जगातील सर्वच देशांना पुरवणे तितकेच अवघड काम आहे. यासाठी आता युनिसेफने पुढाकार घेतला असून जगातील गरजू देशांना महिन्याला ८५० टन करोना प्रतिबंधक लसीचे डोस पोहोचवणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
“संघटना पुढील वर्षापासून प्रत्येक महिन्याला सुमारे ८५० टन लसीचे डोस गरजू देशांना पुरवण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.
या कामात कोणत्याही प्रकारचा अभाव ठेवला जाणार नाही, तसेच प्राधान्याने हे काम केले जाईल.” करोना प्रतिबंधक लस विविध देशांमध्ये पोहोचवण्यासाठी व्यावसायिक विमानांचाच वापर करण्यात येईल. जर गरज पडलीच तर चार्टर्ड विमानही वापरली जातील.
या जीवघेण्या आजारावर लस विकसित करणाऱ्या देशांकडून गरीब देशांमध्ये ७० हजार फ्रीजची खरेदी करुन ते पुढील वर्षाच्या शेवटापर्यंत बसवले जातील.
‘कोवैक्स’ लसीला सुरक्षित ठेवण्यासाठी २ ते ८ डिग्री तापमानाची गरज असते.

mpsc telegram channel

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now