⁠  ⁠

Indian Navy मुंबई येथे 338 जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

नेव्हल डॉकयार्ड मुंबई अंतर्गत भारतीय नौदलाने (Indian Navy Mumbai Dockyard) भरती आयोजित केली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. अप्रेंटिस (Indian Navy Recruitment 2022) पदांसाठी ही भरती होणार आहे. त्यामुळे अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइट indiannavy.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज ऑनलाईन पद्धतीनं करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 जुलै 2022 असणार आहे.

एकूण जागा : 338

पदाचे नाव : विविध विभागांमध्ये अप्रेन्टिस

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.दहावीत उमेदवारांना 50% टक्के गुण असणं आवश्यक आहे.तसंच उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना ITI मध्ये 65% गुण असणं आवश्यक आहे.तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचं वय हे 01 ऑगस्ट 2001 ते 31 ऑक्टोबर 2008 च्या दरम्यान असणं आवश्यक आहे.

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 8 जुलै 2022

अधिकृत संकेतस्थळ : indiannavy.nic.in

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article