---Advertisement---

Current Affairs 29 March 2019

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

चांद्रयान २ मोहिमेसाठी भारत सज्ज, नासासोबत संयुक्त मोहिम

  • भारताच्या चांद्रयान १ मोहिमेच्या यशानंतर आता भारतीय शास्त्रज्ञांनी चांद्रयान – २ या मोहिमेवर लक्ष केंद्रित केले आहे. या चांद्रयान मोहिमेमध्ये अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासा देखील सहभागी होत आहे.
  • नासाची चंद्राचे परीक्षण करणारी दोन लेझर उपकरणं भारतीय चांद्रयान व इस्त्रायली बेरेशीट यांच्या माध्यमातून चंद्रावर पाठवण्यात येणार आहे. या उपकरणांना लेझर रिफ्लेक्टर्स असे म्हटले जाते.
  • भारताचे चांद्रयान २ व इस्त्रायली बेरेशीट एप्रिल ११ रोजी चंद्रावर दाखल होणार आहेत. चांद्रयान नासाच्या उपकरणाला चंद्रापर्यंत घेऊन जाणार आहे. नासा व इस्त्रो यांच्या या संयुक्त मोहिमेमुळे पृथ्वी व चंद्र यांच्यातील अंतर अत्यंत अचूकपणे मोजण्यास मदत मिळणार आहे.

आशियाई नेमबाजी स्पर्धा : भारतीय नेमबाजांना एक सुवर्ण आणि दोन रौप्य

  • तैपेईमधील ताओयुआन येथे सुरू असलेल्या आशियाई एअरगन अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी भारतीय नेमबाजांनी एक सुवर्ण आणि दोन रौप्यपदकांची कमाई केली.
  • रवी कुमार आणि ईलाव्हेनिल व्हालारिव्हान जोडीने १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक प्रकारात रौप्यपदक मिळवले. पात्रता फेरीत रवी आणि ईलाव्हेनिल यांनी ८३७.१ गुणांसह आघाडी मिळवली होती.
  • कोरियाने ४९९.६ गुणांसह सुवर्णपदक मिळवले, भारतीय जोडीच्या खात्यावर ४९८.४ गुण जमा होते. चायनीज तैपेईच्या जोडीला कांस्यपदक मिळाले. दीपक कुमार आणि अपूर्वी चंडेला या दुसऱ्या भारतीय जोडीला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
  • स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सौरभ चौधरी आणि मनू भाकर जोडीने १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते. याचप्रमाणे विजयवीर सिधू आणि ईशा सिंग जोडीने कनिष्ठ गटात सुवर्णपदक पटकावले.

सोल्सजार झाले मँचेस्टर युनायटेड फुटबॉल क्लबचे नवे मॅनेजर

  • मँचेस्टर युनायटेड हा संघ फुटबॉल क्लब इतिहासातील सर्वात नामांकीत संघांपैकी एक म्हणून ओळखला जातो. ओले गुन्नर सोल्सजार
  • मँचेस्टर युनायटेड फुटबॉल संघाचे नवे व्यवस्थापक झाले आहेत. याआधी ते नॉर्वे नॅशनल फुटबॉल संघाचे मॅनेजर म्हणून कार्यरत होते.
  • ४८ वर्षीय ओले गुन्नर सोल्सजार १९९६ ते २००७ दरम्यान इंग्लिश प्रिमिअर लीगमध्ये मँचेस्टर युनायटेड क्लबचा खेळाडू म्हणून खेळत होते. या संघाकडून खेळताना त्यांनी २३५ सामन्यांत ९१ गोल मारले आहेत. आज ११ वर्षानंतर पुन्हा एकदा ते मँचेस्टर युनायटेड क्लबमध्ये परतले आहेत.
  • याआधी त्यांनी Molde, Cardiff City, व Norway national football फुटबॉल संघांचे मॅनेजर म्हणून काम केले आहे.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now