⁠  ⁠

मुंबईत 10वी/12वी/पदवीधरांना केंद्र सरकारच्या नोकरीची सुवर्णसंधी ; 291 जागांवर भरती

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

बहुतांश तरुण तरुणी सरकारी नोकरी मिळविण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहे. तुम्हीही यापैकी असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. 10वी ते पदवीधरांना केंद्र सरकारच्या नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. वेळ वाया न घालता पात्र उमेदवारांनी त्वरित अर्ज करावा. ही भरती आयकर विभागामार्फत सुरु आहे. या भरतीद्वारे विविध पदांच्या 291 जागा भरल्या जातील. त्यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 291

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) इंस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स (ITI) 14
शैक्षणिक पात्रता :
(i) पदवीधर (ii) संबंधित क्रीडा पात्रता
2) स्टेनोग्राफर 18
शैक्षणिक पात्रता :
(i) 12वी उत्तीर्ण (ii) संबंधित क्रीडा पात्रता
3) टॅक्स असिस्टंट (TA) 119
शैक्षणिक पात्रता
: (i) पदवीधर (ii) संबंधित क्रीडा पात्रता
4) मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) 137
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित क्रीडा पात्रता.
5) कॅन्टीन अटेंडंट 03
शैक्षणिक पात्रता
: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित क्रीडा पात्रता.

क्रीडा पात्रता: राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू/आंतरविद्यालयामध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू/अखिल भारतीय शाळेने आयोजित केलेल्या राष्ट्रीय खेळ /खेळांमध्ये भाग घेणारे खेळाडू/राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित खेळाडू (सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा)

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2023 रोजी 18 ते 30 वर्षे [OBC: 05 वर्षे सूट, SC/ST: 10 वर्षे सूट]
परीक्षा फी : ₹200/-
इतका पगार मिळेल :
इंस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स (ITI) – 44,900/- ते 1,42,400/-
स्टेनोग्राफर – 25,500/- ते 81,100/-
टॅक्स असिस्टंट (TA) – 25,500/- ते 81,100/-
मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – 18,000/- ते 56,900/-
कॅन्टीन अटेंडंट-18,000/- ते 56,900/-

नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 जानेवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ :
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article