ESIC Recruitment 2025 : कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) मार्फत भरतीची जाहिरात निघाली आहे. याबाबत अधिक माहितीसाठी esic.gov.in वेबसाइटवर जा. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर वॉक इन इंटरव्ह्यूसाठी हजर राहावे लागेल. २८ आणि २९ तारखेला इच्छुकांनी या मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.
एकूण रिक्त जागा : ५२
रिक्त पदाचे नाव :
प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर (स्टॅटस्टिशन) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
शैक्षणिक पात्रता :
या नोकरीसाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमडी, एमएस, डीएनबी पूर्ण केलेले असावे. याचसोबत विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रता वेगळी असणार आहे. या नोकरीसाठी टीचिंगशिवाय इतर क्षेत्रात कामाचा अनुभव असावा.
वयोमर्यादा : या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा ६९ वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
किती पगार मिळेल?
कर्मचारी राज्य विमा निगममध्ये प्रोफेसर पदांसाठी उमेदवारांना 2,55,960 रुपये पगार मिळणार आहे. असोसिएट प्रोफेसर पदासाठी 1,70,208 रुपये पगार मिळणार आहे. असिस्टंट प्रोफेसर पदासाठी 1,46,232 रुपये पगार मिळणार आहे.
परीक्षा फी : सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ५०० रुपयांचे डिमांड ड्राफ्ट बनवावा लागणार आहे. या नोकरीसाठी इंटरव्ह्यूसाठी सकाळी ९ ते १०.३० वाजेपर्यंत उपस्थित राहायचे आहे. अधिक माहितीसाठी वेबसाइटला भेट द्या.
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा









