⁠  ⁠

चालू घडामोडी : २४ जानेवारी २०२०

Chetan Patil
By Chetan Patil 3 Min Read
3 Min Read

Current Affairs 24 January 2020

अमेरिकी नागरिकत्वात वाढ

संबंधित इमेज

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्थलांतरित आणि व्हिसा धोरणांविषयी अनेक वेळा आक्रमक भूमिका घेतली आहे. सप्टेंबर २०१९मध्ये संपलेल्या वर्षात २०१८च्या तुलनेमध्ये ९.५ टक्क्यांनी वाढ झाल्याची दिसून आले.
नागरिकत्व वाढले, ग्रीन कार्डमध्ये घसरण
अमेरिकेमध्ये ३० सप्टेंबर २०१९ रोजी संपलेल्या १२ महिन्यांच्या काळामध्ये ८.३४ लाख परदेशी नागरिकांना नागरित्व देण्यात आले. गेल्या ११ वर्षांतील हा उच्चांक असून, सप्टेंबर २०१८मध्ये संपलेल्या वर्षापेक्षा हा आकडा ९.५ टक्क्यांनी जास्त आहे. मात्र, ५.७७ लाख जणांना कायम निवासासाठीचे ‘ग्रीन कार्ड’ देण्यात आले आहे. हा आकडा २०१८च्या तुलनेत ४७.४ टक्क्यांनी घसरला आहे.
मेक्सिको पहिल्या, भारत दुसऱ्या क्रमांकावर
अमेरिकेच्या अंतर्गत सुरक्षा विभागाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, २०१८मध्ये १ लाख ३१ हजार ९७७ मेक्सिकन नागरिकांना अमेरिकेचे नागरिकत्व देण्यात आले आहे. या यादीमध्ये मेक्सिकोचा पहिला क्रमांक आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर ५२ हजार १९४ संख्येसह भारतीय नागरिक आहेत. या यादीमध्ये चीन तिसऱ्या क्रमांकावर आहे. चीनच्या ३९ हजार ६०० नागरिकांना अमेरिकेने नागरिकत्व दिले आहे.
नागरिकत्वाची यादी
देश २०१८ अर्जांमधील प्रमाण (टक्के) २०१७ अर्जांमधील प्रमाण (टक्के)
मेक्सिको १,३१,९७७ १७.३ १,१८,५५९ १६.८
भारत ५२,१९४ ६.९ ५०,८०२ ७.२
चीन ३९,६०० ५.२ ३७,६७४ ५.३

कंपन्यांच्या ‘सीएसआर’ खर्चात १८ टक्के वाढ

राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) सूचिबद्ध कंपन्यांनी आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये सामाजिक दायीत्व उपक्रम अर्थात ‘सीएसआर’वर ११,९६१ कोटी रुपये खर्च केले, जे आधीच्या वर्षांच्या तुलनेत १८ टक्के अधिक होते. २०१७-१८ मध्ये याच कंपन्यांनी १०,१७९ कोटी रुपये खर्च केले होते. उल्लेखनीय म्हणजे या रकमेपैकी ४,४४० कोटी रुपये हे शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षणावर कंपन्यांकडून खर्च करण्यात आले आहेत.
एनएसई आणि प्राइम डेटाबेस यांनी संयुक्तपणे स्थापित केलेल्या ‘एनएसई इन्फोबेस डॉट कॉम’ या कंपनीने संकलित केलेल्या आकडेवारीनुसार, एनएसईवर सूचिबद्ध कंपन्यांकडून मागील पाच वर्षांत, सामाजिक उपक्रमांवरील खर्चात वार्षिक सरासरी १७ टक्के दराने दमदार वाढ होत आली आहे. विविध सामाजिक उपक्रमांवर सर्वाधिक खर्च करणाऱ्या अव्वल १० कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, ओएनजीसी, इंडियन ऑइल, एचडीएफसी बँक, टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेस, इन्फोसिस, टाटा स्टील, आयटीसी, एनटीपीसी आणि पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन यांचा समावेश आहे. या १० कंपन्यांचा एकूण खर्चात ३६ टक्के वाटा असल्याचे ‘एनएसई इन्फोबेस’चा अहवाल सांगतो.

स्वित्झर्लंडमध्ये साेन्याचे सर्वात लहान नाणे तयार

स्वित्झर्लंडने सोन्याचे जगातील सर्वात लहान नाणे तयार केले. २.९६ मिमीच्या या नाण्याच्या एका बाजूस अल्बर्ट आइन्स्टाइन यांची प्रतिमा आहे. ०.०६३ ग्रामची अशी केवळ ९९९ नाणी असून एका नाण्याची किंमत सुमारे १५ हजार रुपये आहे.

बुद्धिबळ : विश्वनाथ आनंद पुन्हा बराेबरीत; ४ गुणांसह १० व्या स्थानावर

भारताचा बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदने टाटा स्टील मास्टर्समध्ये रशियाच्या डेनियल दुबोवला बरोबरीत रोखले. पाच वेळेचा माजी जागतिक विजेता आनंद ४ गुणांसह दहाव्या स्थानी आहे. जागतिक विजेत्या नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनने एलिरेजा फिरोजासोबत ड्रॉ खेळत आपले दुसरे स्थान मिळवले. अमेरिकन कारुआनाने रशियाच्या वितिगोवला रोखले.

Share This Article