एमपीएससी परीक्षेत वयाची अट वाढवणार
नागपूर – दोन दिवसांपुर्वी प्रसिध्द झालेल्या एमपीएससीच्या पोलीस निरिक्षक पदाच्या भरतीसाठीच्या जाहीरातीत उमेदवारांसाठी वयाची अट खुल्या प्रवर्गासाठी 28 व मागासवर्गीय उमेदवारांसाठी 31 एवढी ठेवण्यात आली आहे. मात्र 25/4/2016 च्या शासन निर्णयानुसार कोणत्याही भरती प्रक्रियेसाठी खुल्या उमेदवारांसाठी वयाची अट 38 तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी 43 निश्चित करण्यात आली असताना या भरती प्रक्रियेत मात्र वयाची अट 28 व 31 करण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगुन मागील 5 वर्षापासून तयारी करणाऱ्या राज्यातील लाखो युवकांमध्ये नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर या बाबी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ.सतिश चव्हाण, आ.अमरसिंह पंडित यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे शासनाच्या निदर्शनास आणुन देवुन ही मर्यादा वाढवण्याची विनंती केली. त्यावर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत सरकार गंभीर असून वयोमर्यादा वाढवण्याचा निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
अपडेट मिळवण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज – Mission MPSC
विधानपरिषदेत औचित्याच्या विषयात बोलताना धनंजय मुंडे यांनी एमपीएस्सीतील भरती व वयोमर्यादेच्या विषयावर प्रश्न उठवला. गेल्या दोन वर्षात एमपीएस्सीची भरतीच झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शासनाच्या जाहिरातीत शासनाच्याच नियमाचे उल्लंघन करत वयाची अट कमी दाखविली आहे. ती जाहिरात मागे घेण्याची मागणीही त्यांनी केली. तसेच खुल्या प्रवर्गातील उमेदवारांच्या वयाची अट वाढविण्याची मागणी यावेळी निरंजन डावखरे यांनी केली. मुंडे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना विनोद तावडे यांनी सांगितले, मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सदर परीक्षेत वयाची अट वाढविण्याबाबत निर्देश दिले असल्याचे सांगितले. तसेच खुल्या प्रवर्गातील उमेदवारांच्या वयाची अट वाढविण्यासाठी सर्वांशी चर्चा करून निर्णय घेण्याचे सांगितले.
[edsanimate_start entry_animation_type= “fadeIn” entry_delay= “0” entry_duration= “1” entry_timing= “linear” exit_animation_type= “” exit_delay= “” exit_duration= “” exit_timing= “” animation_repeat= “infinite” keep= “yes” animate_on= “load” scroll_offset= “” custom_css_class= “”]स्पर्धा परीक्षांचे अपडेट आपल्या मोबाईलवर मोफत मिळवा! अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.[edsanimate_end]
Changli Gosht ahe mag…