चालू घडामोडी : २५ मार्च २०२१
पॅरा नेमबाजी विश्वचषक: मनीष नरवालला विक्रमी सुवर्णपदक
यूएईच्या अल एन येथे सुरू असलेल्या पॅरा नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या मनीष नरवालने विश्वविक्रम रचला आहे.
पी 4 मिक्सड 50 मीटर पिस्टल एसएच 1 या प्रकारात मनीषने सुवर्णपदकाची कमाई करत नव्या विक्रमाला गवसणी घातली.
या स्पर्धेतील हे भारताचे दुसरे सुवर्णपदक आहे. याआधी सिंगराजने 10 मीटर एअर पिस्टल एसएच 1 प्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे.
2019 सिडनी वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील कांस्यपदक विजेता मनीषने 229.1 गुण नोंदवत जुना विक्रम मोडला.
त्याच्या आधी सर्बियाच्या रास्तको जोकिकने 2019मध्ये ओसीजेक येथे 228.6 गुण मिळवत विक्रम रचला होता.
नरवालशिवाय इराणच्या सारेह जवानमार्डीने 223.4 गुण मिळवले. तर, सिंगराजने 201.7 गुणांसह कांस्यपदक जिंकले.
स्पर्धेच्या सहा दिवसानंतर युक्रेनने चार सुवर्ण, चार रौप्य व एक कांस्यपदकांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे.
तर, यजमान संयुक्त अरब अमिरातीने (युएई) तीन सुवर्ण व एक रौप्यपदकासह दुसरे स्थान राखले आहे. भारत दोन सुवर्ण, एक रौप्य व एक कांस्यपदकांसह पदकांच्या क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आहे.
विवेक मूर्ती अमेरिकेचे सर्जन जनरल झाले
भारतीय वंशाचे डॉक्टर विवेक मूर्ती अमेरिकेचे सर्जन जनरल असतील.
सिनेटने मूर्तींच्या नियुक्तीला ४३ विरुद्ध ५७ मतांनी मंजुरी दिली.
ते ओबामांच्या कार्यकाळात २०१३ मध्येही सर्जन जनरल होते.