Current Affairs : 29 November 2020
उत्तर प्रदेशात ‘लव्ह जिहाद’ विरोधातील कायदा लागू
उत्तर प्रदेशात लव्ह जिहाद आणि जबरदस्तीने धर्मांतराविरोधी अध्यादेशाचा मसूदा राज्यपालांनी स्वाक्षरी करत मंजुरी दिली.
हे अध्यादेशाला सहा महिन्यांमध्ये विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर करावे लागतील. त्यानंतरच ते कायमस्वरुपी लागू होतील.
खोटं बोलून, फसवून किंवा कट-कारस्थान करुन धर्मांतर करण्याला प्रतिबंध घालण्यासाठी योगी सरकारने हे अध्यादेश काढले आहेत.
केवळ लग्नासाठीच जर मुलीचं धर्मांतर करण्यात आलं तर असं लग्न केवळ अमान्य घोषित करण्यात येईल तर धर्मांतर करणाऱ्यांना १० वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षाही होऊ शकते.
एखाद्याला धर्मांतर करायचे असल्यास जिल्हा दंडाधिकाऱ्यांना दोन महिन्यांपूर्वी याची सूचना द्यावी लागेल. याचे उल्लंघन झाल्यास सहा महिने ते तीन वर्षंपर्यंत शिक्षा होऊ शकते. या गुन्ह्यासाठी कमीत कमी १०,०००० रुपयांचा जामीन आवश्यक आहे. जर धर्मांतर प्रकरणामध्ये अल्पवयीन महिला, अनुसुचित जाती आणि जमातीतील महिलांचा समावेश असेल तर दोषीला ३ ते १० वर्षांचा तुरुंगवास आणि कमीत कमी २५,००० रुपये दंडाची शिक्षा होणार आहे.
अमेरिकेत मृत्यूदंडाची पद्धती बदलणार
अमेरिकेत मृत्यूदंडाची पद्धती बदलण्यासाठी जस्टीस डिपार्टमेंट गांभीर्याने विचार करीत असून आता विषारी इंजेक्शनशिवाय फायरिंग स्क्वाड आणि विषारी वायूचा उपयोग केला जाण्याची शक्यता आहे.
याबाबतची दुरुस्ती फेडरल रजिस्टरमध्ये प्रसिद्ध करण्यात आली असून त्यामध्ये विविध राज्ये मृत्यूदंडासाठी इतर मार्गाचा वापर करू शकतील असे म्हटले आहे.
सध्या अमेरिकेतील राज्ये आपापल्या राज्यातील नियमाप्रमाणे इलेक्ट्रिक चेअर, नायट्रोजन वायू अशा विविध मार्गाचा वापर करतात माविम नॉयम २४ डिसेम्बरपासून अमलात येणार आहे.
अमेरिकेत नवीन जो बायडेन हे अध्यक्ष सत्तेवर येण्यापूर्वी जस्टीस डिपार्टमेंटने ५ मृत्यूदंडाच्या शिक्षा अमलात आणण्याचे नियोजन केले असून त्यापैकी ३ मृत्यूदंडाची शिक्षा बायडेन अध्यक्षपदावर बसण्यापूर्वी ३ दिवस आधी अमलात आणल्या जाणार आहेत.
जस्टीस डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीप्रमाणे फेडरल डेथ पेनल्टी ऍक्टप्रमाणे संबंधित राज्ये आपल्या नियमाप्रमाणे मृत्यूदंडाची शिक्षा अमलात अनु शकतात.
टेस्लाचे प्रमुख एलन मस्क जगातील तिसरे श्रीमंत व्यक्ती मार्क झुकरबर्गला मागे टाकले
ब्लूमबर्ग बिलिनेयर इंडेक्सनुसार, एलन मस्क यांच्याकडे 110 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे, तर फेसबुकचे मार्क झुकरबर्ग 104 अब्ज डॉलर्स संपत्तीसह चौथ्या स्थानावर आहेत. एलन मस्क यांच्या रॉकेट कंपनीने चार अंतराळवीरांना अंतराळात पाठवल्यानंतर एकाच दिवसात त्यांच्या संपत्तीमध्ये सुमारे 7.61 अब्ज डॉलर्सची वाढ झाली. याव्यतिरिक्त इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्ला ही एस अँड पी 500 कंपन्यांच्या यादीत सामील झाली आहे. मस्क यांच्या वार्षिक संपत्तीमध्ये आतापर्यंत तब्बल 82 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे.
जगभरातील पहिल्या 5 श्रीमंत व्यक्ती
१) अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस
२) मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स
३) टेसलाचे संस्थापक एलन मस्क
४) फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग
५) एलव्हीएमएचचे बर्नार्ड अर्नाल्ट
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेकडून ‘प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना’ सादर :
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) यांनी त्याच्या मंचावर ‘प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना’ ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी PNB मेटलाइफ इंडिया विमा कंपनी सोबत करार केला. विशेषत: भारतातल्या बँकिंग व्यवस्था उपलब्ध नसलेल्या तसेच दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांना विमा संरक्षण आणि आर्थिक सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशाने हा करार झाला आहे.
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेत नावनोंदणी करण्यासाठी किमान वयोमर्यादा 18 वर्ष तर कमाल वयोमर्यादा 50 वर्ष आहे. विमाधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्याकडून नामनिर्देशित व्यक्तीला 2 लक्ष रुपयांपर्यंत विम्याची रक्कम दिली जाते. योजनेच्या अंतर्गत विमा हस्तांतरित केला जाऊ शकत नाही तसेच अवधी संपल्यानंतर कोणताही लाभ दिला जात नाही.
‘वरुणास्त्र’: भारताचा स्वदेशी टॉरपीडो
भारताच्या संरक्षण संशोधन व विकास संघटनेचे अध्यक्ष जी. सतीश रेड्डी यांच्या हस्ते ‘वरुणास्त्र’ या स्वदेशी टॉरपीडोच्या पहिल्या निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन झाले. पाणबुडी किंवा जहाज नष्ट करण्यासाठी टॉरपीडो हे सर्वात अचूक शस्त्र आहे.
‘वरुणास्त्र’ हा भारताचा पहिला पूर्ण स्वदेशी टॉरपीडो आहे. वरुणास्त्र 40 किलोमीटर अंतरापर्यंत कोणतीही पाणबुडी नष्ट करण्यास सक्षम आहे. ते ताशी 74 किलोमीटर वेगाने हल्ला करते. वरुणास्त्र टॉरपीडोचे वजन सुमारे दीड टन आहे. ते पाणबुडीभेदी टॉरपीडो असून यात 250 किलो स्फोटके वाहून नेण्याची क्षमता आहे.