⁠  ⁠

प्रतीक्षा संपणार! तलाठी पदाच्या 4122 जागांसाठी लवकरच मेगाभरती; ही कागदपत्रं रेडी ठेवा?

Chetan Patil
By Chetan Patil 3 Min Read
3 Min Read

महाराष्ट्र राज्य सरकारकडून नुकतीच तलाठी भरतीची घोषणा करण्यात आली आहे. तब्बल 4122 जागांसाठी ही भरती होणार असून या भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता या भरती संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली असून या भरतीसाठी रजिस्ट्रेशन लवकरच सुरु होणार आहेत. त्यामुळे उमेदवारांनी स्वतःजवळ कोणते कागदपत्रं ठेवणं आवश्यक आहेत हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत केला तर मग जाणून घेऊया. Talathi Bharti 2023

राज्य शासनाचे कार्यासन अधिकारी श्रीकांत मोहिते यांनी 29 नोव्हेंबरला स्वतंत्र पत्र काढून तलाठी संवर्गातील 31 डिसेंबर 2022 रोजी रिक्त होणारी 1012 पदे आणि नव्याने निर्माण करण्यात आलेली 3110 पदे, असे एकूण 4122 पदे भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे. तसेच राज्यातील विभागनिहाय रिक्त पदांची माहिती घेऊन त्यातील MPSC मार्फत भरल्या जाणाऱ्या पदांसाठी जानेवारीत जाहीरात काढून ती पदे भरण्यासाठी प्रक्रिया आयोगाद्वारे केली जाणार असल्याने आयोगाकडे वेळेत माहिती पाठविण्याबाबत स्पष्ट आदेशही दिले आहेत.

एकूण जागा – 4122

आवश्यक शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार बारावी आणि ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी विषयांचं चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय हे 18 ते 38 दरम्यान असणं आवश्यक आहे. SC/ST/PWD/OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी शिथिलता देण्यात येणार आहे.

किती पगार मिळेल तुम्हाला?
विविध जिल्ह्यांतील तलाठी (Talathi)- 5,200/- ते रु. 20,200/-.रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक :
शाळा सोडल्याचा दाखला (10 वी, 12 वी, पदवी )
10 वीची मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट
12 वीची मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट
पदवी प्रमाणपत्र (Degree Certificate)
पोस्ट ग्रॅज्युएशन प्रमाणपत्र
इतर शैक्षणिक कागदपत्रे (NSS,NCC, etc)
अधिवास प्रमाणपत्र (Domacile Certificate)
राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र (Nationality Certificate)
जातीचा दाखला (Caste Certificate)
नॉन क्रिमिलियर (Non Creamy Layer Certificate)
जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate)
EWS प्रमाणपत्र (आवश्यकतेनुसा)

कोणत्या विभागात किती पदे भरणार?
नाशिक – १०३५
औरंगाबाद – ८७४
कोकण – ७३१
नागपूर – ५८०
अमरावती – १८३
पुणे – ७४६

परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे.
मराठी भाषा – प्रश्नांची संख्या 25 आणि गुण 50
इंग्रजी भाषा – प्रश्नांची संख्या 25 आणि गुण 50
सामान्य ज्ञान – प्रश्नांची संख्या 25 आणि गुण 50
बौद्धिक चाचणी – प्रश्नांची संख्या 25 आणि गुण 50
एकूण – प्रश्नांची संख्या 100 आणि एकूण गुण 200

तलाठी परीक्षेचा अभ्यासक्रम :

मराठी :
मराठी व्‍याकरण (वाक्‍यरचना, शब्‍दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी शब्‍द , विरुद्धार्थी शब्‍द)
म्‍हणी व वाकप्रचार वाक्‍यात उपयोग, शब्दसंग्रह
प्रसिद्ध पुस्‍तके आणि लेखक

English :
Grammar (Synonyms, Antonyms, Spelling, Punctuation, Tense, Voice, Narration, Article, Question Tag)
Vocabulary (Use of Idioms and Phrases and their meaning, Expressions)
Fill in the blanks in the sentence
Simple Sentence structure (Error, Types of Sentence)

सामान्य ज्ञान :
इतिहास, भूगोल, भारताची राज्यघटना, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, माहितीचा अधिकार अधिनियम 2005, माहिती व तंत्रज्ञान (संगणकाशी संबंधित प्रश्न) आणि इतर जनरल टॉपिक

बौद्धिक चाचणी :
बुद्धिमत्ता (कमालिका, अक्षर मलिका, वेगळा शब्द व अंक ओळखणे, समसंबंध – अंक, अक्षर, आकृती, वाक्यावरून निष्कर्ष, वेन आकृती.)
अंकगणित बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, काळ-काम-वेग संबंधित उदाहरणे, सरासरी, नफा – तोटा, सरळव्याज व चक्रवाढ व्याज चलन, मापनाची परिणामी)

Share This Article