देश-विदेश
स्कॉर्पिअन पाणबुड्यांची माहिती लीक नव्हे तर चोरी झाली
# भारतीय नौदलासाठी बनवण्यात आलेल्या स्कॉर्पिअन या पानबुड्यांबद्दलची गोपनीय माहिती चोरी झाल्याचा दावा फ्रेंच सरकारच्या सूत्रांनी केला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फ्रान्सच्या डीसीएनएस या कंपनीत कार्यरत असणाऱ्या नौदल कर्मचाऱ्यांने २०११ मध्ये ही माहिती चोरल्याचे म्हटले आहे. या फ्रान्स कर्मचाऱ्याचे भारतामध्ये प्रशिक्षण सुरु असताना त्याची कामावरुन हाकलपट्टीही देखील केल्याचे सूत्रांकडून समजते. तसेच चोरी झालेले दस्ताऐवज गोपनिय नसल्याचे देखील फ्रान्स सूत्रांनी स्पष्ट केले. भारतीय नौदलासाठी बनवण्यात आलेल्या स्कॉर्पिअन या पानबुड्यांबद्दलची गोपनीय माहिती भारतातून लीक झाली नसल्याचे भारतीय नौदलाने स्पष्ट केले आहे.
पेलेट गन्सला लवकरच पर्याय!
# गेल्या ४७ दिवसांपासून काश्मीरमध्ये सुरू असलेल्या संघर्षांत फार मोठय़ा प्रमाणावर लोकांना जखमी करणाऱ्या छऱ्याच्या बंदुकांना (पेलेट गन्स) पर्याय शोधला जाईल, असे आश्वासन देऊन गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी काश्मिरी लोकांच्या जखमांवर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला. काश्मिरी लोकांपर्यंत पोहचण्याच्या केंद्र सरकारच्या प्रयत्नांचा भाग म्हणून केंद्रीय गृहमंत्री महिनाभरात दुसऱ्यांदा अशांत काश्मीरमध्ये गेले आहेत. ‘इन्सानियत, जम्हूरियत व काश्मिरियत’ यांच्या परिघात जम्मू- काश्मीरला भेडसावणाऱ्या समस्यांबाबत कुणाशीही बोलण्यास सरकार तयार असल्याचे ते म्हणाले.
[edsanimate_start entry_animation_type= “fadeIn” entry_delay= “0” entry_duration= “1” entry_timing= “linear” exit_animation_type= “” exit_delay= “” exit_duration= “” exit_timing= “” animation_repeat= “infinite” keep= “yes” animate_on= “load” scroll_offset= “” custom_css_class= “”]स्पर्धा परीक्षांचे अपडेट आपल्या मोबाईलवर मोफत मिळवा! अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.[edsanimate_end]
ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्स नरेंद्र मोदींचे
# पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोशल मीडियावर सध्या चांगलेच गाजत आहेत. कारण ट्विटरवर सर्वाधिक फॉलो केले जाणा-या भारतीयांच्या यादीत ते पहिल्या क्रमांकावर आले आहेत. मोदींचे ट्विटरवर २ कोटी २१ लाख एवढे फॉलोअर्स आहेत. आतापर्यंत अमिताभ बच्चन यांचे सर्वाधिक फॉलोअर्स होते, परंतु अमिताभ यांना मागे टाकत मोदी एक नंबरवर आले आहेत. अमिताभ बच्चन यांचे ट्विटरवर २ कोटी २० लाख फॉलोवर्स आहेत तर मोदी यांचे फॉलोअर्स हे बच्चन यांच्यापेक्षा एक लाखांहून अधिक आहे. इतकेच नाही तर जगात राजकिय नेत्यांमध्ये सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या नेत्यांच्या यादीमध्ये मोदींचा समावेश आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना सर्वाधिक फॉलो केले जाते. ओबामानंतर ट्विटरवर फॉलो केले जाणारे मोदी हे दुसरे राजकिय नेता आहे.
भविष्यात सर्व एसटी गाडय़ा वातानुकूलित
# सर्वसामान्य शेतकरीही वातानुकूलित एसटी बसमधून फिरायला हवा, त्यासाठी भविष्यात राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बस वातानुकूलित करण्याचा प्रयत्न असल्याची ग्वाही परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिली. राज्य परिवहन महामंडळाच्या नवीन कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
क्रीडा
तिसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतर दिलशानची निवृत्ती
# दम्बुला येथे होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतर श्रीलंकेचा सलामीवीर फलंदाज तिलकरत्ने दिलशान एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करणार आहे. देशाला दिलेल्या अतुल्य योगदानाबद्दल २८ ऑगस्टला होणारा हा सामना ३९ वर्षीय दिलशानला समर्पित करण्यात येणार आहे, असे श्रीलंका क्रिकेट मंडळाने स्पष्ट केले आहे. दिलशानने याबाबत तातडीने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
आढावा समितीच्या प्रमुखपदी अभिनव बिंद्रा
# रिओ ऑलिम्पिक स्पध्रेत भारतीय नेमबाजांना एकही पदक पटकावता आले नाही. त्यांच्या या अपयशाची चौकशी करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय रायफल असोसिएशनने नेमलेल्या आढावा समितीच्या प्रमुखपदी नेमबाज अभिनव बिंद्राची गुरुवारी नियुक्ती करण्यात आली. भारताला ऑलिम्पिक स्पध्रेत पहिले वैयक्तिक सुवर्णपदक जिंकून देणारा अभिनव पाच सदस्यीस समितीचा प्रमुख असेल. ही समिती खेळाडूंच्या कामगिरीचा आढावा घेणार असून त्रुटी शोधून काढणार आहेत. त्यांनी सुचवलेल्या सुचनांवर असोसिएशन काम करणार आहे आणि पुढील ऑलिम्पिकमध्ये या चुका पुन्हा होऊ नये, याची काळजी घेणार आहे.
अर्थव्यवस्था
आता खातेक्रमांकांशिवाय करता येणार बॅंकिंग!
# मुंबई – ‘कॅशलेस‘ व्यवहारांद्वारे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये अधिकाधिक पारदर्शकता आणण्याच्या दृष्टिने एक पाऊल पुढे टाकत रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने खातेक्रमांकाशिवाय मोबाईल क्रमांकावर आधारित बॅंकिंगची सुविधा देणाऱ्या प्रक्रियेला हिरवा कंदील दाखविला आहे. नॅशनल पेमेंटस् कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (एनपीसीआय) युनिफाइड पेमेंटस् इंटरफेस (यूपीआय) प्रणालीला रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने हिरवा कंदील दाखविला आहे. यूपीआयच्या माध्यमातून ग्राहकांना पैसे पाठवणे आणि स्वीकारणे यासारखे व्यवहार क्षणार्धात पूर्ण करता येणार आहेत. गुगल प्ले स्टोअरवर यूपीआय-एनेबल्ड मोबाइल ऍप पुरवणाऱ्या बॅंकांच्या ग्राहकांना यूपीआयचा वापर करून बॅंकिंग व्यवहार करता येतील. मोबाइल ऍप्लिकेशनद्वारे मोठ्या प्रमाणात क्षणार्धात पैसे पाठवणे आणि स्वीकारण्याचा प्रयत्न अद्याप कुठेही झालेला नाही. यूपीआय भारतीय बॅंकिंग क्षेत्रासाठी क्रांतिकारक ठरेल असे
दक्षिण कोरिया- इराणचा युरोतून व्यापार होणार
# सोल : दक्षिण कोरियाने इराणशी युरो चलनाच्या माध्यमातून 29 ऑगस्टपासून व्यापार सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिण कोरियाचे अर्थमंत्री यू इल-हो यांनी गुरुवारी ही माहिती दिली. अर्थमंत्री इल-हो म्हणाले, “”पुढील सोमवारपासून इराणशी व्यापार सुरू होईल. हा व्यापार युरो चलनाच्या माध्यमातून होईल. इराणशी व्यापार आणि गुंतवणूक करण्यातील अडथळे दूर झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. केईबी हाना बॅंक, शिनीहान बॅंक आणि वूरी बॅंक या तीन बॅंकांमार्फत हा व्यवहार होणार आहे.‘‘ याआधी दक्षिण कोरिया इराणमधून केलेली तेल खरेदी आणि इराणमधील बांधकाम प्रकल्प यांची देणी देण्यासाठी वॉन चलनाचा उपयोग करीत होता. पश्चिमी देशांनी इराणवरील आंतरराष्ट्रीय निर्बंध उठवल्याने पुन्हा अनेक देशांचा व्यापार पूर्ववत सुरू होत आहे.
[edsanimate_start entry_animation_type= “fadeIn” entry_delay= “0” entry_duration= “1” entry_timing= “linear” exit_animation_type= “” exit_delay= “” exit_duration= “” exit_timing= “” animation_repeat= “infinite” keep= “yes” animate_on= “load” scroll_offset= “” custom_css_class= “”]स्पर्धा परीक्षांचे अपडेट आपल्या मोबाईलवर मोफत मिळवा! अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.[edsanimate_end]