Current Affairs : 25 February 2021
मोटेरा येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमला पंतप्रधान मोदी यांचं नावं
जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असे अशी ओळख असलेल्या गुजरातच्या मोटेरा येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नावं देण्यात आलं आहे. स्टेडियमचं नामकरणं नरेंद्र मोदी स्टेडियम असं करण्यात आलं आहे.
पुनर्विकसित करण्यात आलेल्या या मैदानावर आजपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना प्रकाशझोतात रंगणार आहे.
प्रकाशझोतात होणाऱ्या पिंक बॉल क्रिकेट सामन्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून, सामना खेळवण्यापूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते स्टेडियमचं उद्घाटन करण्यात आलं.
२४ फेब्रुवारी २०२० रोजी याच स्टेडियममध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यानिमित्ताने नमस्ते ट्रम्प कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. होतं.
मोटेरा स्टेडियमध्ये सर्व अत्याधुनिक प्रकारच्या सेवा उपलब्ध असून, पूर्वीच्या स्टेडियममध्ये ५३ हजार प्रेक्षक बसू शकत होते.
त्याचा पुनर्विकास करण्यात आल्यानंतर या स्टेडियम आसन क्षमता १ लाख १० हजार इतकी झाली आहे.
डिसें. तिमाहीत १.३% सकारात्मक जीडीपी
चालू वित्त वर्षाच्या डिसेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीत देशाचा जीडीपी विकास दर सकारात्मक होऊन १.३ टक्क्यांवर पोहोचू शकतो.
याआधी दोन तिमाहीदरम्यान कोरोना महारोगराई पसरल्यामुळे यामध्ये मोठी घसरण नोंदली होती.
डीबीएस बँकेच्या अहवालात हा अंदाज व्यक्त केला. अहवालानुसार, वित्त वर्ष २०२०-२१ दरम्यान जीडीपीत ६.८% ची घसरण राहू शकते.
डीबीएस ग्रुपच्या रिसर्च इकॉनॉमिस्ट राधिका राव म्हणाल्या, कोरोनाचा वेगाने प्रसार आणि लोकांच्या खर्चात वेगाने खर्च वाढ होणे ही कारणे डिसेंबर २०२० तिमाहीसाठी चांगली ठरली.
अमेरिकेत कार्मिक व्यवस्थापन विभागाच्या प्रमुखपदी किरण आहुजा
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी कार्मिक व्यवस्थापन विभागाच्या प्रमुखपदी भारतीय वंशाचे कायदेतज्ञ आणि नागरी अधिकार कार्यकर्ते किरण आहुजा यांची नियुक्ती केली आहे.
आहुजा हे आशियातील नागरिकांशी संबंधित व्यवहारांमध्येही लक्ष घालणार आहेत.
बायडेन यांच्या प्रशासनामध्ये भारतीय वंशाच्या किमान 20 जणांची वरिष्ठ पदांवर नियुक्ती करण्यात आली आहे.
त्या सर्वांसह आहुजा या देखील आता आपल्या नवीन जबाबदारीची सूत्रे हाती घेणार आहेत.
बायडेन यांनी सत्तेची सूत्रे स्वीकारण्यासाठी जे वरिष्ठ अधिकारी कार्यरत होते, त्यामध्ये किरण आहुजा यांचाही समावेश होता.
कार्मिक व्यवस्थापन कार्यालयाच्यावतीने अमेरिकेतल्या प्रांतांमधील प्रशासकीय सेवा, सरकारी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्ये समन्वय आणि निवृत्तीनंतरच्या तसेच विम्याशी संबंधित लाभाच्या व्यवहारांमध्ये समन्वय साधण्याचे काम केले जाते.
पूर्वी बराक ओबामा यांच्या कारकिर्दीमध्ये किरण आहुजा यांनी कार्मिक व्यवस्थापन कार्यालयाच्या चीफ ऑफ स्टाफ म्हणून जबाबदारी सांभाळली होती. आता कार्मिक कार्यालयाच्या प्रमुख म्हणून त्यांच्या नियुक्तीवर सिनेटकडून शिक्कामोर्तब होणे आवश्यक असेल.