⁠  ⁠

चालू घडामोडी : २२ मार्च २०२१

Chetan Patil
By Chetan Patil 3 Min Read
3 Min Read

बॉस्फोरस बॉक्सिंग: निखत झरीन आणि गौरव सोलंकीला कांस्यEwr5QLdXMAY6brR 1

तुर्कस्तानच्या इस्तांबुल शहरात सुरू असलेल्या बॉस्फोरस बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या निखत झरीनला पराभवाचा धक्का बसला आहे.
महिलांच्या 51 किलो वजनी गटात खेळणाऱ्या निखतचा स्पर्धेच्या उपांत्य फेरीत तुर्कीच्या बुसेनाडने पराभव केला.
त्यामुळे निखतला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले आहे.
उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात निखतने दोन वेळा विश्वविजेती कझाकिस्तानच्या कझायबे नाझिमचा 4-1 असा पाडाव केला होता.
त्याअगोदर तिने गतविजेती रशियाची बॉक्सिंगपटू पल्टेसेवा एकटेरिनाला 5-0 असे पराभूत केले होते.
पुरुषांमध्ये 57 किलो वजनी गटात खेळणाऱ्या गौरव सोलंकीलाही कांस्यपदक घेऊन भारतात परतावे लागणार आहे.
अर्जेंटिनाच्या निर्को कुएलोने गौरवला उपांत्य सामन्यात 5-0 असे हरवत अंतिम फेरीत स्थान मिळवले.
2018च्या राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता गौरव सोलंकीने उपांत्यपूर्व फेरीत इकोल मिझानचा 4-1 असा पराभव केला होता.

दक्षिण आफ्रिकेत जगातील सर्वात धोकादायक रस्ते ; भारत  चौथ्या स्थानावरNarendra Modi Government: Busier roads, bigger money: Inside Modi govt's  new road monetisation plan

इंटरनॅशनल ड्रायव्हर एज्युकेशन कंपनी Zutobi नं आपल्या एका रिसर्च स्टडीवरून क्रमवारी जाहीर केली आहे.
या यादीत ५६ देशांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये भारतातील रस्तेही धोकादायक असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.
या क्रमवारीत भारत हा चौथ्या स्थानावर आहे.
धोकादायक रस्त्यांच्या यादीत थायलंड दुसऱ्या आणि युनायटेड किंगडम तिसऱ्या स्थानावर आहे.
सुरक्षित रस्त्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर जपान तर तिसऱ्या स्थानावर स्वीडन हे देश आहेत.
Zutobi दिलेल्या माहितीनुसार त्यांनी प्रत्येक देशांमध्ये ५ गोष्टींच्या आधारावर हे विश्लेषण करण्यात आलं आहे. प्रत्येक फॅक्टर्ससाठी १० गुण ठरवण्यात आले होते. त्यानंतर या ५ फॅक्टर्सची सरासरी काढण्यात आली.
जागतिक आरोग्य संघटनेच्या ग्लोबल हेल्थ ऑब्झरव्हेटरी आकडेवारीच्या आधारावर हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत.

विश्वचषक नेमबाजी स्पर्धा : सुवर्ण‘यशस्विनी’sp 1

बलाढय़ प्रतिस्पध्र्यावर मात करत भारताची नेमबाज यशस्विनी सिंह देस्वाल हिने आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी सुवर्णपदकाची कमाई केली.
मनू भाकर, सौरभ चौधरी यांना रौप्य तर अभिषेक वर्मा आणि दिव्यांश सिंह पनवार यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
दिव्यांशने शनिवारी सकाळी पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात देशाला पहिले कांस्यपदक मिळवून दिल्यानंतर महिलांच्या याच प्रकारात अंजूम मुदगिल हिची पाचव्या क्रमांकावर घसरण झाली.
भारतासाठी शनिवारचा दिवस संस्मरणीय ठरवला तो यशस्विनीने. महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात यशस्विनीने अंतिम फेरीत २३८.८ गुणांची कमाई करत सुवर्णयश संपादन केले. मनू भाकर हिला २३६.७ गुणांसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागलेसौरभ चौधरीने (२४३.२ गुण) अखेरच्या प्रयत्नांत घाई केल्यामुळे रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. इराणच्या जावेद फोरौघी याने २४३.६ गुणांसह सुवर्णपदक जिंकले.जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या दिव्यांशने पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली. दिव्यांशने अंतिम फेरीत २२८.१ गुण पटकावले.

राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धा : भवानी देवीला राष्ट्रीय विजेतेपदspt02 1

टोक्यो ऑलिम्पिकला पात्र ठरलेली पहिली भारतीय तलवारबाज सीए भवानी देवी (तमिळनाडू) हिने राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
भवानीने नवव्यांदा स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला.
याचप्रमाणे सेनादलच्या कुमारसन पद्म गिशो निधीने गतविजेत्या करण सिंगला (राजस्थान) हरवून पुरुषांच्या सॅबर प्रकारातील वैयक्तिक विभागात विजेतेपद जिंकले.
करण सिंगने नुकत्याच बुडापेस्टला झालेल्या पुरुषांच्या ‘सॅबर वर्ल्डकप’ स्पर्धेत भारतीयांमधील सर्वोत्तम कामगिरी केली होती.
या २० वर्षीय नवोदित गुणवान तलवारबाजाने जागतिक क्रमवारीत १९व्या असलेल्या कोन्स्टन्टाईन लोखानोवला नमवून बाद फेरीत प्रवेश मिळवला होता.

Share This Article