Current Affairs : 26 January 2021
एस. पी. बालसुब्रमण्यम यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार
प्रसिद्ध गायक एस.पी.बालसुब्रमण्यम यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती भवनाकडून पद्म पुरस्कार विजेत्यांची यादी जाहीर करण्यात आली.
बालसुब्रमण्यम यांनी हिंदीसोबतच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीदेखील गाजवली
बालसुब्रमण्यम यांची ‘साथिया ये तुने क्या किया’, ‘ये हसीन वादियाँ’, ‘सच मेरे यार’, ‘आ जा शाम होने आयी’, ‘तेरे मेरे बीच में’ ही गाणी तुफान लोकप्रिय झाली.
संयुक्त राष्ट्राच्या सल्लागार मंडळात जयती घोष
संयुक्त राष्ट्र संघाच्या (यूएन) वीस सदस्यीय उच्चस्तरीय सल्लागार मंडळात भारताच्या अर्थतज्ज्ञ जयती घोष यांचा समावेश झाला आहे.
कोरोनानंतर जगासमोर येणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी हे मंडळ सल्ला देईल.
घोष यांनी ३५ वर्षे जवाहरलाल विद्यापीठात अर्थशास्त्राचे धडे दिले आहेत.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अँड सोशल अफेयरने (युएनडीइएसए) सल्लागार मंडळाच्या 20 सदस्यांची घोषणा केली आहे. यात सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रातील 20 तज्ञांची नावे सामील आहेत. हे सल्लागार मंडळ पुढील दोन वर्षांपर्यंत नेतृत्व आणि वैचारिक पातळीवर संयुक्त राष्ट्रसंघाला बळकटी देणार आहे.
हवामान बदलाचा फटका : टाॅप १० देशांत भारतही
हवामान बदलाचा परिणाम झालेल्या १० देशांमध्ये भारताचाही समावेश आहे. जर्मनवॉचने ग्लोबल क्लायमेट रिस्क इन्डेक्स-२०२१ मध्ये हा दावा केला आहे.
यादीत भारत सातव्या क्रमांकावर आहे, तर मोझाम्बिक पहिल्या स्थानी आहे.
झिम्बॉब्वे, जपान आणि मलावी भारतापेक्षा वर आहेत. अहवालानुसार, २०००-२०१९ दरम्यान हवामानाशी संबंधित घटनांत ४.८ लाख मृत्यू झाले.
गिरीश प्रभुणे, सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला, सोमवारी केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली.
महाराष्ट्रातील सहा जणांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यांत २९ महिलांचा समावेश आहे.
सिंधुताई सपकाळ आणि गिरीश प्रभुणे यांना सामाजिक कार्याबद्दल, नामदेव कांबळे यांना साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल, लोककलावंत परशुराम गंगावणे यांना कलाक्षेत्रातील आणि जसवंतीबेन पोपट यांना उद्योग क्षेत्रातील कामगिरीसाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला. उद्योजक रजनीकांत श्रॉफ यांना पद्मभूषण पुरस्कार घोषित करण्यात आला.
पंजाबमधील उद्योजिका रजनी बेक्टर यांना पद्मश्री सन्मान जाहीर करण्यात आला.
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे आणि दिवंगत गायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
आसामचे माजी मुख्यमंत्री दिवंगत तरुण गोगोई, गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल, माजी केंद्रीय मंत्री दिवंगत रामविलास पासवान आणि लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना पद्मभूषण जाहीर करण्यात आला.
राष्ट्रपतींनी सात पद्मविभूषण, १० पद्मभूषण आणि १०२ पद्मश्री असे ११९ पद्म पुरस्कार देण्यास मान्यता दिली आहे, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने सांगितले. या यादीत २९ महिलांचा समावेश आहे. १६ जणांना मरणोत्तर पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
‘पद्मश्री’ पुरस्कार मिळणे अनपेक्षितच आहे. उपेक्षित, वंचित वर्गासाठी केलेल्या कामासाठी हा पुरस्कार आहे. पारधी, भटक्या विमुक्तांच्या व्यथा, वेदना समजल्या, त्यावर काही उपाययोजना करू शकलो.
गलवानमधील शहीद संतोष बाबूंना महावीरचक्र
पूर्व लडाख सीमेवर गलवान खोऱ्यात गेल्या वर्षी चिनी सैनिकांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेले कर्नल संतोष बाबू यांना महावीरचक्रने सन्मानित करण्यात आले आहे.
पाच जणांना कीर्तिचक्र, पाच जणांना वीरचक्र आणि सात जणांना शाैर्यचक्र मिळाले.
गलवान खोऱ्यातच शहीद झालेले नायब सुभेदार नुदूराम सोरेन, हवालदार के. पलानी, नायक दीपक सिंह, शिपाई गुरतेज सिंग, हवालदार तेजेंदरसिंग यांना वीरचक्रने सन्मानित करण्यात आले आहे.
अग्निशमन पदकाने ७४ जवानांचा सन्मान होईल. ८ जणांना ‘राष्ट्रपतींचे फायर सर्व्हिस मेडल’ देण्यात येईल. २ जवानांना ‘फायर सर्व्हिस मेडल’ने सन्मानित केले जाईल.
विशिष्ट सेवेसाठी १४ जवान, ‘फायर सर्व्हिस मेडल’ने ५० जवान सन्मानित केले जातील.
देशभरातील ३२ मुलांना पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार जाहीर झाले आहेत.
यात महाराष्ट्रातील पाच जणांचा समावेश आहे. शौर्य पुरस्कारासाठी नांदेडच्या कामेश्वर वाघमारे, तर क्रीडा पुरस्कारासाठी मुंबईच्या काम्या कार्तिकेयनची निवड झाली.
संशोधन क्षेत्रातल्या पुरस्कारासाठी जळगावची अर्चिता पाटील, सोनित सिसोलेकर आणि नागपूरचा श्रीनभ अग्रवाल यांची निवड झाली.
विविध क्षेत्रांमधील उल्लेखनीय आणि अपवादात्मक कामगिरीसाठी हे पुरस्कार देतात.
महाराष्ट्रातील ५७ पोलिसांना राष्ट्रपती पोलिस पदके जाहीर झाली. चार अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक, १३ पोलिस अधिकाऱ्यांना पोलिस शौर्य पदक, तर ४० जणांना पोलिस पदक जाहीर झाले. अग्निशमन सेवेतील चौघांना राष्ट्रपती पदके जाहीर झाली. ३ तुरुंग कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती सुधारात्मक सेवा पदक मिळेल. ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार’ तिघांना मिळाले आहेत.