• Become a Guest Writer
  • Copyright
  • Privacy Policy
  • Contact Us
Tuesday, March 28, 2023
  • Login
Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation
  • Home
  • MPSC
  • MPSC Current Affairs
  • Study Material
  • Jobs
  • Inspirational
No Result
View All Result
Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation
No Result
View All Result

Home / चालू घडामोडी : २३ जुलै २०२०

चालू घडामोडी : २३ जुलै २०२०

July 23, 2020
Chetan PatilbyChetan Patil
in Daily Current Affairs
current affairs 23 july 2020
SendShare106Share
Join WhatsApp Group

Current Affairs 23 July 2020

६४ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच नोबेल पुरस्कार सोहळा रद्द

Molecular machines generate Nobel award for European researchers ...
  • जगावर ओढावलेल्या कोरोनाच्या दुष्ट संकटामुळे यावर्षी पार पडणारा नोबेल पुरस्कार सोहळाही रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • त्याचबरोबर माध्यमांच्या माहितीनुसार ६४ वर्षांच्या काळात पहिल्यांदाच या सोहळ्यात खंड पडल्याचे म्हटले जात आहे.
  • यासंदर्भातील माहिती नोबेल पुरस्कारांचे आयोजन करणाऱ्या संस्थेने दिली आहे.
  • तसेच हा पुरस्कार सोहळा वेगळ्या प्रकारे आयोजित करण्यात येणार असून त्याची लवकरच माहिती दिली जाणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
  • नोबेल आठवडा ज्या प्रकारे आयोजित करण्यात येतो तसा यावेळी करण्यात येणार नाही.
  • कोरोनाच्या महामारीमुळे सध्या यावेळची परिस्थिती वेगळी आहे. हे वर्ष गेल्या वर्षीच्या तुलनेत निराळे आहे.
  • सध्या सर्वांना नव्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची गरज असल्यामुळे यावर्षीचा नोबेल पुरस्कार सोहळा रद्द केला जाणार असून तो नव्या स्वरूपात दिसेल, अशी माहिती नोबेल फाऊंडेशनचे संचालक लार्स हेकेन्स्टीन निवेदनाद्वारे दिली.
  • दरम्यान, नोबेल पुरस्कारांच्या ६४ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच हा सोहळा रद्द करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये वाघांच्या दुप्पट लक्ष साध्य केल्याची नोंद

महाराष्ट्रात वाघ सुरक्षित आहेत का ...
  • भारताने 2010 साली 2022 पर्यंत वाघांची 8ahaah संख्या दुप्पट करण्याचे लक्ष ठेवले होते.
  • ते 4 वर्ष अगोदरच म्हणजे 2018 सालीच पूर्ण झाले.
  • जुलै 2019 मध्ये प्रकाशित व्याघ्र रिपोर्ट 2018 मध्ये भारतात 2967 वाघ असल्याचे सांगण्यात आले होते.
  • 2006 पासून व्याघ्र गणना होते तर 2006 साली 1411 वाघ भारतात होते ती संख्या 2018 मध्ये 2967 झाली आहे.
  • 2014 च्या तुलनेत 33% वाढ झाली आहे 2014 साली 2226 वाघ होते.
  • सध्या जगातील 75 % वाघ हे भारतात आढळतात..

मुकेश अंबानी जगातील पाचवे श्रीमंत व्यक्ती

Mukesh Ambani's Reliance Retail valued at USD 34 billion in new ...
  • रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी जगातील ५ वे श्रीमंत व्यक्ती ठरले.
  • रिलायन्सच्या समभागांची किंमत २०१० रुपये होण्यासह ५.६२ लाख कोटींच्या संपत्तीसह ते फोर्ब्जच्या अव्वल-१० श्रीमंतांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर पोहोचले. बुधवारी त्यांची मालमत्ता २४,००० कोटींनी वाढली.

‘ध्रुवास्त्र’: नवे स्वदेशी क्षेपणास्त्र

India successfully test fires Dhruvastra, anti-tank missile
  • भारताने नव्या ‘ध्रुवास्त्र’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. हे क्षेपणास्त्र पूर्णपणे स्वदेशी निर्मित म्हणजेच मेड इन इंडिया आहे. हे क्विक रिस्पॉन्स देणारे क्षेपणास्त्र आहे.
  • ‘ध्रुवास्त्र’ क्षेपणास्त्राची चाचणी ओडीशाच्या बालासोर चाचणी क्षेत्रात घेण्यात आली. ही चाचणी हेलिकॉप्टर-विना घेण्यात आली.
  • ठळक वैशिष्ट्ये
  • ध्रुवास्त्र क्षेपणास्त्राचा वापर भारतीय भुदलाकडील ध्रुव हेलिकॉप्टरसोबत तसेच भूमीवरून केला जाऊ शकतो.
  • या क्षेपणास्त्राचा मारा पल्ला चार किलोमीटर ते सात किलोमीटर पर्यंत आहे.
  • हे स्वयंचलितपणे मार्गक्रम करणारे म्हणजेच गाइडेड रणगाडा-भेदी क्षेपणास्त्र आहे. हे तिसऱ्या पिढीचे क्षेपणास्त्र आहे.
  • या क्षेपणास्त्राची लांबी 1.9 मीटर आहे आणि व्यास 0.16 मीटर आहे. त्याचे वजन 45 किलोग्रॅम आहे.
  • हे क्षेपणास्त्र 240 मीटर / सेकंद या गतीने प्रवास करू शकते.
  • संरक्षण संशोधन व विकास संघटना (DRDO) यांनी तयार केलेल्या या क्षेपणास्त्राचे नाव आधी ‘नाग’ असे होते; जे नंतर बदलण्यात आले. हेलिकॉप्टरमार्फत सोडल्या जाणाऱ्या क्षेपणास्त्राच्या आवृत्तीला “हेलीकॉप्टर-लॉंच्ड NAG (HELINA / हेलीना)” असे नाव देण्यात आले आहे.
Join WhatsApp Group
SendShare106Share
Chetan Patil

Chetan Patil

Tags: chalu ghadamodiCurrent AffairsMPSC Current Affairsचालू घडामोडी
Previous Post

नाशिक महानगरपालिकेत(NMC) विविध पदांच्या 811 जागा

Next Post

सोलापूर महानगरपालिकेत(SMC) विविध पदांची भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Become a Guest Writer
  • Copyright
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2015-2019 Mission MPSC. Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • MPSC
  • MPSC Current Affairs
  • Study Material
  • Jobs
  • Inspirational

© 2015-2019 Mission MPSC. Powered By Tech Drift Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In