चालू घडामोडी : २६ नोव्हेंबर २०२०
Current Affairs : 26 November 2020
९३व्या ऑस्कर अवॉर्डसाठी भारताकडून मल्याळम सिनेमा ‘जल्लीकट्टू’ला नामांकन
९३व्या ऑस्कर अवॉर्डसाठी मल्याळम चित्रपट जल्लीकट्टूला नामांकन देण्यात आले आहे.
भारताकडून ऑस्करसाठी जल्लीकट्टू शिवाय बरेच आणखीन चित्रपट शर्यतीत होते. यात शंकुतला देवी, शिकारा, गुंजन सक्सेना, भोंसले, गुलाबो सिताबो, सिरीयस मॅन, बुलबुल, कामयाब, द पिंक इज स्काय या चित्रपटांचा समावेश होता.
याशिवाय मराठी चित्रपट बिटरस्वीट आणि डिसाइपलदेखील या शर्यतीत होते.
जल्लीकट्टू चित्रपटाची कथा वार्के आणि अँटनी नामक व्यक्तीवर आधारीत आहे जो एक कत्तलखाना चालवत असतो. त्याच्या कत्तलखान्यामध्ये म्हशींना मारून विकले जात असते.
एक दिवस एक म्हस कत्तलखान्यातून पळून जाते आणि संपूर्ण गावात दहशत माजवते.
तिला कंट्रोल करण्यासाठी पोलिसांना बोलवले जाते. संपूर्ण गाव तिला पकडण्यासाठी एकत्र येतात. मात्र म्हस कुणाच्या कंट्रोलमध्ये येत नाही. चित्रपटात म्हशीवर वेगवेगळ्या पद्धतीने कंट्रोल करण्यासाठी प्रयत्न करताना दाखवले गेले आहे.
म्हस गर्दीतून स्वतःला कशी वाचवते हे दाखवले गेले आहे.
‘आयसीसी’चे नवे कार्याध्यक्ष ग्रेग बार्कले
न्यूझीलंड क्रिकेटचे प्रमुख ग्रेग बार्कले यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीचे (आयसीसी) नवे कार्याध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.
बार्कले यांनी कार्याध्यक्षपदाच्या शर्यतीत असणाऱ्या सिंगापूरच्या इम्रान ख्वाजा यांना ११-५ या फरकाने नमवले.
भारताचे सध्याचे ‘आयसीसी’चे कार्याध्यक्ष शशांक मनोहर यांचे उत्तराधिकारी म्हणून बार्कले काम पाहतील.
१६ क्रिकेट मंडळांच्या संचालकांनी या निवडणुकीत मतदान केले. त्या निवडणुकीमध्ये मतदान करण्यासाठी कसोटी खेळणाऱ्या १२ देशांच्या क्रिकेट मंडळांच्या अध्यक्षांचा समावेश होता. तसेच तीन संलग्न देश आणि एक स्वतंत्र महिला संचालक (पेप्सिकोच्या इंद्रा नूयी) यांचा मतदान करणाऱ्यांमध्ये सहभाग होता.
बार्कले हे ऑकलंडस्थित व्यावसायिक वकील असून न्यूझीलंड क्रिकेट मंडळाचे २०१२ पासून अध्यक्ष आहेत. आता लवकरच ते त्यांच्या देशाच्या क्रिकेट मंडळाचा राजीनामा देतील. बार्कले यांनी २०१५च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतही संचालक म्हणून जबाबदारी सांभाळली होती.
भारतीय वंशाचे डॉ.गौरव शर्मा न्यूझीलंडच्या संसद सदस्यपदी
भारतीय वंशाचे डॉ.गौरव शर्मा यांनी न्यूझीलंडमध्ये संसद सदस्य म्हणून शपथ घेत इतिहास रचला आहे.
डॉ. शर्मा यांनी न्यूझीलंडच्या संसदेत संस्कृत भाषेत शपथ घेतली. गौरव शर्मा मुळचे हिमाचल प्रदेश राज्यातील हमीरपूर जिल्ह्यातील आहेत.
हेमिल्टन वेस्टमधून लेबर पार्टीकडून गौरव शर्मांनी निवडणूक लढवली होती.
न्यूझीलंडमधील उच्चायुक्त मुक्तेश परदेशी गौरव शर्मा यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे. गौरव शर्मा न्यूझीलंडच्या संसदेचे सर्वात तरुण संसद सदस्य आहेत.
48व्या आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारांत ‘दिल्ली क्राइम’ सर्वोत्कृष्ट
‘दिल्ली क्राईम’या नेटफ्लिक्सवरील वेबसिरीजमध्ये डीसीपी वर्तिका चतुर्वेदीच्या रोलमध्ये झळकलेली अभिनेत्री ‘शेफाली शाह’ची इमानदार पोलीस अधिकारी महिलेची भूमिका खूप गाजली होती.
दरम्यान, या वेबसिरीजची लोकप्रियता बघून 48व्या आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट ड्रामा सीरिजचा पुरस्कार ‘दिल्ली क्राईम’ला जाहीर करण्यात आला आहे.
कोरोना व्हायरसच्या संकटामुळे 48व्या वर्षात पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड्स लाइव्ह पार पडला. 2012 साली दिल्लीत झालेल्या गँगरेपवर आधारीत ही सीरिज आहे. दिल्ली क्राइममधील अभिनेत्री शेफाली शाहने या सीरिजला एमी अवॉर्ड्स मिळाल्याचा आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट देखील शेअर केली आहे.