⁠  ⁠

चालू घडामोडी – ८ ऑक्टोबर २०१६

Tushar Bhambare
By Tushar Bhambare 7 Min Read
7 Min Read

देश-विदेश

# जुआन मॅन्युएल संतोस यांना शांततेसाठीचा ‘नोबेल’ पुरस्कार
कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष जुआन मॅन्युएल संतोस यांना शांततेसाठीचा ‘नोबेल’ पुरस्कार शुक्रवारी जाहीर करण्यात आला आहे. शांततेसाठीच्या नोबेल पुरस्काराकडे जगभरात अतिशय प्रतिष्ठेने बघितले जाते. यंदाच्या पुरस्कारासाठी एकूण ३७६ उमेदवारांची नावे चर्चेत होती. त्यातून समितीने संतोस यांच्या नावाची निवड केली. वास्तविक गेल्याच आठवड्यात संतोस यांनी जनमतासाठी ठेवलेला शांततेसाठीचा करार स्थानिक नागरिकांनी फेटाळला होता. तरीही संतोस यांनी समर्पित वृत्तीने केलेल्या कामाबद्दल त्यांचा या पुरस्काराने गौरव करण्यात येत असल्याचे समितीने म्हटले आहे. ओस्लोमध्ये पत्रकार परिषदेत संतोस यांच्या नावाची भारतीय वेळेनुसार शुक्रवारी दुपारी घोषणा करण्यात आली. देशातील विस्थापितांचे पुनर्वसन आणि नागरी हिंसाचार संपुष्टात आणण्यासाठी संतोस यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून त्यांच्या नावाची निवड करण्यात आली असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.

[edsanimate_start entry_animation_type= “fadeIn” entry_delay= “0” entry_duration= “1” entry_timing= “linear” exit_animation_type= “” exit_delay= “” exit_duration= “” exit_timing= “” animation_repeat= “infinite” keep= “yes” animate_on= “load” scroll_offset= “” custom_css_class= “”]स्पर्धा परीक्षांचे अपडेट आपल्या मोबाईलवर मोफत मिळवा! अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.[edsanimate_end]<

# २०१८ पर्यंत भारत – पाक सीमा सील करणार – राजनाथ सिंह
२०१८ पर्यंत भारत आणि पाकिस्तान सीमारेषा संपूर्णपणे सील करु अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केली आहे. सीमारेषेवरील राज्यांमध्ये माहितीची देवाणघेवाण व्हावी यासाठी सेक्यूरिटी ग्रीड ही नवी संकल्पना राबवू असेही सिंह यांनी जाहीर केले आहे. पाकिस्तानला लागून असलेल्या चार राज्यांचे मुख्यमंत्री आणि सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांसह भारत- पाकिस्तान सीमेवरील सुरक्षाविषयक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह शुक्रवारी जैसलमेरमध्ये आले होते. मुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडल्यावर राजनाथ सिंह यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. देशाच्या सुरक्षेशी आम्ही तडजोड करणार नाही. भारत पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. अशा स्थितीत आपण सर्वांनीच एकता दाखवणे गरजेचे आहे असे राजनाथ सिंह म्हणालेत. राहुल गांधी यांच्या रक्ताची दलाली या विधानावर प्रतिक्रिया विचारली असता राजनाथ सिंह यांनी प्रतिक्रिया देणे टाळले आहे.

# प्रचारासाठी सार्वजनिक निधीचा वापर केल्यास राजकीय पक्षांची मान्यता रद्द करण्याचे आदेश
भविष्यात कोणत्याही राजकीय पक्षाला स्वत:च्या प्रचारासाठी सार्वजनिक निधी, सार्वजनिक जागा अथवा सरकारी साधनांचा वापर करता येणार नाही, असे स्पष्ट आदेश शनिवारी निवडणूक आयोगाने दिले. या आदेशांचे उल्लंघन केल्यास संबंधित पक्षाची मान्यता रद्द करण्यात येईल, अशा इशाराही निवडणूक आयोगाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काळात सार्वजनिक सुविधांचा वापर करून स्वत:चा किंवा पक्षचिन्हाचा प्रचार करण्याच्या राजकीय पक्षांच्या मनसुब्यांना चाप बसणार आहे. यापूर्वी महाराष्ट्रातील आयकर विवरणपत्र आणि लेखा परीक्षित लेख्यांची प्रत सादर करण्यात दिरंगाई करणा-या राजकीय पक्षांना राज्य निवडणूक आयोगाने दणका दिला होता. नोटीस बजावूनही ही कागदपत्र सादर न करणा-या ५७ अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांची नोंदणी निवडणूक आयोगाने रद्द केली होती.

[edsanimate_start entry_animation_type= “fadeIn” entry_delay= “0” entry_duration= “1” entry_timing= “linear” exit_animation_type= “” exit_delay= “” exit_duration= “” exit_timing= “” animation_repeat= “infinite” keep= “yes” animate_on= “load” scroll_offset= “” custom_css_class= “”]स्पर्धा परीक्षांचे अपडेट आपल्या मोबाईलवर मोफत मिळवा! अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.[edsanimate_end]<

# सिंधू करार एकतर्फी रद्द होऊ शकत नाही
सिंधू पाणी करार भारत व पाकिस्तान या दोन्ही देशांवर बंधनकारक असून त्यात करारातून बाहेर पडण्याचे कलम नाही. त्यामुळे भारत हा करार एकतर्फी रद्द करू शकत नाही, अशी भूमिका पाकिस्तानने घेतली आहे. सिंधू पाणी करार हा कालबद्ध नसून, तो कधीच निश्चित कालावधीवर किंवा कार्यक्रमावर अवलंबून नव्हता. दोन्ही देशांसाठी तो बंधनकारक असून त्यात बाहेर पडण्याची तरतूद नाही, असे परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते नफीस झकारिया यांनी सांगितले. हा करार एकतर्फी रद्द केला जाऊ शकत नाही किंवा त्यात एकतर्फी बदल केले जाऊ शकत नाहीत, असे या कराराच्या कलम १२ तील (३) व (४) या उपतरतुदींमध्ये नमूद केले असल्याचे झकारिया म्हणाले.

# बिहारमधील दारूबंदी कायदा रद्दबातल करण्याच्या निकालास स्थगिती
बिहार सरकारने दारू विक्री व सेवनावर बंदी घालण्यासाठी केलेला कायदा पाटणा उच्च न्यायालयाने रद्दबातल केला होता, परंतु सर्वोच्च न्यायालयाने आता उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास स्थगिती दिली आहे. न्या. दीपक मिश्रा व न्या. यू. यू. ललित यांनी दारू उत्पादकांसह सर्व संबंधितांना नोटिसा जारी केल्या आहेत. दारू उत्पादकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, त्यावर उच्च न्यायालयाने नीतिशकुमार सरकारने केलेला दारू विक्री व सेवनबंदीचा कायदा बेकायदेशीर असल्याचे म्हटले होते. आता सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी आठ आठवडय़ांनी ठेवली आहे. कायदा रद्दबातल करण्याच्या उच्च न्यायालयाच्या ३० सप्टेंबरच्या निकालास बिहार सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने कायदा रद्दबातल ठरवला असला तरी त्यानंतर राज्य सरकारने २ ऑक्टोबर म्हणजे गांधी जयंतीपासून दारू विक्री व सेवनबंदीबाबत नवा कायदा अधिसूचित केला आहे.

# रेल्वेची प्रवाशांना सुखद भेट, एक पैशांत मिळणार १० लाखांचा विमा
भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी एक खुशखबर आणली आहे. खास दसरा, दिवाळी निमित्त शुक्रवार (दि. ७ सप्टेंबर) पासून रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एक पैशांत १० लाखांचा प्रवासी विम्याचा लाभ घेता येणार आहे. वैकल्पिक यात्रा विमा योजनेअंतर्गत आतापर्यंत प्रवाशांना यासाठी ९२ पैसे द्यावे लागत होते. प्रवाशांच्या मिळालेल्या प्रतिसादामुळे तात्पुरत्या स्वरूपात ९२ पैशांऐवजी एक पैसा प्रीमियम करण्यात आले आहे. एक पैशांत दि. ३१ ऑक्टोबरपर्यंत सर्व तिकिटांवर विमा काढता येईल. प्रवाशांना रेल्वेकडून ही दिवाळीची भेट असल्याचे आयआरसीटीसीचे व्यवस्थापकीय संचालक ए. के. मनोचा यांनी सांगितले. वैकल्पिक विम्याच्या प्रीमियमची रक्कम कमी करण्यावर आमचा विचार सुरू असून याची अंमलबजावणी लवकरच करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र

# कुपोषण निवारणासाठी ७५ लाखांचा निधी
ठाणे-पालघर जिल्ह्य़ांतील कुपोषणाचा मुद्दा समोर आला असताना रायगड जिल्ह्य़ातही १४१ तीव्र कुपोषित आणि ९६८ कुपोषित बालके आढळून आली होती. तर निधीआभावी ‘‘अमृत आहार’’ योजनेचा बोजवारा उडाला होता. याची गंभीर दखल घेऊन पालकमंत्री प्रकाश मेहता यांच्या मान्यतेने कुपोषणनिवारणासाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून ७५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी शीतल उगले यांनी दिली आहे.

[edsanimate_start entry_animation_type= “fadeIn” entry_delay= “0” entry_duration= “1” entry_timing= “linear” exit_animation_type= “” exit_delay= “” exit_duration= “” exit_timing= “” animation_repeat= “infinite” keep= “yes” animate_on= “load” scroll_offset= “” custom_css_class= “”]स्पर्धा परीक्षांचे अपडेट आपल्या मोबाईलवर मोफत मिळवा! अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.[edsanimate_end]<

TAGGED:
Share This Article