चालू घडामोडी : २६ मार्च २०२०

Current Affairs 26 March 2020

विवरणपत्रांना केंद्राची मुदतवाढ

करोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असताना केंद्र सरकारने करदाते व उद्योग जगतासाठी दिलासादायक निर्णय घेतले. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या अर्थव्यवस्थेची घडी विस्कटली असल्याचे लक्षात घेऊन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या निर्णयांची घोषणा केली. प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याच्या मुदतीत वाढ, बँकेच्या एटीएमचा विनाशुल्क अमर्यादित वापर, आधार क्रमांक पॅन कार्डला जोडण्याच्या मुदतीत वाढ, टीडीएस विवरणपत्र दाखल करण्यास मुदतवाढ आदी अनेक निर्णयांचा यात समावेश आहे.
जून २०२०पर्यंत कोणत्याही बँकेच्या एटीएममधून कोणत्याही डेबिट कार्डाच्या माध्यमातून विनाशुल्क पैसे काढता येणार. बँक शाखांवरील भार कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

 • बँकांच्या बचत खात्यांमध्ये किमान शिल्लक रक्कम ठेवण्याची अट रद्द. स्टेट बँकेकडून या सुविधेची यापूर्वीच अंमलबजावणी.
 • व्यापारी व्यवहारांवरील डिजिटल शुल्कामध्ये कपात.
 • आधार क्रमांक पॅन कार्डला जोडण्याची मुदत ३१ मार्च रोजी संपत होती. मात्र या प्रक्रियेस ३० जूनपर्यंत मुदतवाढ.
 • आर्थिक वर्ष २०१८-१९ची प्राप्तिकर विवरणपत्र दंडासह दाखल करण्याच्या अंतिम मुदतीत ३० जूनपर्यंत वाढ.
 • विलंबाने भरणा होणाऱ्या टीडीएसवरील व्याजामध्ये कपात. हा व्याजदर आता १८ टक्‍क्‍यांऐवजी नऊ टक्के.
  ‘जीएसटी’ ३० जूनपर्यंत
 • ‘विवाद से विश्वास’ या योजनेला ३० जूनपर्यंत मुदतवाढ. यासाठी १० टक्के अतिरिक्त दंडरक्कम भरण्याची गरज नाही.
 • मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांचे जीएसटी कर विवरणपत्र तसेच, कंपोझिशन योजनेतील परताव्यांना ३० जूनपर्यंत मुदतवाढ.
 • पाच कोटी रुपयांपर्यंतची आर्थिक उलाढाल असणाऱ्या कंपन्यांना विलंब शुल्क व दंडातून पूर्णपणे माफी. पाच कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल असणाऱ्या कंपन्यांना केवळ ९ टक्‍क्‍यांनी व्याज आकारणी.
 • कस्टम क्लीअरन्स सुविधा ३० जूनपर्यंत अहोरात्र.

कोरोनाच्या जागतिक यादीत भारत ४३ व्या तर चिन पहिल्या

Image result for coronavirs

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसने बाधित जागतिक यादीत चिन प्रथम तर ईटली दूसर्या क्रमांकावर कायम असून भारत ४३ व्या क्रमांकावर आहे. जगातील थेट आकडेवारी देणार्या वर्ल्ड ओ मिटरच्या यादीत हि नोंद आहे. कोरोना विषाणूचे संशयित , जगात एकूण ४,३४,५९५ केसेस असून त्यातून १११,८५३ लोक बरे झाले असून १९,६०३ लोकांचा मृत्यू झाला आहे. एकूण आकडेवारीच्या ३०३,१३९ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील सौम्य रुग्णांची संख्या २८९,९१६ असून गंभिर परिस्थिति असलेल्या रुग्णांची संख्या १३,२२३ अशी आहे.
भारतात कोरोनाच्या एकूण ५६२ रुग्ण असून नविन २६ केसेसची भर पडली आहे. यांत, १० बाधितांचा मृत्यू झाला असून ४० रुग्ण बरे झाले आहेत. एकूण आकडेवारीच्या ५१२ लोकांना व्हायरसची लागण झाली असल्याचे वर्ल्ड ओ मिटरच्या आकडेवारीत जाहीर झाली आहे.
दहा हजार पेक्षा जास्त बाधित देश व कोरोना बाधित नागरिकांची आकडेवारी –
चिन – ८१,२१८
ईटली – ६९,१७६
अमेरिका – ५४,९४१
स्पेन – ४७,६१०
जर्मनी – ३४,००९
ईराण -२७,०१७
फ्रान्स – २२,३०४
स्वित्झलँड – १०,१७१

Leave a Comment