⁠  ⁠

भारतीय निर्यात-आयात बँक मुंबई येथे भरती ; जाणून घ्या तपशील

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

भारतीय निर्यात-आयात बँक मुंबई येथे भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारणकडून अर्ज मागविण्यात आले आहे.   उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2021असणार आहे.

पदाचे नाव : HR सल्लागार

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव :

या पदभरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा कमीतकमी 15 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच HR बाबींमध्ये सल्लागार सेवा प्रदान करण्याचा अनुभव, आरक्षणाचं संपूर्ण ज्ञान आणि समज असणं आवश्यक. सार्वजनिक क्षेत्रातील बँका, आरबीआय किंवा मोठ्या खासगी सेक्टर बँकेतू GM / CGM म्हणून निवृत्त असणारे उमेदवार आवश्यक.

इतका मिळणार पगार

या पदासाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांचा पगार हा त्यावेळी ठरवला जाणार आहे. तसंच पगार हा Negotiable असणार आहे. उत्तम कामगिरीनंतर काही रक्कमही दिली जाणार आहे.

वयोमर्यादा :

या पदभरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय वयवर्षे 70 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी असणं आवश्यक आहे.

ही असणार जबाबदारी

बँकेच्या एचआर बाबी / धोरणांवर सल्ला देण्यासाठी, भरती, पदोन्नती, वेतन आणि पगार पुन्हा डिझाइन करणे भरपाई रचना, शिस्तविषयक बाबी इत्यादी जबाबदारी असणार आहे. निवड करण्यात आलेले उमेदवार एक वर्षासाठी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असणार आहे. त्यानंतर काम बघून हाकॉन्ट्रॅक्ट वाढवण्यात येणार आहे.

अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी : [email protected]

निवड प्रक्रिया : या पदभरतीसाठी शॉर्टलिस्ट करण्यात आलेल्या उमेदवारांची थेट मुलाखत घेण्यात येणार आहे. त्यानंतर उमेदवांची निवड करण्यात येणार आहे.

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 25 सप्टेंबर 2021

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा 

Share This Article