Uncategorized
चालू घडामोडी : ३१ जुलै २०२०
Current Affairs 31 July 2020
अमेरिकेचे सर्वात मोठे रोव्हर मंगळाकडे झेपावले
- अमेरिकेच्या ‘नासा’ अंतराळ संशोधन संस्थेने त्यांचे आजवरचे सर्वात मोठे व चौथे रोव्हर मंगळ ग्रहाकडे रवाना केले.
- ‘पर्सेव्हरन्स’ (चिकाटी) या नावाचे हे रोव्हर या तांबड्या ग्रहावर लाखो वर्षांपूर्वी सूक्ष्मजीवसृष्टीच्या अस्तित्वाचे पुरावे मिळतात का याचा शोध घेईल व तसे काही नमुने मिळाल्यास ते संशोधनासाठी पृथ्वीवर घेऊन येईल.
- मंगळ व पृथ्वी परस्परांच्या सर्वाधिक जवळ येण्याचा काळ सध्या सुरु असून, त्याचा फायदा घेऊन गेल्या आठवडाभरात संयुक्त अरब अमिरात व चीन यांच्या पाठोपाठ मानवाने मंगळाकडे सोडलेले हे तिसरे यान आहे.
- फ्लोरिडा राज्यातील केप कॅनेव्हेराल अंतराळ तळावरून ‘अॅटलास-५’ अग्निबाणाने ‘पर्सेव्हरन्स’ला कवेत घेऊन उड्डाण केले. हे रोव्हर साडेसहा महिन्यांनी मंगळाच्या कक्षेत पोहोचल्यानंतर मंगळाच्या पृष्ठभागावरील ‘झेझेरो’ नावाच्या विशाल विवरात १८ फेब्रुवारी रोजी उतरविण्याची योजना आहे.
जागतिक क्रमवारीतील ‘नंबर १’ अॅशले बार्टीची US Openमधून माघार
- जागतिक टेनिस क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान असणारी ऑस्ट्रेलियन महिला टेनिसपटू अॅशले बार्टी हिने यंदाच्या अमेरिकन ओपन खुल्या टेनिस स्पर्धेतून (US Open) माघारी घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
- ३१ ऑगस्ट ते १३ सप्टेंबर या दरम्यान न्यूयॉर्कमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे.
- बार्टीने एप्रिल २०१० मध्ये व्यावसायिक टेनिसमध्ये पदार्पण केले. पण तिला पहिलं ग्रँडस्लॅम जिंकण्यासाठी ९ वर्षे वाट पाहावी लागली. २०१९ च्या फ्रेंच ओपन स्पर्धेचे विजेतेपद तिने मिळवले. २०१०पासून तिने ८ स्पर्धांची विजेतेपदे मिळवली आहेत पण त्यात एकाच ग्रँडस्लॅम विजेतेपदाचा समावेश आहे.
गणितज्ञ शकुंतलादेवी यांच्या विक्रमाची गिनिज बुकात नोंद
- देशातल्या थोर गणितज्ञ आणि वेगाने आकडेमोड करण्यासाठी प्रसिद्द असलेल्या दिवंगत शकुंतलादेवी यांना त्यांनी चाळीस वर्षापूर्वी लंडनमध्ये केलेल्या विश्वविक्रमासाठीच गिनिज बुक ऑफ रेकॉर्डचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. नवी दिल्लात झालेल्या या कार्यक्रमात त्यांची कन्या अनुपमा बॅनर्जी यांनी हे प्रमाणपत्र स्विकारले.
- 18 जुन 1980 या दिवशी लंडनमधील इंपिरीयल कॉलेजमध्ये झालेल्या कार्यक्रमादरम्यान शकुंतला देवी यांनी 13 आकडी दोन संख्यांचा गुणाकार केवळ 28 सेकंदांमध्ये केला होता.“जेव्हा आईने हा विश्वविक्रम केला तेव्हा आपण केवळ दहा वर्षांची होते.
- त्यांच्या जीवनावर येत असलेल्या चित्रपटाच्या प्रर्दशनाच्या आधल्याच दिवशी हा कार्यक्रम झाला. अनु मेनन दिग्दर्शित या चित्रपटात विद्या बालन मुख्य भूमिकेत आहे.