Uncategorized
चालू घडामोडी : २३ जुलै २०२०
Current Affairs 23 July 2020
६४ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच नोबेल पुरस्कार सोहळा रद्द
- जगावर ओढावलेल्या कोरोनाच्या दुष्ट संकटामुळे यावर्षी पार पडणारा नोबेल पुरस्कार सोहळाही रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- त्याचबरोबर माध्यमांच्या माहितीनुसार ६४ वर्षांच्या काळात पहिल्यांदाच या सोहळ्यात खंड पडल्याचे म्हटले जात आहे.
- यासंदर्भातील माहिती नोबेल पुरस्कारांचे आयोजन करणाऱ्या संस्थेने दिली आहे.
- तसेच हा पुरस्कार सोहळा वेगळ्या प्रकारे आयोजित करण्यात येणार असून त्याची लवकरच माहिती दिली जाणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
- नोबेल आठवडा ज्या प्रकारे आयोजित करण्यात येतो तसा यावेळी करण्यात येणार नाही.
- कोरोनाच्या महामारीमुळे सध्या यावेळची परिस्थिती वेगळी आहे. हे वर्ष गेल्या वर्षीच्या तुलनेत निराळे आहे.
- सध्या सर्वांना नव्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची गरज असल्यामुळे यावर्षीचा नोबेल पुरस्कार सोहळा रद्द केला जाणार असून तो नव्या स्वरूपात दिसेल, अशी माहिती नोबेल फाऊंडेशनचे संचालक लार्स हेकेन्स्टीन निवेदनाद्वारे दिली.
- दरम्यान, नोबेल पुरस्कारांच्या ६४ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच हा सोहळा रद्द करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये वाघांच्या दुप्पट लक्ष साध्य केल्याची नोंद
- भारताने 2010 साली 2022 पर्यंत वाघांची 8ahaah संख्या दुप्पट करण्याचे लक्ष ठेवले होते.
- ते 4 वर्ष अगोदरच म्हणजे 2018 सालीच पूर्ण झाले.
- जुलै 2019 मध्ये प्रकाशित व्याघ्र रिपोर्ट 2018 मध्ये भारतात 2967 वाघ असल्याचे सांगण्यात आले होते.
- 2006 पासून व्याघ्र गणना होते तर 2006 साली 1411 वाघ भारतात होते ती संख्या 2018 मध्ये 2967 झाली आहे.
- 2014 च्या तुलनेत 33% वाढ झाली आहे 2014 साली 2226 वाघ होते.
- सध्या जगातील 75 % वाघ हे भारतात आढळतात..
मुकेश अंबानी जगातील पाचवे श्रीमंत व्यक्ती
- रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी जगातील ५ वे श्रीमंत व्यक्ती ठरले.
- रिलायन्सच्या समभागांची किंमत २०१० रुपये होण्यासह ५.६२ लाख कोटींच्या संपत्तीसह ते फोर्ब्जच्या अव्वल-१० श्रीमंतांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर पोहोचले. बुधवारी त्यांची मालमत्ता २४,००० कोटींनी वाढली.
‘ध्रुवास्त्र’: नवे स्वदेशी क्षेपणास्त्र
- भारताने नव्या ‘ध्रुवास्त्र’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. हे क्षेपणास्त्र पूर्णपणे स्वदेशी निर्मित म्हणजेच मेड इन इंडिया आहे. हे क्विक रिस्पॉन्स देणारे क्षेपणास्त्र आहे.
- ‘ध्रुवास्त्र’ क्षेपणास्त्राची चाचणी ओडीशाच्या बालासोर चाचणी क्षेत्रात घेण्यात आली. ही चाचणी हेलिकॉप्टर-विना घेण्यात आली.
- ठळक वैशिष्ट्ये
- ध्रुवास्त्र क्षेपणास्त्राचा वापर भारतीय भुदलाकडील ध्रुव हेलिकॉप्टरसोबत तसेच भूमीवरून केला जाऊ शकतो.
- या क्षेपणास्त्राचा मारा पल्ला चार किलोमीटर ते सात किलोमीटर पर्यंत आहे.
- हे स्वयंचलितपणे मार्गक्रम करणारे म्हणजेच गाइडेड रणगाडा-भेदी क्षेपणास्त्र आहे. हे तिसऱ्या पिढीचे क्षेपणास्त्र आहे.
- या क्षेपणास्त्राची लांबी 1.9 मीटर आहे आणि व्यास 0.16 मीटर आहे. त्याचे वजन 45 किलोग्रॅम आहे.
- हे क्षेपणास्त्र 240 मीटर / सेकंद या गतीने प्रवास करू शकते.
- संरक्षण संशोधन व विकास संघटना (DRDO) यांनी तयार केलेल्या या क्षेपणास्त्राचे नाव आधी ‘नाग’ असे होते; जे नंतर बदलण्यात आले. हेलिकॉप्टरमार्फत सोडल्या जाणाऱ्या क्षेपणास्त्राच्या आवृत्तीला “हेलीकॉप्टर-लॉंच्ड NAG (HELINA / हेलीना)” असे नाव देण्यात आले आहे.