९३ व्या ऑस्कर पुरस्कार जाहीर
सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणारा ९३ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात यंदा ‘नोमडलँड’सिनेमाने बाजी मारली आहे.
या सिनेमाने तीन पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं आहे.
या सिनेमासाठी अभिनेत्री फ्रान्सिस मॅकडॉर्मंड हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. तर क्लोई जाओ यांना दिग्दर्शनासाठी पुरस्कार प्राप्त झाला आहे.
‘नोमडलँड’ या सिनेमाने सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार पटकावत 2021 सालातील ऑस्कर पुरस्कारावर नाव कोरलं आहे.
लॉस एन्जेलेसमध्ये हा सोहळा पार पडतोय. युनियन स्टेशन आणि डॉल्बी थिएटर इथं हा सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे.
यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात ‘द प्रॉमिसिंग यंग वुमन’, ‘द फादर’, ‘नोमेडलँड’, ‘साऊंड ऑफ मेटल’ ‘जुडास अॅण्ड द ब्लॅक मसीहा’ या सिनेमांना वेगवेगळ्या श्रेणीत पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.
अभिनेते अँथनी हॉपकिंस यांना ‘द फादर’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.
अभिनेता टायलर पेरी यांला 2021 सालातील ह्युम्यानिटेरियन पुरस्कार प्राप्त झाला आहे. टायलर पेरी उत्तम अभिनेत्यासोबतच दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथा लेकख आहे.
‘मँक’ या सिनेमाला बेस्ट प्रॉडक्शन डिझाइनसाठी पहिला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. डोनाल्ड ग्रॅहाम बर्ट यांना प्रॉडक्शन डिझाइनसाठी हा पुरस्कार मिळाला आहे.
पद्मभूषण राजन मिश्र यांचं निधन
प्रसिद्ध शास्त्रीय गायक पद्मभूषण राजन मिश्र यांचे निधन झाले.
राजन मिश्र यांचा जन्म १९५१ मध्ये झाला आणि वाराणसीमध्ये झाला. राजन मिश्र हे प्रसिद्ध शास्त्रीय गायक होते.
त्यांना २००७ मध्ये भारत सरकारद्वारे कला क्षेत्रासाठी पद्मभूषण देऊन सन्मानित करण्यात आलं होतं.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश मोहन शांतनगौडर यांचे निधन
सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश मोहन एम शांतनगौडर यांचे निधन झाले. ते ६२ वर्षांचे होते.
शांतनगौडर यांचा जन्म कर्नाटकात ५ मार्च १९५८ रोजी झाला होता. ते ५ सप्टेंबर १९८० रोजी वकील झाले.
नंतर कर्नाटक उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून त्यांची १२ मे २००३ रोजी नेमणूक करण्यात आली.
त्यानंतर न्यायालयात सप्टेंबर २००४ मध्ये स्थायी न्यायाधीशपदी त्यांची नेमणूक झाली. त्यांची केरळ उच्च न्यायालयात २२ सप्टेंबर २०१६ रोजी बदली झाली. नंतर त्यांची सर्वोच्च न्यायालयात नेमणूक झाली.
विश्वचषक तिरंदाजी स्पर्धा : भारतीय महिलांना सुवर्णपदक
भारतीय महिलांच्या रिकव्र्ह संघाने रोमहर्षक लढतीत मेक्सिकोचा ५-४ असा पाडाव करत विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरले.
विश्वचषक स्पर्धेत भारताने तब्बल सात वर्षांनंतर पहिले सांघिक सुवर्णपदक मिळवले.
दीपिकाचे हे विश्वचषक स्पर्धेतील पाचवे सांघिक सुवर्णपदक ठरले.
दीपिकाने शूट-ऑफ फेरीत १० गुण मिळवत २०१२च्या लंडन ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेत्या आयडा रोमन हिच्यावर दबाव आणला. अखेर आयडाला नऊ गुणांची आवश्यकता असताना फक्त आठ गुण मिळवता आले.
भारताचे हे रिकव्र्ह प्रकारातील पाचवे सुवर्णपदक ठरले. याआधी भारताने शांघाय (२०११), मेडेलिन (२०१३), क्रोक्लॉ (२०१३, २०१४) सुवर्णपदक पटकावले होते.
गव्हर्नर्स चषक बॉक्सिंग स्पर्धा : अमितला कांस्यपदक
भारताचा अव्वल बॉक्सिंगपटू अमित पांघल (५२ किलो) याला उपांत्य फेरीत जगज्जेत्या शाखोबिदिन झोइरोव्ह याच्याकडून हार पत्करावी लागली. त्यामुळे अमितला गव्हर्नर्स चषक बॉक्सिंग स्पर्धेत कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
जागतिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकणाऱ्या अमितवर उझबेकिस्तानच्या झोइरोव्हने ०-५ असा सहज विजय मिळवला. विद्यमान ऑलिम्पिक विजेत्या झोइरोव्हकडून अमितला दुसऱ्यांदा पराभव पत्करावा लागला. २०१९च्या जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत झोइरोव्हने अमितला हरवले होते.
२३ वर्षीय अमितने आशियाई क्रीडा स्पर्धा आणि आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले होते.