मित्रांनो, कालच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विक्रीकर निरीक्षक पूर्व २०१६ परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. तुमच्यापैकी बरेच जण २९ जानेवारी २०१७ रोजी होणाऱ्या एस. टी. आय. पूर्व परीक्षेची तयारी करत असणार. अनेकांना प्रश्न पडतो ऑब्जेक्टीव्ह पेपर कसा सोडवावा? पुढील लेखाद्वारे पेपर सोडवतांना वेळेचे नियोजन कसे करावे याचा तुम्हाला अंदाज येईल.
[quote arrow=”yes”]माझ्या मते तुम्ही जर खालीलप्रमाणे प्रश्न पत्रिका सोडवण्यासाठी वेळेचं नियोजन केलं तर तुम्ही ठरलेल्या वेळेत सर्व प्रश्न सोडवू शकाल.[/quote]
पूर्व परीक्षेला १०० प्रश्न – सोडवण्यासाठी ६० मिनिटे असतात.
साधारणपणे, विषयानुसार खालीलप्रमाणे प्रश्न येतात.
- अंकगणित व बुद्धिमापन – १५ प्रश्न
- भूगोल – १५ प्रश्न
- इतिहास – १५ प्रश्न
- विज्ञान – १५ प्रश्न
- राज्यशास्त्र – १० प्रश्न
- चालू घडामोडी – १५ प्रश्न
- अर्थव्यवस्था – १५ प्रश्न
(हे अंदाजित असून यात कमी जास्त होण्याची शक्यता आहे. मी सांगतोय म्हणून भूगोलाचे १५ च प्रश्न येतील असे नाही.)
पेपर देत असतांना पुढीलप्रमाणे वेळेची विभागणी केल्यास तुम्ही सर्व प्रश्न सोडवू शकतात.
- १० मिनिटे – शेवटच्या क्षणी रिविजन साठी म्हणजे काही प्रश्न राहिले असतील तर त्यांना सोडवण्यासाठी राखून ठेवावेत.
- अंकगणिताचे १५ प्रश्न सुरुवातीला सोडवू नयेत कारण त्यात भरपूर वेळ वाया जातो. ते प्रश्न सर्वात शेवटी सोडवावेत. त्यासाठी १० मिनिटे बाजूला ठेवावेत.
- उरलेले ८५ प्रश्न ४० मिनिटांत सोडवायाचेत. ४० मिनिट x ६० सेकंद = २४०० सेकंद
- २४००/८५ = २८ म्हणून प्रत्येक प्रश्न २८ सेकंदात सोडवायचा प्रयत्न करावा.
- ज्या प्रश्नाचं उत्तर “येतच” नसेल तर तो प्रश्न लगेच सोडून द्यावा आणि पुढच्या प्रश्नाकडे जावे. तो प्रश्न क्रमांक तुम्ही “रफ वर्क” कराल त्या जागी लिहून ठेवावा किंवा प्रश्नाच्या अगदी समोर एक लहानसा कोणाला दिसणार नाही अशी खून करून ठेवावी म्हणजे लगेच तुम्हाला कळेल कि तो प्रश्न राहून गेलाय.
- एखादा प्रश्न २० सेकंदात सोडवता आला नाही तर त्याला सोडून पुढील प्रश्नाकडे जावे.
- जर प्रत्येक प्रश्नाला तुम्ही २० सेकंद दिलेत तर पहिल्या राउंड मध्ये ८५ प्रश्नांना २८ मिनिटे लागतील. (८५ प्रश्न X २० सेकंद = १७०० सेकंद/६० = २८ मिनिटे)
- दुसरा राउंड १२ मिनिटांचा असेल. तर १२ मिनिटांत राहून गेलेले प्रश्न सोडवावेत. तेव्हा सुद्धा वरील प्रमाणे २० सेकंदाचा रूल वापरावा.
- १० मिनिटांत अंक गणितावरील १५ प्रश्न सोडवावेत.
- सर्वात शेवटी १० मिनिटे उरतील तर त्यादरम्यान राहून गेलेले बाकी प्रश्न सोडवावेत.
विद्यार्थी मित्रांनो यानंतर हि तुमचे काही प्रश्न असल्यास खाली दिलेल्या कॉमेंट बॉक्सद्वारे विचारू शकतात. लेख आवडल्यास सोशल मिडियावर नक्की शेअर करा. नियमित अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज – Mission MPSC
ऑल द बेस्ट मित्रांनो !!!